प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी नेरमधील थकीत शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत Ø सहकार अधिकारी एम.एम भगत यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : राज्य शासनाच्या प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. नेर तालुक्यात एकूण ५ हजार ३९० थकीत सभासद असून त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ८०५ थकीत शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. उर्वरित ५८५ शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित सोसायटीच्या सचिवांकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नेर येथे भेट देऊन आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन नेर येथील सहकार अधिकारी एम.एम भगत यांनी केले आहे. शेती क्षेत्रासह शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये माहिती मागविण्यात आली आहे. सहाय्यक निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली विहीत नमुन्यात प्रपत्र अ व ब मध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ज्या सभासदांचे आधार तपशील अद्याप सेवा सोसायटीकडे प्राप्त झालेले नाहीत, ते प्राप्त करुन घेण्यासाठी सहकार अधिकारी व संबंधित कार्यालयीन कर्मचारी, तसेच संबंधित सहकारी संस्था सचिव किंवा बँकेचे वसुली अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन नेरचे सहकार अधिकारी मनोज भगत यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान