जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 5 ते 7 फेब्रुवारीपर्यत स्पर्धेचे आयोजन

यवतमाळ, दि.5 (जिमाका) : खेळ, क्रीडा व कला संवर्धन मंडळ, जिल्हा परिषद यवतमाळ आणि पंचायत समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्याक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, शिक्षणाधिकारी (प्रा) किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, क्रीडा अधिकारी चाबुकस्वार, निताताई गावंडे, प्राचार्य रमेश राऊत, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी क्रीडा स्पर्धांची माहिती दिली. पालकमंत्री ना संजय राठोड यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात 63 मॉडेल शाळांची निर्मिती केली जात आहे. जिल्हा नियोजन निधीतून शाळांमध्ये प्रयोगशाळा, सीसीटीव्ही प्रकल्प सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी विद्याथ्यांनी खिलाडू वृत्तीने क्रीडा स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक करुन पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा खनिज निधीतून 65 कोटी खर्चून मॉडेल शाळा निर्मिती केली जात आहे. जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या शाळा आता खाजगी शाळांच्या बरोबरीने येत आहेत. शाळांचे चित्र बदलत चालले आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक विकासासाठी जी मदत लागेल ती केली जाईल. जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून विद्याथर्यांनी शाळेचे आणि जिल्ह्याचे नावलौकिक करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी केले. ही स्पर्धा दि. 5 ते 7 फेब्रुवारी पर्यत नेहरु स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध समाजाच्या पारंपरिक संस्कृतीच्या झांकीचे सादरीकरण करुन सर्वांचे लक्ष्य वेधले होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस