शासकीय वसतिगृहातील प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह, आधार व स्वयंम या योजना १२ च्या नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली होती. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकातील बदलाबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रवेश प्रक्रिया राबवुनही अद्यापही अनेक जिल्ह्यामध्ये रिक्त जागा दिसून येत आहेत. मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ५, विमाप्र प्रवर्गाच्या ३, दिव्यांगच्या ३ व अनाथची १ अशा एकूण १२ जागा रिक्त आहेत. तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता इमाव प्रवर्गाच्या ४, दिव्यांगची १, अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकण ७ जागा रिक्त आहेत. मुलींचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता इमाव प्रवर्गाची १ विजाभज प्रवर्गाच्या २, विमाप्र प्रवर्गाच्या २, दिव्यांगच्या २ व अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण ९ जागा रिक्त आहेत. तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाची १, विमाप्र प्रवर्गाची १, दिव्यांगची १. अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण ५ जागा रिक्त आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वसतीगृहात निवड यादी नुसार प्रवेश देऊनही अद्याप जागा रिक्त आहेत. प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मुदतवाढ देऊन वेळापत्रक देण्यात आले आहे. वसतिगृहामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याकरीता http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच योजनेकरीता प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी १० मार्च २०२६ राहील, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती