बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप तालुकास्तरावर होणार ! Ø जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश Ø गर्दी, कायदा व सुव्यव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय Ø एका दिवशी 500 बांधकाम कामगारांना वाटप

यवतमाळ,दि.१२ (जिमाका) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी व सुरक्षा संच आणि अत्यावश्यक साहित्याचे वाटप तालुकास्तरावर करावे. जेणेकरून इतर तालुक्यातील कामगारांची गैरसोय होणार नाही व गर्दी टळेल. तसेच जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थाअबाधित राहील याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला आहे. सरकारी कामगारअधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुसद व दारव्हा येथे गृहपयोगी व सुरक्षा संच तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप सुरू होते. मात्र, या वाटपावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे वाटप तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदीत जिवीत (सक्रीय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप कंत्राटदारामार्फत मंगळवारी दि.10 फेब्रुवारी रोजी शेलु बुद्रुक, ता. पुसद व शंकर जिनिंग अॅण्ड प्रेसिंग, जुना दिग्रसरोड, दारव्हा येथे सुरु करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 16 तालुके असून वणी व झरी जामणी हे तालुके या वाटपाच्या ठिकाणापासून सुमारे 210 किलोमीटर अंतरावर आहे. त्या तालुक्यातील कामगारांना वाटपाच्या ठिकाणी येऊन गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन जाणे सुरक्षेच्या दृष्टीने सोईचे होत नाही. दि. 10 फेब्रुवारीपासून वाटपाच्या ठिकाणी सुमारे 3 हजारच्या आसपास किट वाटप करण्याबाबत ऑनलाईन अपॉईमेंट देण्यात आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी किंवा गोंधळ झाला असता,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच बुधवारी दि. 11 फेब्रुवारी रोजीसुध्दा कामगारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणझाला. त्यामुळे हे वाटप तात्काळ बंद करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मंडळाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच यापुढील काळात होणारे वाटप तालुकास्तरावर करुन एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना वाटप करण्यात यावे. त्याठिकाणी सोयीसुविधा असाव्यात. या वाटपापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी घेण्यात यावी, अशा सक्त सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस