Posts

शौर्यदिन समारंभ व माजी सैनिक मेळावा उत्साहात

  वीरमाता, वीरपत्नी व वीरनारींचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सत्कार          यवतमाळ, दि.29 (जिमाका)   : जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आज शौर्यदिन समारंभ व माजी सैनिक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी व वीरनारींचा सत्कार करण्यात आला.             आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले वणी येथील शहीद जवान विकास कुळमेथे यांच्या पत्नी स्नेहा विकास कुळमेथे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक वीरगाथा ’ या कार्यक्रमातून भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिनेश तत्ववादी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.       ...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिध्द

              अमरावती/यवतमाळ, दि.29 (जिमाका)   : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली असून त्यानुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, अमरावती यांनी निवडणुकीची सूचना आज प्रसिद्ध केली आहे.             निवडणूकीसाठीची नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचेकडे मंगळवार ६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात सभागृह क्र. २ तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व व...

हिवरा संगम येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी

Image
                 यवतमाळ, दि.28 (जिमाका)   : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.               यावेळी आमदार किसन वानखेडे, आमदार राजू तोडसाम, तहसीलदार अभय म्हस्के, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, नितीन भुतडा, आरती फुफाटे, जयश्री राठोड, दत्ता राहाणे, योगेश राजे, साहेबराव कदम तसेच शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त भागात पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ; महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणा पोहोचली बांधावर

Image
                 यवतमाळ, दि.28 (जिमाका)   : खरीप हंगामामध्ये ट्रिगर-१ लागू झालेल्या जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मिना यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.   या आदेशानुसार तालुक्यांमध्ये क्षेत्रीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत.             यापूर्वी २८ जून २०१८ रोजीच्या निर्देशानुसार प्रपत्र ‘क ’ मध्ये पंचनाम्याचा अहवाल संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने कृषी विभागाचे सचिव तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी सुधारित प्रपत्राचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रिगर-१ लागू झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये संबंधित क्षेत्रीय यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करावेत. यामध्ये शेतकऱ्याचा अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक घ्यावा. ज्या शेतकऱ्याचा अ‍ॅग्रीस्टॅक...

आता खतासाठी रांगेत उभे राण्याची गरज नाही !

  आता खतासाठी रांगेत उभे राण्याची गरज नाही ! मोबाईल ॲपवरुन खताची बुकिंग करता येणार >२५ सप्टेंबरपासून ‘एफएफएस’ प्रणाली लागू >आता क्यूआर कोडद्वारे अधिकृत केंद्रातून खताची उचल करा                यवतमाळ, दि.28 (जिमाका)   : शेतकऱ्यांना अनुदानित खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी व्हावी, यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबर पासून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) या पथदर्शी डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे आता शेतकऱ्यांना खतासाठी कृषी सेवा केंद्रावर रांगेत उभे राहण्याची गरज नसून घरबसल्या मोबाईलवरूनच खताची मागणी किंवा बुकिंग करता येणार आहे.             एफएफएस प्रणालीद्वारे शेतकरी मोबाईल ॲपद्वारे आपल्या फार्मर आयडी, जमीन आणि पीक माहितीच्या आधारे आवश्यक खताची बुकींग करू शकणार आहेत. बुकिंगच्या वेळी उपलब्ध खतसाठा असलेल्या अधिकृत विक्रेत्यांची माहिती पाहून आपल्या सोयीचा विक्रेता निवडता येणार आहे. बुकिंग प्रक्रिया पूर्...

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत सर्वेक्षणाला सुरुवात

Image
  > ६ लाख घरांना भेटी   देणार ; २,७३७ पथक तयार                यवतमाळ, दि.28 (जिमाका)   : कुष्ठरोगाचे लवकर निदान, त्वरीत उपचार आणी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आजपासून कुष्ठरोग शोध अभियानाला सुरुवात झाली आहे.   दि. २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत   हा अभियान जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी   विशाल खत्री   यांच्या मार्गदर्शनाखाली   व   सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यक्रमाचे डॉ. सुरेश असोले यांच्या नियोजनानुसार राबविण्यात येत आहे.             या अभियानामध्ये आशा स्वयंसेविका व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे कुष्ठरोगाबाबत घरोघर सर्वेक्षणाद्वारे लोकांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ६ लाख १ हजार १३७ घरांना भेटी देऊन २६ लाख २८ हजार ३५७ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता आशा सेविका व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवकांचे   पथकाव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण भाग १०० टक्के...

पुसद येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

Image
  यवतमाळ, दि. 25 (जिमाका) :   प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद जिल्हा यवतमाळ येथे सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधुन रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ही योजना न्युक्लिअस बजेट योजनांतर्गत आदिवासी लाभार्थ्याना वजनकाटा, टोपली, कॅरेट व छत्री इत्यादी वस्तुचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, तसेच प्रमुख अतिथी म्हणुन पद्मभूषण राजगुरु, शशांक कदम, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, कृषी अधिकारी अमोल आघव, अनिल पाटील, दिनकर गुल्हाणे हे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. रानभाजी स्टॉलचे उदघाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आशिष बिजवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबत सर्व मान्यवर कर्मचारी, आदिवासी समाज बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुसद कार्यक्षेत्रातील आदिवासी बांधवानी रानभाज्याचे प्रदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने फा...

जमिनीच्या प्रलंबित वादांसाठी ५ ऑक्टोबरला विशेष लोक अदालत अभियान

                                यवतमाळ, दि. 25 (जिमाका) :   जमिनीशी संबंधित प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात मंडळ, तहसील व उपविभागीय स्तरावर पाच ऑक्टोबरला लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे सुरु असतात. एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जात असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. यामुळे पक्षकारांचा वेळ व आर्थिक खर्च वाढतो आणि महसूल यंत्रणेवरील ताणही वाढतो. या पार्श्वभूमीवर, दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने महसुली ...

एचआयव्ही आणि इतर आजाराबद्दल जागरूकता शिबीर संपन्न

  यवतमाळ, दि. 25 (जिमाका) :   "एचआयव्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणाऱ्या आजराबद्दल रूग्णांसाठी जागरूकता" शिबीराचे दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता ए.आर.टी. सेंटर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळ येथे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण भोजने तर प्रमुख उपस्थीती म्हणुन डॉ. वैद्यकिय अधिकारी मिनल राशतवार होते. तर प्रमुख वक्ते मार्गदर्शक, ए.आर.टी. समुपदेशक नितिन फुलझेले व मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी हे होते. कार्यक्रमाचे वक्ते नितिन फुलझेले यांनी एचआयव्ही एड्स हा आजार असाध्य जरी असला तरी त्या आजारासह पुर्ण आयुष्य आपण व्यतित करू शकतो. त्याकरीता रूग्णांनी आपल्या दैनंदिन गरजाविषयी व आरोग्याबाबत जागृत राहुन वैयक्तीक काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोषक आहार आणि सकारात्मक जिवनशैली आणि औषधोपचाराने नियमित तपासणीमुळे व्यक्ती समाधानकारक जिवन जगु शकतो याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी, यांनी आपले भाषणामध्ये सांगितले की, भारतामध्ये एचआयव्ही, एड्सविषयी दिर्घकाळ आरोग्यविषयक दृष्टिकोनातु...

पुढिल दोन दिवस पाणीपुरवठा बंद

    यवतमाळ दि. २४ : यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत दर्डा नगर एमबीआर टाकीच्या व्हॉल्व्हचे मुख्य गेट पडल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दर्डा मुख्य संतुलन टाकी अंतर्गत ७ उंच पाण्याच्या टाकीवरुन दर्डा नगर, बेले लेआऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर-२. शिवाजी नगर, ग्राम पंचायत लोहारा  उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा पुढिल दोन दिवस उशिराने होईल. तसेच वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) च्या स्लॅबचे लिकेज दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्यामुळे वाघापुर एमबीआर टाकी झोनअंतर्गत वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्नीक, चांदोरे नगर टाकी ९ उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा दि. 26 व 27 सप्टेंबर 2026 पर्यंत दोन दिवस पुर्णपणे बंद राहील. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाव्दारे कळविण्यात आले आहे. 000

महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ येथे जनसंवाद कार्यक्रम संपन्न

    यवतमाळ दि. २४ : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला अंतर्गत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवाच्या औचित्याने दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अकोला महाबीज, व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महाबीजचे सन्माननीय भागधारक, बिजोत्पादक शेतकरी, महाबीज विक्रेते तसेच अधीकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी छोटेखाणी प्रदर्शपनी भरवीण्यात येवून प्रदर्शनामध्ये महाबीजची प्रमाणित बियाणे ज्वारी, करडई, मोहरी, हरभरा तसेच विविध पिकांच्या वाणांची माहिती देण्यात आली. यासोबतच रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी., महाजैविक, ट्रायकोडर्मा यांसारखी जैविक उत्पादने, कर्बमापक किट, निमास्त्र अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, महास्पीड रॅपिड डिकंपोझर तसेच ताग व ढेंचा या हिरवळीच्या खतांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच महाबीजच्या विविध ...

सेवा संकल्प अभियान # रानभाजी महोत्सव

Image
 

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

  थेट पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर                यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज आर्णी तालुक्यातील जवळा, दारव्हा तालुक्यातील भोपापूर, दिग्रस तालुक्यातील सिंगद, इसापूर व तुपटाकळी येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.             यावेळी त्यांनी शेतातील पिकांची सद्यस्थिती, पिकांवर झालेला परिणाम तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.             पिकांची स्थिती व नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना व पुढील कार्यवाहीबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  ...

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा येथे आरोग्य तपासणी शिबीर

Image
  सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘श्रीगणेश आरोग्याचा ’ या उपक्रमांतर्गत   प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा गाव कुंडी येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन केले. यात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, रक्तगट तपासणी करुन आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेविषयी माहिती देण्यात आली. हे शिबीर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले असून शिबिराला आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिसरातील नागरिक उपस्थित होते

आदर्श आचारसंहितेमुळे रोजगार महाकुंभ स्थगित

  यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ’ अंतर्गत 2० रोजगार मेळावे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.   राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यांच्या पुढील आयोजनाबाबतची माहिती संबंधित संस्था व उमेदवारांना   कळविण्यात येणार आहे. उमेदवार, नियोक्ते, प्रशिक्षण संस्था तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, चौथा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ. दूरध्वनी : ०७२३२-२४४३९५ ई-मेल : yavatmalrojgar@gmail.com वेबसाईट : rojgar.mahaswayam.in

सेवा संकल्प अभियानांतर्गत सर्प शिक्षा अभियान व आरोग्य शिबिर संपन्न

Image
         यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान ’ अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वसंतपूर, ता. दिग्रस तसेच शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळा, हर्षी, ता. पुसद येथे सर्प शिक्षा अभियान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत येणाऱ्या २० शासकीय आश्रमशाळांमधील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सर्प शिक्षा अभियानांतर्गत सर्प मित्र विनय कुलकर्णी, निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन, मेहकर यांनी विद्यार्थ्यांना सापांची ओळख, सापांबाबतचे समज-गैरसमज तसेच सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विषारी सापांमधील नाग, घोणस, फुरसे व मण्यार या प्रमुख चार प्रकारांची माहिती देतानाच विविध बिनविषारी सापांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.   यावेळी दिनेश पिंपरे यांनी ‘सर्पदंश व अंधश्रद्धा ’ या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध श...

महागाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली पाहणी...!

           यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : महागाव तालुक्यातील काळी दौलतखान सर्कलमध्ये कोनदरी, कासोळा, काळी दौ. येथे कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. नदी-नाले, तलाव व जलसाठे कोरडे पडत चाललल्याने परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीन, कापूस व तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांशी आदरपूर्वक संवाद साधत त्यांच्या समस्या, पीक परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक अडचणीची गांभीर्याने दखल घेत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना दिलासा देताना राज्यमंत्री नाईक या...

पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके शेतकऱ्यांच्या बांधावर

  दुष्काळसदृश्य भागातील पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन                यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : एलनिनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आज बाभूळगाव, नेर आणि यवतमाळ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.             बाभूळगाव तालुक्यातील सारफळी येथे शकुंतला दुधे या महिला शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच संजय राठी यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करून पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. घारफळ येथील यशवंत कोल्हेकर यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकांचीही पाहणी करण्यात आली.             यानंतर नेर तालुक्यातील धनज तसेच यवतमाळ तालुक्यातील लास...

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा

  दुष्काळसदृश्य परिस्थितीत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश                यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच पिकांच्या स्थितीबाबत पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरुवार, (दि.२४) रोजी   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी दुष्काळसदृश्य परिस्थितीत कृषी, महसूल, ग्रामविकास, सिंचन, पशुसंवर्धन आदी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.             या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन पीक पेरणी, पावसाची स्थिती, पिकांची सद्यस्थिती, पावसाच्या खंडामुळे पिकांवरील परिणाम, शेतपिकाचे नुकसान, पीक कापणी, पीक विमा, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, जलतारा, बंधाऱ्यांची स्थिती, पशुधन, चारा उपलब्धता, नळ पाणीपुरवठा योजना, पाणी टंचाई आराखडा, कमी पाणी लागणाऱ...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी २८ सप्टेंबरपासून शिबीर

सेवा संकल्प अभियान : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत आयोजन यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :  राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्ग, विशेष मागासवर्ग (मराठा) या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत समितीच्या कार्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आरक्षित प्रवर्गातून व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यापासून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेल्या, मात्र प्रकरणातील त्रुटींमुळे अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्...