Posts

२६ मे रोजी यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळावा विविध नामांकित कंपन्यांमध्ये ५३० हून अधिक पदांसाठी भरती

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्याधारित प्रशिक्षण व उद्योगसंगत क्षमता विकसित करणे आवश्यक बनले आहे. रोजगार मेळावे हे उमेदवार व नियोक्ता यांच्यात थेट संवाद साधण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत असून, या माध्यमातून उमेदवारांना तत्काळ मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळते. तसेच उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५३० पेक्षा अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ट्रेनी क्रेडीट ऑफिसर पदासाठी २५ जा...

२० मे रोजीच्या देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सज्ज

 नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची घोषणा करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक आयुक्त (औषधे) यवतमाळ डॉ. अ. मा. माणिकराव यांनी याबाबत माहिती दिली. सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन, यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत असून. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधि...

ड्रोन उडवण्याचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणार; अधिकृत परवाना घेऊन सुरू करा व्यवसाय

 खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेची योजना अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मुख्यत्वेकरुन शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण,एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो.नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात ...

शेतमाल खरेदी-विक्रीसाठी परवाना बंधनकारक

 पणन संचालनालयाचे परिपत्रक जारी राज्यामध्ये शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक पणन संचालक शरद जरे यांनी जारी केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यामधील तरतूदीनुसार राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री चे विनियमन करण्यात येते. सद्या राज्यामधील विविध भागामध्ये अनेक व्यापारी, काही संस्था, शेतकरी संस्था या मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी विक्री कोणत्याही परवान्याविना करीत असल्याबाबतच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पणन संचालनालयाकडून संबंधितांना वेळोवेळी अशा प्रकारचे प्रकार करणे अनुचित असल्याबाबत कळवून सुध्दा अनेक व्यापारी किंवा संस्था शेतमालाची विनापरवानगी खरेदी विक्री करीत असल्याचे पणन कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र. अध्यादेश क्रमांक १५ दि. ०५जुलै २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे...

‘फार्मर आयडी’नसेल तर पीएम किसान सन्मान निधीपासून राहाल वंचित

 २० मेपर्यंत मुदत ; २.६२ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी  ३३ हजार प्रलंबित  कृषी योजनांच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ काढावे  जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी २० मे २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत फार्मर आयडी न काढल्यास भविष्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. २ लाख ६२ हजार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी केंद्र शासनाच्या ‘अॅग्रीस्टॅक’मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीनुसार पीएम-किसान योजनेअंतर्गत एकूण २ लाख ९५ हजार १८३ लाभार्थी असून, त्यापैकी २ लाख ६२ हजार ११ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध आहे. मात्र, अद्याप ३३ हजार १७२ लाभार्थ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित आहेत. फार्मर आयडीचे ...

'एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द' हीच यशाची गुरुकिल्ली - सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे (भाप्रसे)

Image
'युवा संवाद' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या मोहात न पडता स्पर्धा परीक्षेत यशासाठी अभ्यासातील एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित 'युवा संवाद' कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी, कुणाल पाटील आणि मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास रेवैयाह डोंगरे यांनी अत्यंत साध्या आणि प्रामाणिकपणे आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तेलंगणाच्या 'सुपर ५०' आश्रम शाळा प्रकल्पातून आयआयटी मद्रासपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात दिला, यातूनच प्रशासनाच्या संवेदनशीलतेची जाणीव झाली आणि नागरी सेवेची ओढ निर्माण झाली...

पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व कृषी यंत्राचे वाटप कृषी यंत्र खरेदीसाठी २२२८ शेतकऱ्यांना १२ कोटी वितरित

Image
राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १० शेतकऱ्यांना पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते कृषी औजार व यंत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीपूर्वी या कृषी औजार व यंत्राचे वाटप गुरुवारी (दि.७) करण्यात आले. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रामेश्वर रामराव तायडे रा.मनपूर ता. यवतमाळ यांना नांगर व ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख ७२ हजार ५०० रुपये, संदीप देवराव जावके, रा.बेलोरा ता. यवतमाळ यांना ट्रेलरसाठी ८० हजार रुपये, विलास शिवरामजी पारधी, रा.किन्हाळा ता. कळंब यांना बहू पीक मळणी संत्र्यासाठी २ लाख २५ हजार रुपये, प्रदीप उत्तमराव मुन, रा. सावरगाव, ता. कळंब यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार रुपये, दत्ता देवबाजी रा. मारनर, खातखेडा ता. कळंब यांना यांन...