गटई स्टॉल योजनेंतर्गत कामगारांना 100 टक्के अनुदानावर स्टॉल ! Ø 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.11 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गटई स्टॉल योजना’अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाजघटकांचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही योजना सन 1997 पासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्रात पात्र गटई कामगारांना 100 टक्के शासकीय अनुदानावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल तसेच ५ हजार इतके रोख अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 80 हजार रुपयांपर्यंत व शहरी भागातील एक लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. तसेच ज्या जागेसाठी स्टॉलची मागणी आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा छावणी बोर्डाकडून अधिकृतरित्या भाडे, करार, खरेदी किंवा मोफत ताब्यात दिलेली अथवा अर्जदाराच्या स्वमालकीची असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र व गरजू गटई कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ येथून अर्ज विनामूल्य प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस