मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या प्रारूप आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेवून आढावा घेतला. या बैठकीला सह्याद्री अतिथीगृह येथे पालकमंत्री ना. संजय राठोड व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रकल्प संचालक अमित रंजन, जिल्हा नियोतजन अधिकारी सुधाकर आडे व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी जिल्हा वार्षिक योजनेसह पूर संरक्षण भिंत बांधकाम अधिकार, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक उपकरण खरेदी, पंचायत समिती इमारत बांधकाम, पोलीस स्थानक आणि नाविण्यपूर्ण कामांसाठी निधी आवश्यक असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मध्ये तरतूद करण्यात आलेल्या कामांची माहिती देवून निधी मंजुरीची मागणी केली.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित