ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : महाराष्ट्रातील जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून सहसचिव वर्षा भरोसे यांनी याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील सुधारित तरतुदी तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपते त्या महिन्याच्या सहा महिने आधीपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित क्षेत्र व हद्दीत कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमानुसार तहसिलदारांनी 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत गुगल अर्थ नकाशांवर सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे अंतिम नकाशे तयार करणे. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्...