यवतमाळ जिल्ह्यात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन

यवतमाळ, दि.6 (जिमाका) : यवतमाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या अंतर्गत एसआयएस सुरक्षा आणि गुप्तचर सेवा (इंडिया) लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे. हा प्लेसमेंट ड्राईव्ह ९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत पंचायत समिती सभागृहात भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत सुरखा जवान व सुरक्षा पर्यवेक्षक या पदांसाठी एकूण ३५० रिक्त जागा उपलब्ध असून त्यामध्ये ३०० सुरक्षा जवान व ५० सुरक्षा पर्यवेक्षक पदांचा समावेश आहे. सुरक्षा जवान पदासाठी उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उंची किमान १६८ सेंमी, वय १९ ते ४० वर्षे व वजन ४५ ते ९० किलो असावे. सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा, उंची किमान १७० सेंमी व वयोमर्यादा १९ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी १० वी व १२ वीचे प्रमाणपत्र, जन्मतारीख दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. हा प्लेसमेंट ड्राईव्ह नेर, दि.9 फेब्रुवारी रोजी दारव्हा, दि.11 फेब्रुवारी रोजी पुसद, दि.13 फेब्रुवारी रोजी दिग्रस, दि.16 फेब्रुवारी रोजी कळंब, दि.18 फेब्रुवारी रोजी राळेगाव, दि.20 फेब्रुवारी रोजी पांढरकवडा, दि.23 फेब्रुवारी रोजी वणी, दि.25 फेब्रुवारी रोजी मारेगाव दि.26 फेब्रुवारी रोजी झरी-जामणी दि.27 फेब्रुवारी रोजी या तालुक्यांमध्ये अनुक्रमे आयोजित करण्यात येणार आहे. एसआयएस सुरक्षा आणि गुप्तचर सेवा (इंडिया) लिमिटेड ही कंपनी भारतातील २२ राज्यांमध्ये कार्यरत असून विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांना सुरक्षा सेवा पुरवते. या कंपनीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. दि. उचले यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस