‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' मध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारी व नियोजनाविषयी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. मुलाखत News On AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका उन्नती जगदाळे यांनी केले आहे.
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
“हिंद दी चादर” हा राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांच्यातील बंध अधिक दृढ करून समाजात सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या नियोजन व तयारीबाबत प्रशासनाकडून सर्वसमावेशक पावले उचलण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस, महापालिका, नागरी संरक्षण दल, आपत्ती व्यवस्थापन पथके तसेच स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून नियोजनबद्ध अंमलबजावणी केली जात आहे. भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी वाहतूक नियोजन, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय मदत केंद्रे, मार्गदर्शन कक्ष, तसेच सुरक्षा व्यवस्था यांवर विशेष भर देण्यात आला आहे. या सर्व बाबींबाबतची माहिती विभागीय आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमांमधून दिली आहे.
0000
Comments
Post a Comment