Posts

जमिनीच्या प्रलंबित वादांसाठी ५ ऑक्टोबरला विशेष लोक अदालत अभियान

                                यवतमाळ, दि. 25 (जिमाका) :   जमिनीशी संबंधित प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात मंडळ, तहसील व उपविभागीय स्तरावर पाच ऑक्टोबरला लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे सुरु असतात. एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जात असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. यामुळे पक्षकारांचा वेळ व आर्थिक खर्च वाढतो आणि महसूल यंत्रणेवरील ताणही वाढतो. या पार्श्वभूमीवर, दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने महसुली ...

एचआयव्ही आणि इतर आजाराबद्दल जागरूकता शिबीर संपन्न

  यवतमाळ, दि. 25 (जिमाका) :   "एचआयव्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणाऱ्या आजराबद्दल रूग्णांसाठी जागरूकता" शिबीराचे दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता ए.आर.टी. सेंटर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळ येथे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण भोजने तर प्रमुख उपस्थीती म्हणुन डॉ. वैद्यकिय अधिकारी मिनल राशतवार होते. तर प्रमुख वक्ते मार्गदर्शक, ए.आर.टी. समुपदेशक नितिन फुलझेले व मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी हे होते. कार्यक्रमाचे वक्ते नितिन फुलझेले यांनी एचआयव्ही एड्स हा आजार असाध्य जरी असला तरी त्या आजारासह पुर्ण आयुष्य आपण व्यतित करू शकतो. त्याकरीता रूग्णांनी आपल्या दैनंदिन गरजाविषयी व आरोग्याबाबत जागृत राहुन वैयक्तीक काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोषक आहार आणि सकारात्मक जिवनशैली आणि औषधोपचाराने नियमित तपासणीमुळे व्यक्ती समाधानकारक जिवन जगु शकतो याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी, यांनी आपले भाषणामध्ये सांगितले की, भारतामध्ये एचआयव्ही, एड्सविषयी दिर्घकाळ आरोग्यविषयक दृष्टिकोनातु...

पुढिल दोन दिवस पाणीपुरवठा बंद

    यवतमाळ दि. २४ : यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत दर्डा नगर एमबीआर टाकीच्या व्हॉल्व्हचे मुख्य गेट पडल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दर्डा मुख्य संतुलन टाकी अंतर्गत ७ उंच पाण्याच्या टाकीवरुन दर्डा नगर, बेले लेआऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर-२. शिवाजी नगर, ग्राम पंचायत लोहारा  उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा पुढिल दोन दिवस उशिराने होईल. तसेच वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) च्या स्लॅबचे लिकेज दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्यामुळे वाघापुर एमबीआर टाकी झोनअंतर्गत वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्नीक, चांदोरे नगर टाकी ९ उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा दि. 26 व 27 सप्टेंबर 2026 पर्यंत दोन दिवस पुर्णपणे बंद राहील. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाव्दारे कळविण्यात आले आहे. 000

महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ येथे जनसंवाद कार्यक्रम संपन्न

    यवतमाळ दि. २४ : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला अंतर्गत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवाच्या औचित्याने दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अकोला महाबीज, व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महाबीजचे सन्माननीय भागधारक, बिजोत्पादक शेतकरी, महाबीज विक्रेते तसेच अधीकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी छोटेखाणी प्रदर्शपनी भरवीण्यात येवून प्रदर्शनामध्ये महाबीजची प्रमाणित बियाणे ज्वारी, करडई, मोहरी, हरभरा तसेच विविध पिकांच्या वाणांची माहिती देण्यात आली. यासोबतच रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी., महाजैविक, ट्रायकोडर्मा यांसारखी जैविक उत्पादने, कर्बमापक किट, निमास्त्र अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, महास्पीड रॅपिड डिकंपोझर तसेच ताग व ढेंचा या हिरवळीच्या खतांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच महाबीजच्या विविध ...

सेवा संकल्प अभियान # रानभाजी महोत्सव

Image
 

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

  थेट पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर                यवतमाळ, दि.24 (जिमाका)   : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज आर्णी तालुक्यातील जवळा, दारव्हा तालुक्यातील भोपापूर, दिग्रस तालुक्यातील सिंगद, इसापूर व तुपटाकळी येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.             यावेळी त्यांनी शेतातील पिकांची सद्यस्थिती, पिकांवर झालेला परिणाम तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.             पिकांची स्थिती व नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना व पुढील कार्यवाहीबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  ...

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा येथे आरोग्य तपासणी शिबीर

Image
  सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘श्रीगणेश आरोग्याचा ’ या उपक्रमांतर्गत   प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा गाव कुंडी येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन केले. यात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, रक्तगट तपासणी करुन आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेविषयी माहिती देण्यात आली. हे शिबीर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले असून शिबिराला आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिसरातील नागरिक उपस्थित होते