Posts

Showing posts from October, 2023

लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
Ø 881 कोटी रू. निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ; Ø यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणार ; Ø ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 50 हजार नागरिकांची उपस्थिती ; Ø जिल्ह्यात 16 लाख नागरिकांना 601 कोटी रू. निधीतून लाभाचें वितरण ; जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक ; गत दोन वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्ह्यात 881 कोटी रू. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. डॉ. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, डॉ.संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक

शासन आपल्या दारी अभियान : लाभार्थ्यांची अलोट गर्दी...

Image
शासन आपल्या दारी अभियानाचा यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. प्रशासनाने 35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात 50 हजारापेक्षा अधिक लाभार्थी व सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती. प्रशासनाची उत्तम तयारी आणि लाभार्थ्यांच्या ‘अलोट गर्दी’ने खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ आल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला. सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दि.1 एप्रिलपासून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या कालावधीत 16 लाख 21 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी ईतकी आहे. राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाभ वाटपाचे कार्यक्रम घेतले जात आहे. यवतमाळ येथे आज झालेला 17 वा कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. कार्यक्रमाला 50 हजारापेक्षा जास्त लाभार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसात शासनाने आपल्यासाठी काहीतरी केल्याची भावना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. कार्यक्र

पाळोदी येथे पुसद प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

Image
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत 18 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आर्णी तालुक्यातील पाळोदी येथे शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सतीश सपकाळ होते तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार, सहायक लेखाधिकारी विष्णु चव्हाण, अरुण चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल लोणीकर, चटलेवाड, वंदना वानखडे, मुख्याध्यापक श्री. एस. राठोड, हजारे, श्याम चव्हाण, गावातील प्रथम नागरिक सरपंच कांताताई कुमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मडावी मंचावर उपस्थित होते. यावेळी क्रांतिविर बिरसा मुंडा व आदिवासी क्रांतिकारकांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपस्थित खेळाडू व पंचांना शपथ देण्यात आली. उद्घाटनाप्रसंगी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे म्हणाले, पाळोदी येथे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मोठ्या प्रयत्नाने पुनर्जीवित

किन्हीत पंडित दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळावा 30 ऑक्टोबरला

Image
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटर मार्फत 30 ऑक्टोबर रोजी किन्ही येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ, शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा आता 30 ऑक्टोबर रोजी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, तुळजापूर हायवे लगत, गट क्र.109, किन्ही येथे होणार आहे याची यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी व मेळाव्याच्या ठिकाणी विविध कंपन्यांना मुलाखती देण्‌यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी आवाहन केले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शुक्रवारी दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालीलप्रमाणे आहे. सकाळी १० वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा घेतील. सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा करतील. सकाळी ११.३० वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतील. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतील. दुपारी १.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे स्थानिकांना भेटतील.

‘शासन आपल्या दारी’ची कामे प्राधान्याने पूर्ण करा - डॅा. पंकज आशिया

Image
> जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा > ३० ऑक्टोबरला किन्ही येथे होणार भव्य कार्यक्रम ; यवतमाळ -जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत ३० ॲाक्टोबर रोजी किन्ही येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी कार्यक्रमासंबंधित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी संबंधित अधिकारी यांना दिले. जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी महसूल भवनात कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॅा. शिरीष नाईक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. गिरीश जतकर आदी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी सुरुवातीला कार्यक्रमाच्या अनुषंगाने नि

जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीसाठी प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधी

Image
घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता 11 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असून प्रवेश अर्ज ऑनलाईनच मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवेश पत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नवोदय विद्यालयाच्या www.navodaya.gov.in या वेबसाईटवर तर परीक्षेसाठी लागणारी विस्तारीत माहिती www.navodaya.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आहे. या परीक्षेसाठी लागणाऱ्या पात्रतेनुसार विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेचाच विद्यार्थी असावा. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र राहणार नाहीत. यासोबतच विद्यार्थ्याचा जन्म दि. 1 जून 2007 ते 31 जूलै 2009 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ही अट सर्व प्रवर्गातील वि

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना गावस्तरावरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - प्रमोदसिंह दुबे

केंद्र शासनाची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या योजनेची पहिली सभा शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी श्री. दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बि एम राठोड यांनी सदस्य सचिव म्हणून सभेचे कामकाज पाहिले. या योजनेचे सादरीकरण एमएसएमई नागपूरचे सहायक संचालक पि टी डोईफोडे यांनी केले. या सभेस जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण, जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक कार्यालयाचे निशिकांत ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे विशाल मनवर, सिएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक मुकुंद ठाकरे उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे म्हणाले की, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही अत्यंत चांगली योजना असून पारंपरिक उद्योजकांचा विकास साधण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांनी ऑनलाईन पद्धतीने प्रथम ग्रामपंचायतांची नोंदणी कर

ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीर

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार’ या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन येथील ज्येष्ठ नागरीक भवन येथे करण्यात आले होते. राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश के.ए. नहार, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॅनल वकील राजेश कोडापे उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी के.ए.नहार यांनी ज्येष्ठ नागरिकांसंबंधी मनोगत व्यक्त केले. यवतमाळातील मनोहर नगर येथील ज्येष्ठ नागरीक मंडळ येथे पूर्वीपासून स्थापन असलेल्या लिगल एड क्लिनिकच्या माध्यमातून दर आठवड्याला रविवारी व बुधवारी मोफत कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन केले जाते. नागरिकांनी कायदेविषयक समस्यांविषयी संपर्क साधण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी ज्येष्

दिल्लीतील अमृतवाटिकेसाठी जाणार यवतमाळची माती

Image
अमृत कलश यात्रा आज निघणार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेत यवतमाळ जिल्ह्याची माती एकरुप होणार आहे. यासाठी आज 25 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा दिल्लीसाठी रवाना होणार आहे. या अमृत कलश यात्रेच्या अनुषंगाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांच्यासह जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अनिल ठेंगे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, जिल्हा परिषद प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही अमृत कलश यात्रा 25 ऑक्टोबर रोजी सकाळी शहरात निघणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद येथून दुपारी विशेष ट्रॅव्हल्सने मुंबईला रवाना होणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करा - - पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ; Ø कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारो लाभार्थी येणार ; Ø कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 31 समित्यांचे गठण : सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या. अभियानांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. शासन आपल्या दारी अभियानाचा महसूल भवन येथे आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ यांच्यास

नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्यासाठी कन्यादान योजना ; सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Image
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील आदिवासी भागातील विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र सेवाभावी स्वयंसेवी संस्था यांनी चालु आर्थिक वर्षाकरिता कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन व परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालयजवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे दि. 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. या योजनेच्या निकषनुसार वर व वधु यांचे वय विवाहाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा जास्त असू नये,  वधुवराचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे. नवदाम्पत्यापैकी एकजण अनुसूचित जमातीचा असावा,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जोडप्यापैकी एकाचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कोणत्याही कलमाचा भंग झाले नसल्या

आदिवासी भागात सांस्कृतिक संकुल बांधण्यासाठी योजना ; प्रस्ताव 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Image
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील चालु आर्थिक वर्षात आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक संकुल बांधणे हीयोजना राबविण्यात येत आहे.चालु आर्थिक वर्षाकरीता सांस्कृतिक संकुल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींकडुन परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालयजवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे दि. 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.  या योजनेच्या निकषानुसार सांस्कृतिक भवन,सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी जमीन विनामुल्य असणे आवश्यक आहे. जमीन विनामुल्य उपलब्ध असल्याचे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा ठराव आवश्यक आहे. जागेचा मुळ सातबाराव उतारा (अलिकडील प्रत), जागेचा मोजणी नकाशा (अलिकडील प्रत) ज्याठिकाणी संकुल मंजूर करावयाचे आहे तेथील आदिवासी लोकसंख्या तसेच त्या परिसरातील किती गावांना, लोकसंख्येला आदिवासी योजनेचा लाभ होणार आहे याचा सांख्यिकी तपशिल, सांस्कृतिक संकुल, भवन बांधकामाच्या जमीनीवर अतिक्रमण अथवा न्यायालयात दावा द

तुतीसाठी 3.97 लाखांचे अनुदान ; अर्ज केला ना ?

Image
जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास 2 लाख 18 हजार रुपये तर संगोपनगृह बांधकामासाठी 1 लाख 79 हजार रुपये असे तीन वर्षासाठी जवळपास 3 लाख 97 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. 2.18 लाख अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड 682 मनुष्य दिवस, मजुरी दर 273 रुपये, अकुशलसाठी 1 लक्ष 86 हजार 186 रुपये तर कुशलसाठी 32 हजार रुपये असे एकुण 2 लाख 18 हजार 186 रुपये अनुदान आहे. बांधकामासाठी अनुदान कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मनुष्य दिवस 213, मजुरी दर 273 रुपये अकुशलसाठी 58 हजार 189 रुपये आणी कुशलसाठी 1 लक्ष 79 हजार 149 रुपये अनुदान मिळणार आहे. कीटक संगोपनगृह बांधकाम 50 बाय 22 प्रमाणे 1100 वर्ग फूट बांधकाम तुतीच्या बागेजवळ करणे आवश्यक आहे. अर्ज कुठे करावा ? ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही सिंचनाची सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी सोयाबीननंतर लागवड करण्यासाठी अर्ज ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अटी

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एमएसएमई उद्योगांकरिता कार्यशाळा

Image
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील स्थापित तसेच नव्याने येऊ घातलेल्या एमएसएमई उद्योगांकरिता एकदिवसीय ईग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक सतिश शेळके यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम व अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात सतिश शेळके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांना आपले उत्पादन निर्यात करण्यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच यवतमाळ जिल्ह्यास निर्यातक्षम जिल्हा करण्याकरीता आव्हान केले. विदेश व्यापार महानिदेशालय, नागपूर, सिडबी, ओएनडीसी, क्यूसीआय, निर्यात सल्लागार, डाक विभाग, ॲपेडा मुंबई, भारतीय औद्योगिक विकास बँक, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसीएशन आदींचे अधिकारी, पदाधिकारी यांनी उपस्थित उद्योजकांना यावेळी आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर सेलर मीट, ईपीसीची भूमिका, वित्तीय सहाय्य मिळविण्याचे पर्याय, ई-कॉमर्स आदींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटना, एफपीओ, उद्यमशील युवक-युवती, क्लस्टर सदस्य,

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळातील २० ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

Image
राज्याच्या ग्रामीण भागातील युवक-युवती, महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी व उद्योजकता निर्माण होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील २० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ॲानलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अाज करण्यात आले. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा उद्घाटन समारंभ ॲानलाईन आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील वीस केंद्रांच्या ठिकाणाहून लोकप्रतिनिधी, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील तिवसा, जवळा, लाडखेड, कलगाव, काळी दौलत, शेंबाळपिंपरी, मुळावा, सोनवाढोणा, इंद्रठाणा, हातोला, पाटणबोरी, चिखलगाव, पाटण, मुकुटबण, राणी अमरावती, खापरी, पारवा, जोडमोहा, वेगाव आणि झाडगाव या २० केंद्रांचे ॲानलाईनरित्या एकाचवेळी उद्घाटन झाले.

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन : कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज उद्घाटन

जिल्ह्यातील वीस ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मंजुरी : जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व उद्योजकता निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात एकूण 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आह. त्यामध्ये जवळा, लाडखेड, कलगाव, काळी दौलत, शेंबाळपिंपरी, मुळावा, सोनवाढोणा, इंद्रठाणा, तिवसा, हातोला, पाटणबोरी, चिखलगाव, पाटण, मुकुट

तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन करावे कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे आवाहन

यवतमाळ, दि. १७ (जिमाका): नुकत्याच कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार येत्या पंधरवाड्यात तूर पिक काही ठिकाणी फुलोऱ्यावर येईल. शेतकऱ्यांना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक असून अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तूर पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करण्याचे आवाहन डॅा. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या कीटकशास्त्र विभागाने केले आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिमी लांब, विविध रंग छटेत दिसून येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग या पतं

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावरील रोगाचे एकात्मिक नियंत्रण करावे

यवतमाळ, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावरील रोगाचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी डॅा. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या कीटकशास्त्र विभागाने उपायोजना करण्याचे आवाहन केले आहे. उपाययोजना करतांना मररोग्रस्त शेतात हरभरा पीक घेवू नये, पिकाची फेरपालट करावी. रोग प्रतिबंधक जाती उदा. आयसीसीव्ही १०, विजय, विशाल, जाकी ९२१८ साली ९५१६, पीडीकेव्ही कांचन (ओलीताखाली) या जातीचा पेरणीकरिता वापर करावा. परंतू वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच वाण निवडावे. पेरणीपूर्वी बियाण्यास टेबुकोनाझाल ५.४ टक्के एफएस बुरशीनाशक ४ मीली किंवा प्रोक्लोराझ ५.७ टक्के + टेबुकोनाझाल १.४ टक्के ईएस ३ मिली किंवा टेबुकोनाझाल १५ टक्के + झीनेब ५७ टक्के डब्लूडीजी ४० मिली प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बिजप्रकिया करावी. जास्त बाधीत क्षेत्रात एकरी २ किलो ट्रायकोडर्मा २०० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावा, या उपाययोजना करण्याचे आवाहन क

जिल्ह्यातील वीस ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मंजुरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबरला ऑनलाईन उद्घाटन

यवतमाळ, दि. 17 (जिमाका):-जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व उद्योजकता निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात एकूण 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळा, लाडखेड, कलगाव, काळी दौलत, शेंबाळपिंपरी, मुळावा, सोनवाढोणा, इंद्रठाणा, तिवसा, हातोला, पाटणबोरी, चिखलगाव, पाटण, मुकुटबण, राणीअमरावती, खापरी, पारवा, जो

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

यवतमाळ, दि.16 (जिमाका) : ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान व 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र देशी दारू नियम 1973 चे नियम 26(2) व विदेशी मद्य नियम (सेल ॲन्ड कॅश) नियम 1969 चे नियम 9 ए (2)(सी)(2) मधील तरतुदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आहे, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या सीएल-3, एफएल-2, सीएलएफएलटिओडी-3, एफएलबिआर-2 एफएल -3, सिएल-2, अनुज्ञप्ती खालीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार मतदानाच्या अगोदरच्या दिवस दि. 4 नोव्हेंबर, मतदानाच्या दिवस 5 नोव्हेंबर, मतमोजणीचा दिवस 6 नोव्हेंबरला जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहे, त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अनुज्ञप्ती पूर्ण दिवस बंद राहील. तसेच दि. 6 नोव्हेंबर रोजी ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हद्दीतील अनुज्ञप्ती मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत बंद राहील. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती

एमएसएमई क्षेत्रासंदर्भात भागधारकांसोबत एक दिवसीय कार्यशाळा

यवतमाळ दि. 16 (जिमाका): एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळेचे दि. 19 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील निर्यात वाढवण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी एक दिवसीय संमेलनाचे आयोजन अमृत सेलेब्रेशन हॉल, आर्णी रोड यवतमाळ येथे करण्यात आले आहे. सदर संमेलनामध्ये गुंतवणूक, निर्यातवृद्धी, उद्योग सुलभीकरण, एक जिल्हा एक उत्पादन, डिजीटल मार्केटींग इत्यादी विषयांवर चर्चासत्र आयोजित केले असून, अधिकारी व अनुभवी प्रवक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याहस्ते सकाळी 10 वाजता होणार असून सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे येथील उद्योग सहसंचालक सतीश शेळके व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे. 000

बाधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 16 (जिमाका) : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी याकरिता शासन स्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोर्टलवर ई-पंचनामा केलेल्या काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी केलेली नाही. शेतकऱ्यांनी ती तातडीने करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मध्ये अवकाळी पाऊस, ऑक्टोंबर 2021 चा मान्सून व सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 73 हजार 910 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून 71 हजार 15 नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहे. चुकीचे बँक खाते, आयएफएसकोड यामुळे 11 हजार 471 नोंदी रिजेक्ट झाल्या असून तालुकास्तरावरून दुरुस्ती करून अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत शासनस्तरावरून डीबीटी पद्धतीद्वारे 35 हजार 371 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी 21 लाख 67 हजार 613 इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. अजूनही 35 हजार 64

आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक दृष्टीदीन साजरा

यवतमाळ दि. 16 (जिमाका) : अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक महाविद्यालयात जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजीव मुंदाणे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नेत्र विभाग प्रमुख डॉ.वाघ, नेत्रतज्ञ डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. आकाश भोजणे उपस्थित होते. यावर्षी लव्ह युवर आईज म्हणजे प्रेमाने घेऊया आपल्या डोळ्यांची काळजी हे घोष वाक्य निश्चित करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये नेत्रदान पंधरवडानिमित्त वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा जोतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर पथनाट्य सादर केले. या विद्यार्थ्यांना सन्मानपत

ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन -जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन

यवतमाळ दि. 13 (जिमाका) -माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात येतो. या दिना निमित्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे वाचन प्रेमी साठी नविन सभासदत्व देण्यात येणार आहे. ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील एकूण 1 लाख 17 हजार 197 एवढी ग्रंथ संपदा असून कोणीही नागरिक सभासदत्व स्वीकारू शकता. सभासदत्व स्वीकारण्यासाठी फक्त रु. 100 एवढीच वर्गणी दोन वर्षासाठी घेण्यात येते. तसेच अनामत रक्कम रु. 500 म्हणून घेण्यात येते. आपण सभासदत्व रद्द केल्यास आपली अनामत रक्कम आपणास परत करण्यात येते. रु.100 च्या द्वै-वार्षिक वर्गणीमध्ये या ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ संपदेतील ग्रंथ आपण घरी वाचावयास नेवू शकतात. ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारायचे असल्यास अर्ज विक्री सुरु झाली असून अर्जाची किंमत रु.१० आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी व अर्ज जमा करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ, या ग्रंथालयात सकाळी 10.30 ते सायं 5.30 या वेळेत संपर्क साधावा. (शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रंथालय बंद

राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार - पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१३ (जिमाका) : भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्य घटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी आणि सावंगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, लाख, तुपटाकळी आणि सावंगा ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्याक्षसंख्येने उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समाविष्ट केल्या आहेत. या घटनेनुसारच कृती आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीधर्म, गरिब-श्रीमंत न पाहता सर्वसामान्य, शेतकरी हिताची कामे केली जा

डेंग्यू आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात गावोगावी धुर फवारणी * डेंग्यूच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग सज्ज * नागरिकांनी सुचनांचे पालन करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 13 (जिमाका) : पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू व इतर किटकजन्य आजारात वाढ होत असते. जिल्ह्यात मधल्या काळात अतिवृष्टी झाल्याने बहूतेक भागात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अशा आजारात वाढ आढळून आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. डासांची मादी किटकजन्य आजार प्रसारास कारणीभुत ठरते. हे डास पाण्यामध्ये अंडी घालतात. त्यांच्या जीवनचक्राच्या चार अवस्था असतात. अंडी, अळी, कोष व पुर्णावस्थेतील डास. जानेवारी ते ११ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात २४३ डेंग्यू निश्चीत रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षांमध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडीस या डासांच्या चावण्यापासून होतो तसेच या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असते. या डासाच्या पाय व शरीरावर पांढरे पट्टे असतात. हा साधारणतः दिवसा चावतो व घरातील अंधाऱ्या भागात आढळुन येतो. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवडयातून एकदा रिकामे व कोरडे करून कोरडा दिवस पाळावा, घ

जिल्ह्यात 46 मॉडेल स्कुलची निर्मिती होणार पालकमंत्री संजय राठोड यांची संकल्पना > जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट > जिल्हा खनिकर्म योजनेतून 40 कोटी 80 लाखांचा निधी

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण चेतना या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या 46 मॉडेल स्कुलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. पालकमंत्री श्री.राठोड यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत विविध कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ज्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शंभरपेक्षा जास्त पटसंख्या आहे. त्या शाळांचा जिर्णोद्धार करणे, नवीन इमारत बांधणे, शाळांमध्ये शौचालय, चांगल्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, भौतिक व अत्याधुनिक सोयीसुविधा, स्मार्ट आणि डिजिटल शाळा करण्यासाठी निर्णय घेतला आहे. सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. नवी पिढी सक्षम झाली पाहिजेत, यासाठी जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्मार्ट अंगणवाडी करण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरु आहेत. मॉडेल स्कुलची निर्मिती करण्यासाठी जिल्हा खनिकर्म योजनेतून 40 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश पाल

जागतिक मानसिक आरोग्य दिनी कायदेविषयक जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लोकमित्र ट्रस्टचा पुढाकार

यवतमाळ, दि.13(जिमाक) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लोकमित्र ट्रस्टचा पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत नाकापार्डी येथे मंगळवारी करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश के.ए. नहार तर अध्यक्षस्थानी नाकापार्डी येथील ग्रामपंचायत सदस् मेघश्याम भवरे हे होते. यावेळी लोकमित्र ट्रस्ट फॅार ह्युमन डेव्हलपमेंट संचालक मिलिंद वंजारे, सचिव रत्नदिप गंगाळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना डहाके, शिक्षिका वैशाली भगत, नाकापार्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॅा. सचिन माळवी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मिलिंद वंजारे, संचालक, लोकमित्र ट्रस्ट फाॅर हयुमन डेव्हलपमेंट, यवतमाळ यांनी केले. यावेळी त्यांनी 3 तासापेक्षा जास्त मोबाईल इंटरनेट कोणत्याही कारणाशिवाय

13 ऑक्टोबर रोजीच्या पं. दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळाव्याबाबत आवाहन

Image
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरमार्फत दि.13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला पं. दीनदयाळ उपध्याय रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचे आयोजन जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ, तुळजापूर हायवे लगत, गट नं. 109 किन्ही, यवतमाळ येथे शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत करण्यात आलेले होते. हा रोजगार मेळावा काही अपिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला असून रोजगार मेळाव्याची सुधारित दिनांक व ठिकाण कळविण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा शितोळे यांनी केले आहे.

सर्व खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना ईआर प्रपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक किंवा आस्थापनांनी सेवायोजन कायद्यान्वये त्रैमासिक रोजगार परतावा (ईआर 1) ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. जुलै ते सप्टेंबर अखेर संपणाऱ्या त्रैमासिकासाठी ईआर 1 या प्रपत्राची माहिती रोजगार महास्वयम या संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकिय, खाजगी उद्योजक किंवा आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाईन सादर करावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. ऑनलाईन ईआर 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ईआर 1 प्रपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. ईआर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात