जिल्ह्यात आग लागून होणाऱ्या ट्रॅव्हल्स अपघाताच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक

यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात आग लागून ट्रॅव्हल्स अपघात होणे यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटनांची नोंद यापूर्वी झालेली असून आग लागून अपघात होणे यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत अशा घटनांची नोंद होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पत्रक जारी केले आहे. या मार्गदर्शक सुचनानुसार, प्रत्येक ट्रॅव्हल्स मालक यांनी दर पंधरा दिवसांनी आपल्या वाहनाची वेळोवेळी तांत्रिक व्यक्ती यांच्याकडून तपासणी करण्यात यावी, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाऊ नये,लांब पल्ल्याच्या प्रवासाला रात्री पाळी द्रुतगती रोडवर गाडी चालवताना दोन चालक ठेवावीत जेणेकरून त्यांच्याकडून आळीपाळीने गाडी चालवता येईल, ट्रॅव्हल्स मालक यांनी आपल्या संस्थेतील सर्व चालक, वाहक, सफाई कामगार यांची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करणे बंधनकारक राहील, सर्व ट्रॅव्हल्स मालक यांनी परिवहन विभाग यांनी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यास प्रवासी यांना तात्काळ बाहेर निघता येईल यासाठी संकटकालीन खिडकी दर्शक फलक लावण्यात यावे. ट्रॅव्हल्समध्ये अग्निशमन विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ते फायर एक्स्टिंग्यूशर ठेवण्यात यावे तसेच चालक व वाहक यांना यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण अग्निशमन विभाग यांच्याकडून देण्यात यावे, अशा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या निर्देशांचे सर्व ट्रॅव्हल्स मालक यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विकास मीना यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस