Posts

Showing posts from December, 2016
अरबी समुद्रात छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -पालकमंत्री संजय राठोड *पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई येथे भूमिपूजन *210 मीटर उंचीचा पुतळा उभा राहणार यवतमाळ,   दि. 20 :   मुंबईजवळच्या अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मिटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह भव्य स्मारकाचे भूमिपूजन व जलपुजनाचा भव्य सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. 24 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड केले. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील   बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे   70   हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईलगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय   2002   मध्ये घेतला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये