अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकयुवतींना उद्योजकता प्रशिक्षणाची संधी Ø बार्टी व एमसीईडीमार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रम

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध एक महिना व दोन महिने कालावधीचे अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकल सह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक, अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा परवाना याविषयीची माहिती व इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान 10 वी पास शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ येथे संपर्क एमसीईडी यवतमाळचे प्रकल्प अधिकारी रुपेश हिरुळकर यांना 9168667152 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एमसीडीच्या वेबसाईट www.mced.co.in/Barti यावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अमरावतीचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस