सफाई कामगार हे नगरपालिकांचा कणा - अध्यक्ष शेरसिंग डागोर सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत घेतला आढावा

यवतमाळ,दि.१२ (जिमाका) : जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगार हे नगरपालिकांचा कणा आहे. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील सफाई कामगारांचे प्रश्न व त्यांच्या भेटीकरीता ते काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सुखदेव राठोड, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि सफाई कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत मागील बैठकीच्या इतिवृत्ताचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सफाई कामगारांची ग्रॅच्युईटी व सातव्या वेतन आयोगाची रक्कम देण्यात यावी, व्यपगत झालेले पद पुनर्जिवीत करण्याचा प्रस्ताव शासनास पाठवावा, सफाई कामगारांचे सेवा पुस्तक ३० दिवसात अद्ययावत करावे, सफाई कामगारांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे, आस्थापनाविषक कामे गांभिर्याने पूर्ण करावे, सफाई कामगारांसाठी शिबीर आयोजित करुन आयुष्मान कार्ड तात्काळ काढावे, चांगले काम करणाऱ्या प्रोत्साहन देण्यासाठी ‘सफाई मित्र’ पुरस्कार द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीनंतर अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कामगारांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस