यवतमाळात आजपासून ‘छत्रपती महोत्सव’ Ø विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळात ‘छत्रपती महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले असून, 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, यवतमाळ येथे सांस्कृतिक व विविध कार्यक्रम होणार आहेत. हा महोत्सव सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस