आळंबी सारख्या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ निश्चित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांसाठी आळंबी उत्पादनाचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
यवतमाळ, दि.6 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेचा आधार घेत शेतकऱ्यांच्या हितार्थ शाश्वत आर्थिक स्त्रोत निर्माण व्हा वा या उदात्त हेतूने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पुढाकाराने आळंबी म्हणजेच (मशरूम) उत्पादन तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे करण्यात आले होते. त्यांन्यी उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग यवतमाळ, संचालक फलोत्पादन पुणे,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले मार्गदर्शनात श्री ढगे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कृषी पूरक व्यवसाय योजना इत्यादी बाबींवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकत शेतकऱ्यांनी त्याचा परिपूर्ण फायदा घेण्याबाबतचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रशिक्षण अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे हेमंत जगताप
महाव्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अमरावती, दीपक बेदरकर यांनी प्रात्यक्षिका सह सखोल प्रशिक्षण उपस्थित प्रशिक्षणार्थी शेतकर्यांना दिले.
संचालक सेंट्रल बँक यवतमाळ चे दीपक तिवारी, डॉक्टर कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ प्रमोद मगर सहाय्यक प्राध्यापक गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ सुश्री स्नेहलता भागवत यांनी जिल्हाभरातून आलेल्या प्रशिक्षणार्थी शेतकरी यांना तीन दिवस आळंबी उत्पादनाविषयी विस्तृत व प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाची सांगता उपस्थितांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भोयर यांनी तर आभार प्रदर्शन सचिन पाईकराव यांनी केले या कार्यक्रमाचे सहकार्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ सुश्री,पूजा गवई यांचे सह उप कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी व इतर कर्मचारी वर्गांचे सहाय्य लाभले या प्रसंगी शेतकर्यांना महाविस्तर ॲप बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
000000



Comments
Post a Comment