गर्भपातास मान्यतेसाठी वैद्यकीय मंडळ Ø श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंडळ स्थापन

यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ च्या सुधारित २०२१ अधिनियमानुसार २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपाताला मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे अधिष्ठाता असून समितीत क्ष-किरण तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, अनुवंश, मानसोपचार तज्ञ आणि मेंदुविकार तज्ञ अशा नऊ तज्ज्ञांचा समावेश आहे. गर्भातील बाळाला काही व्यंग असल्यास गर्भवती महिलींना २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळास पाचारण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित