उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाने मागवले प्रस्ताव Ø 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे मुदतवाढ

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 27 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. इच्छुकानी आपले प्रस्ताव 27 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती