शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे वसतिगृह सुरक्षा समितीची बैठक संपन्न
यवतमाळ,दि.२३ (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे वसतिगृह सुरक्षा समितीची बैठक शनिवारी पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जी. ई. काळूसे यांनी भूषविले.
बैठकीच्या प्रारंभी संस्थेचे प्राचार्य ए. पी. मटाले यांनी अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उज्वला शिरभाते यांनी समिती स्थापन करण्यामागील उद्देश व गरज याबाबत सविस्तर माहिती दिली.
या सभेस विद्यार्थी वसतिगृह कुलमंत्री पी. पी. पवार, विद्यार्थिनी वसतिगृह कुलमंत्री एस. एस. कांबळे, समिती सदस्य सी. के. काळे, ज्येष्ठ नागरिक जी. के. पत्रकार, पालक प्रतिनिधी एस. आर. खंगार व एस. एस. गोरे उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment