Posts

Showing posts from February, 2020

दारव्हा शासकीय धान्य गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून आकस्मिक पाहणी धान्यवितरणात अनियमितता आढळल्यास कारवाईचे संकेत

Image
यवतमाळ दि. 29, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आज आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून दारव्हा येथील   शासकीय धान्य गोदामाची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी हे देखील होते. धान्य वाहतुकीची जीपीएस ट्रॅकिंग होते का, वाहतूक पास ची नोंद घेतली जाते का, साखर किती आली, गहू, तांदूळ कधी आले, त्याची प्रतवारी काय आहे, असे संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांना प्रश्न विचारून धान्यगोदामात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी धान्यसाठा किती आहे, धान्याचे वितरण कसे केले, किती धान्य वाटपसाठी पाठवले याबाबत नोंदवह्यांची तपासणी केली. धान्य वाटप मध्ये तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी संबंधीतांना बजावले. धान्यगोदामाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना   आग लागल्यास काय व्यवस्था आहे याची जिल्हाधिकारी सिंह यांनी पाहणी केली. यावेळी तेथील आगरोधक यंत्राद्वारे फवारणी करून प्रात्यक्षिक करून घेतले. तत्पुर्वी जिल्हाधिकारी सिंह यांनी दारव्हा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय येथे देखील भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिका

तूर साठविण्यासाठी बाजार समितीचे व खाजगी गोदाम अधिग्रहीत करणार - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

Image
v शेतक-यांना मिळणार दिलासा यवतमाळ दि.28 : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत असून सध्या साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतक-यांना तूर खरेदीची वाट पाहावी लागत आहे. मात्र शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरीता अधिग्रहीत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून कापूस आणि तूरीचे उत्पादनसुध्दा चांगले झाले आहे. मात्र शेतक-यांचा माल साठविण्यासाठी गोदामांची कमतरता जाणवत आहे. राज्य वखार महामंडळांचे गोदाम अपुरे पडत असल्याने दोन-तीन दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तसेच खाजगी गोदाम अधिग्रहीत करण्यात येणार आहे. शेतक-यांचा माल लवकरात लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष देणार आहोत. दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात जवळपास 9 लक्ष 7 हजार हेक्टरवर खरीप आणि 87 हजार हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड करण्यात येत

पोलीस दलात एका क्लिकवर माहितीची देवाणघेवाण

Image
* डिजीटायझेनकडे यवतमाळ पोलीस दलाची वाटचाल यवतमाळ दि.28 : पोलीस दलाचा व्याप हा सर्वश्रुत आहे. सण, उत्सव, निवडणूक, व्हीआयपी दौरे यात पोलीस दल आपल्याला नेहमी कडा पहारा देताना दिसून येतात. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हेगारांना सजा मिळवून तक्रारदारांना न्याय मिळून देणे, यात पोलीस दल हे रात्रं दिवस मेहनत घेत राहतात. याशिवाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हे परिषद, उजळणी कोर्स, कार्यशाळा व कार्यालयीन कामाकरीता वरिष्ठ कार्यालयात सुध्दा वारंवार हजेरी लावावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून वरिष्ठ कार्यालयात पोलीस कर्मचारी व अधिका री यांची वारी कशी कमी करता येईल व त्यांच्यापर्यंत वरिष्ठांनाच कमी वेळात कसे पोहोचता येईल, यावर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यांनी उपाय शोधून काढला तो उपाय म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सी.   सक्षम निरीक्षण क्षमता व आपल्या दलाकरीता नेहमी काहीतरी नवीन नवीन कल्पक योजनाद्वारे पोलीस दलाचा ताण कमी कसा करता येईल, याचा ध्यास असलेले जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी व्हिडीओ क

पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष घटक योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

Image
यवतमाळ दि.28 : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने सामाजिक न्याय विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ यांच्यावतीने जिल्ह्यातील तालुक्यात चित्ररथाद्वारे प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या चित्ररथाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून आज (दि.28) रवाना केले. जिल्हा क्रीडा संकूल येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते. या चित्ररथामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारीत ऑडीओ जिंगल्सद्वारे नागरिकांना योजनांची माहिती सांगण्यात येईल. तसेच योजनांची माहिती असलेली स्टीकरशीट व घडीपुस्तिकांचे नागरिकांना वाटप करण्यात येईल. या योजनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे, रमाई घरकुल योजना, अनुसुचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, आंतरज

खेळांमुळे शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास

Image
                                                      - पालकमंत्री संजय राठोड v विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ यवतमाळ दि.28 : मानवाच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींचा आपणाला सामना करावा लागत आहे. ताणतणाव, कामाची व्यस्तता आदीमुळे शरीराकडे तर दुर्लक्ष होतेच शिवाय मनही प्रसन्न राहत नाही. यावर मात करायची असेल तर मैदानी खेळांकडे आपल्याला वळावे लागेल. कारण खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नेहरू क्रीडा संकूल येथे अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, अमरावतीचे अपर आयुक्त मंगेश मोहिते, जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विस्पुते, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, रविंद्र देशमुख, सा.बा. विभा

पोस्को व बाल न्याय अधिनियमबाबत जनजागृती करा – जिल्हाधिकारी

Image
v जिल्हा बाल संरक्षण समितीची आढावा बैठक       यवतमाळ, दि. 27 : बालकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नये व त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बाल न्याय अधिनियमबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल सरंक्षण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विस्पुते, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद पाटील, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते.             यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्हा बाल संरक्षण समितीच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करावे. लैगिंक अत्याचाराची प्रकरणे

कुसुमाग्रज यांचे साहित्य दिशा देणारे – डॉ. रमाकांत कोलते

Image
v जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालायातर्फे मराठी भाषा गौरव दिन यवतमाळ, दि. 27 : मराठी भाषेबद्दल मन जागृत राहावे, या निमित्ताने वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचे साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन वि.भि. कोलते संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले. जिल्हा ग्रंथालय येथे जिल्हा माहिती कार्यालय व ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनादिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक संजय डहाके, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते. ‘भाषा मरता देश मरतो’ असे सांगून डॉ. कोलते म्हणाले, आपली संस्कृती, स्वाभिमान, गौरव, प्रतिष्ठा हे सर्वकाही भाषेवरच अवलंबून आहे. प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. इ.स.पुर्वी 600-700 वर्षांपूर्वीपासून मराठी भाषा अस्तित्वात आहे. 12 व

आशा स्वयंसेविका व कायाकल्प पुरस्कार वितरण

Image
यवतमाळ, दि. 26 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषदतर्फे बचत भवन येथे जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका व कायाकल्प पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कायाकल्प प्रथम पुरस्कार 2 लक्ष रूपये प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळची चमू डॉ. हर्षल पदोळे व ता.आ.अ. डॉ.संजय मडावी तर प्रोस्ताहनपर पुरस्कार 50 हजार प्राथमिक आरोग्य पहापळ राहुल तायडे यांना व ग्रामीण रुग्णालयस्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कार 50 हजार रुपये, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ.पी.एस. चव्हाण यांनी जिल्ह्यात 2373 आशामार्फत ग्रामीण भागात सुखरूप प्रसूती स्तनपान, लसीकरण, एनसीडी इत्यादी 73 प्रकारची आरोग्य सेवेची विविध कामे तसेच दिवसेंदिवस आरोग्याच्या नवनवीन योजनेत आशाचे अधिक महत्व असल्याबाबत सांगितले. अध्यक्षनिहाय भाषणात श्रीधर मोहोड म्हणाले, माणवाच्या जिवनामध्ये आरोग्य हे सर्

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

Image
Ø पहिल्या टप्प्यात 546 शेतक-यांची यादी प्रसिध्द यवतमाळ, दि. 24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र खातेदारांच्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेला आजपासून (दि.24) सुरवात झाली. यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दिग्रस आणि राळेगाव तालुक्यातील 546 शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात आजपावेतो 1 लक्ष 2 हजार 495 खातेदारांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण पात्र खातेदारांच्या 95 टक्के आहे. त्यानुसार आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 546 शेतक-यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. यात राळेगाव तालुक्यातील 315 तर दिग्रस तालुक्यातील 231 शेतकरी सभासदांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यातील शेतक-यांच्या याद्या पोर्टलवरून डाऊनलोड करून संबंधित तालुक्यास देण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यात सदर याद्या तहसील कार्यालय, संबंधित बँक शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दिग्रस तालुक्यातील विजय सरदार

पालकमंत्र्यांच्या हस्ते तेलगव्हाण सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ

Image
यवतमाळ, दि. 24 : दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथील सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जि.प. सदस्या आश्विनी कुरसंगे, पं.स.सदस्या सविता जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्री. राठोड म्हणाले, स्व. वसंतराव नाईक यांनी कृषी, जलसंधारण आदी क्षेत्रात अविस्मरणीय काम केले आहे. त्यांच्या विचारानुसारच काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. तेलगव्हाण येथील लाभक्षेत्रातील भुसंपादनासंर्भात जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करण्यात आली आहे. गावखेड्यातील समृध्दीचे वातावरण निर्माण करून युवकांच्या हाताला काम, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, सिंचन व्यवस्था, यासारख्या विकासाच्या गोष्टीला आपले प्राधान्य राहील, असेही ते म्हणाले. तेलगव्हाण सिंचन तलावाचे काम जि.प. सिंचन विभागाने रोजगार हमी योजनेतून सन 1987-88 मध्ये पूर्ण केले. ऑगस्ट 2018 रोजी दारव्हा

गावखेड्यात समृध्दीचे वातावरण निर्माण करण्यास कटिबध्द - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                           Ø चोरखोपडी येथे सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ यवतमाळ, दि. 23 : नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे. सार्वजनिक विकासापेक्षा प्रत्येक कुटुंब आनंदी व गावात समृध्दी असेल तर तो खरा विकास आहे. असा विकास करणे हे आपले स्वप्न आहे. त्यामु          ळे प्रत्येक गावखेड्यात समृध्दीचे वातावरण निर्माण करण्यास आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे सिंचन तलावाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जि.प. सदस्या आश्विनी कुरसंगे, पं.स.सदस्या सविता जाधव, चोरखोपडीच्या सरपंचा गिता जाधव, उपसरपंच गजानन जवके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरज शिंदे आदी उपस्थित होते. सिंचन तलावाच्या कामाची दुरुस्ती योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राठ

जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण द्या - पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण यवतमाळ, दि. 22 : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे यांनी ख-या अर्थाने विणले. आज ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी हा शेतकरी, शेतमजुर आणि सामान्य नागरिकाचा असतो. या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर), जि.प.सभापती सर्वश्री विजय राठोड, श्रीधर मोहोड, जयश्री पोटे, चित्तांगराव कदम, प्रिती काकडे, पावनी कल्यमवार, जि.प.सदस्य गजानन बेजंकीवार, रेणू शिंदे, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी

तहसील व पंचायत समिती कार्यालयाची इमारत मिनी मंत्रालयासारखी करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø नेर येथील प्रशासकीय इमारतींच्या बांधकाची पाहणी यवतमाळ, दि. 20 : शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क नेहमी तालुक्याशी येतो. शासकीय कामात अडचण जावू नये म्हणून नेर (नवाबपूर) येथे तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही इमारती मिनी मंत्रालयासारख्या सुसज्ज व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नेर (नवाबपूर) येथे दोन्ही तहसील व पंचायत समिती प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, शाखा अभियंता भुपेश कथलकर, कंत्राटदार मनिष कासलीकर आदी उपस्थित होते. नेर शहरातील दोन्ही इमारतींचे बांधकाम मजबुत करा, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, वीज बचतीकरीता इमारतींमध्ये सोलरची व्यवस्था करा. एक आगळी-वेगळी इमारत तयार करून लोकसेवेचे काम या इमारतींमधून झाले पाहिजे. सीसीटीव्ही, मोक

पोहरादेवीला आंतरराष्ट्रीय वनपर्यटन साकारण्यासाठी वनमंत्री राठोड यांची मध्यप्रदेश, बिहारला भेट

Image
यवतमाळ, दि. 20 : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी (जि. वाशीम) येथील वनपर्यटन विकासाच्या अनुषंगाने नुकतीच मध्यप्रदेश ट्रायबल म्युझिअम येथे भेट दिली. येथील आदिवासींच्या   संग्रहालयास   भेट देऊन याच धर्तीवर पोहरादेवी येथे   बंजारा समाजाचे म्युझिअम उभारण्याबाबत पडताळणी केली. पोहरादेवी विकास आराखड्यात देशातील विविध समाजच्या धर्तीवर नाविन्यपूर्ण बाबी समाविष्ट करण्यासाठी संजय राठोड यांनी मध्यप्रदेश, बिहारमधील पटणा येथे भेट देऊन पाहणी केली. पोहरादेवी तीर्थक्षेत्र हे राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाचे व्हावे, यासाठी    श्री .राठोड यांनी प्रथमपासूनच प्रयत्न चालविले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भोपाळ येथील भारतीय वन प्रबंध संस्थानमध्ये भेट देऊन येथील कामकाज समजून घेतले. वनांसंदर्भात संशोधन व अभ्यास करणारी देशातील ही एकमेव संस्था आहे. या भेटीत वनमंत्री श्री राठोड   यांनी महाराष्ट्रात शेतीस लागून असलेल्या जंगलामधून येणारे रोही,   रानडुक्कर आदी वन्यप्राणी यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास व शेतीचे होणारे नुकसान यावर काही प्रतिबंध करता येईल का, यावर काही ठोस उपाययोजना करता ये

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देवून खर्चाचे नियोजन करा

Image
जिल्हा नियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सूचना यवतमाळ दि.18, शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला तर शेतकरी आत्महत्या होणार नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनचा निधी खर्च करतांना शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल या हेतुने कामांचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्‍हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आज (दि.१८)अधिकाऱ्यांना दिल्या.             जिल्हा वार्षिक योजनेच्या   सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्री, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, तसेच संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.             जिल्हा योजनेअंतर्गत प्राप्त निधी प्राधाण्याने खर्च करण्याचे व गुणवत्तापुर्ण कामे करण्याचे तसेच ज्या कार्यालयांनी अद्यापही प्रस्ताव पाठविले नाही त्यांनी तो त्वरेने पाठविण्याचे जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिका

किशोर तिवारी यांनी घेतली आढावा बैठक

Image
यवतमाळ दि. 17 : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आढावा बैठक घेतली, यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्री. तिवारी म्हणाले, राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि गरीब व गरजू नागरिकांना स्वस्तात भोजन उपलब्ध व्हावे याकरीता शिवभोजन योजना सुरु केल्या आहेत. या दोन्ही योजना अतिशय महत्वकांक्षी असून अधिकाऱ्यांनी या योजनांची गांभिर्याने अंमलबजावणी करावी. आगामी हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी काळजीपूर्वक काम करावे. तसेच ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने लक्ष द्यावे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून मोबदला उपलब्ध करून द्यावा. बळीराजा चेतना अभियानामार्फत जमीनीतला ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शासनाची प्रतिमा मलिन

शेतकरी कर्जमुक्ती : जिल्ह्यात डाटा अपलोडचे 95 टक्के काम पुर्ण

Image
यवतमाळ दि.17, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांची महत्वपुर्ण भूमिका असून जिल्ह्यातील बँकेमार्फत शेतकऱ्यांचा डाटा अपलोडींगचे कामे सकारात्मक आहेत, मात्र प्रलंबित कामे पुढील तीन दिवसात तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रीकर यांनी बँकर्सच्या बैठकीत बँक प्रतिनिधीना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकरी कर्जमाफी संबंधात बँकेकडून झालेल्या कामाचा आढावा अपर जिल्हाधिकारी महिंद्रीकर यांनी घेतला. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अग्रणी बँकेचे जिल्हा उपप्रबंधक सचिन नारायणे तसेच सेंट्रल बॅक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, आयडीबीआय बँक,युको बँक, सिंडीकेट बँक, कॅनरा बँक व विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कर्जमाफीसाठी पथदर्शी कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातून राळेगाव व दिग्रस या दोन गावातील शेतकऱ्यांच्या याद्या सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात येणार आहे तेव्हा कामाची गती वाढविण्याबाबतही अपर जिल्हाधिकारी महिंद्रीकर यांनी बँकर्सना सुचित केले. जिल्ह्यातील 1,07,971 पात्र शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत (दि.17) 95 टक्के म्ह