Posts

Showing posts from June, 2018

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी - पालकमंत्री मदन येरावार

Image
v कळंब येथे स्वयं सहायता समुह व ग्राम संघांना 6 कोटींचे धनादेश वाटप v बचत गटांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्राची इमारत यवतमाळ , दि. 30 : देशातील लोकसंख्येच्या 50 टक्के वाटा महिलांचा आहे. आजची महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांच्या हाती पैसा असला की मुलांचे शिक्षण, कुटुंबाची गरज आदींचे चांगल्या प्रकारे नियोजन होते. कुटुंबाच्या बाहेर महिलांनी पाऊल टाकले आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावाचे आर्थिक नियोजन त्या करीत आहेत. एकप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कळंब येथील मोरया सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित उमेद, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहायता समुह व ग्रामसंघांना निधीचे वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, कळंबच्या पं.स. सभपती संजीवनी कासार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचाल

जिल्ह्यात वृक्ष लागवडीकरीता 60 लक्ष रोपे उपलब्ध

Image
v 13 कोटी वृक्ष लागवडीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ यवतमाळ , दि. 30 : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. यात यवतमाळ जिल्ह्याला 59.17   लक्ष वृक्ष लागवडीचे उदिृष्ट देण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यात 60.03 लक्ष रोपे लागवडीकरीता उपलब्ध आहेत. वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते 1 जुलै रोजी होणार आहे. वनविभागाच्या वतीने शहरालगत विकसीत होत असलेल्या ऑक्सीजन पार्कवर होणार ‘माझं यवतमाळ, माझं झाड’ या संकल्पनेतून एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 14 लक्ष 17 हजार हेक्टर असून जिल्ह्याचे वनक्षेत्र 2 लक्ष 18 हजार हेक्टर आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 16 टक्के वनाच्छादन जिल्ह्यात आहे. पर्यावरणाचे संतुलन व समतोल राखण्यासाठी आणि टिकविण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी 33 टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार करून शासनाचे विविध विभाग व जनेतेच्या सहभागातून संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्ष लागवड हा महत्वाकांक्षी कार्

वीज बचतीसाठी पालिका क्षेत्रातील पथदिवे ‘एलईडी’ ने उजळणार

Image
v सर्व पालिकांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ईएसएल कंपनीसोबत करार यवतमाळ , दि. 2 9 : विजेची बचत ही काळाची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात असलेले पथदिवे आता ‘एलईडी’ ने उजळणार असून यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घेतला आहे. वीज बचत व सोबत लख्ख प्रकाश मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पालिकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एनर्जी इफिशिएंन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईएसएल) या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत ग्रेटर नोएडा स्थित ईएसएल कंपनीचे महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक नरेंद्र सैनी आणि यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, लोकप्रतिनिधीसोबतच शहराच्या विकासात पालिका मुख्याधिका-यांची भुमिका महत्वाची आहे. शहर विकासाचा आराखडा ब

बचत गटांमुळे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण - केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर

Image
v घाटंजी येथे महिला बचत गट व ग्राम संघांना 5 कोटींचे धनादेश वाटप यवतमाळ , दि. 28 : ग्रामीण भागातील महिला कमी शिक्षित असल्या तरी त्यांचे व्यवहारीक ज्ञान चांगले असते. कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासोबतच महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना गावाचे अर्थज्ञान अवगत होते. महिलांमुळे गावात बचत गटांची चळवळ चांगलीच फोफावली आहे. शासनही महिला बचत गटांच्या पाठीशी उभे आहे. एकप्रकारे हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. घाटंजी येथील संत गजानन महाराज सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गट व ग्राम संघांना निधीचे वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, घाटंजीच्या पं.स. सभपती कालिंदा आत्राम, पांढरकवडा येथील पं.स. सभापती इंदु मिसेवार, झरीजामणी येथील पं.स. सभापती लता मिसेवार आदी उपस्थित होते. महिला बचत गटाचे काम अ

प्रत्ये क गावासाठी ‘कर्जवाटप पालक अधिकारी’ - जिल्हाकधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v कुठलाच पात्र शेतकरी वं चि त राहता कामा नये यवतमाळ , दि. 28 : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात मान्सूनचेसुध्दा आगमन झाले आहे. शेतीच्या या हंगामात जिल्‍हयातील कुठलाच पात्र शेतकरी पीक कर्जापासून वं चि त राहू नये , यासाठी आता गावनिहाय कृषी सहायक , तलाठी आणि ग्रामसेवक यांची ‘ कर्जवाटप पालक अधिकारी ’ म्हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. गावातील कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करावी. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे आदेश डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना दिले आहे.      शेतक-यांची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. अशावेळी शेतक - यांना बॅंकांकडून तातडीने कर्ज पुरवठा व्‍हावा , यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील बॅंकांच्‍या शाखा स्‍तरावर ‘ अर्ज द्या , कर्ज घ्‍या ’ मेळाव्‍याचे आयोजन   करण्यात आले होते. सदर मेळावे 20 , 26 व 27   मे रोजी तसेच 20   जून रोजी   घेण्यात आले. मात्र तरीसुध्दा अनेक पात्र शेतकरी खरीप पीक कर्जापासून वं चि त आहेत. अशा शेतक-यांना कर्ज मिळवून देण्यासाठी ग्रामस्‍तरावर नेमून दि

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ९१ टक्केस जमीन संपादीत

Image
भू-धारकांना ३३८ कोंटींचे वाटप              यवतमाळ , दि. २८ : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्‍हयातील १०३८.१८ हेक्‍टर जमीन संपादित करण्‍यात आली आहे. ही टक्केवारी 91 असून   लवकरच सं पूर्ण जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या ज मि नी चा मोबदला म्हणून भू-धारकांना ३३८ कोटी 33 लाख रूपयांचे वाटप करण्‍यात आले आहे.             या रेल्‍वे प्रकल्‍पातील पहिला टप्‍पा वर्धा ते यवतमाळ मार्गावरील जमीन संपादीत करण्‍याचा आहे. हा टप्‍पा पूर्ण करण्‍यात आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्‍प जवळपास ३ हजार १६८ कोटी रूपयांचा असून यवतमाळ पर्यंतची संपूर्ण जमीन रेल्‍वे विभागाला हस्‍तांतरीत करण्‍यात आली आहे. पुढील जमीन हस्‍तांतरीत करण्‍याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.    यवतमाळ जिल्ह्यातील कळंब , यवतमाळ , दारव्‍हा , पुसद , दिग्रस , उमरखेड या सहा तालुक्यातील एकूण ११४४ हेक्टर ८५ आर जमीन संपादित करण्‍यात येणार आहे. यापैकी १०४३.१८ हेक्‍टर म्‍हणेजच ९१ टक्‍के जमीन संपादीत करण्‍यात आली आहे. यवतमाळ जिल्‍हयात या

शासनाची अनेक धोरणे राजर्षी शाहूंनी दाखविलेल्या मार्गानुसार - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिन यवतमाळ, दि. 26 : आदर्श राज्य कसे चालवावे, याची प्रत्यक्ष कृतीतून शिकवण देणारे राजर्षी शाहू महाराज हे ख-या अर्थाने लोकराजे होते. समाजात समतेची, न्यायाची अंमलबजावणी करणारे त्यांचे पहिले   राज्य होते. शासनाच्या अनेक धोरणांची वाटचाल शाहू महाराजांनी दाखविलेल्या मार्गानुसार सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, खनिकर्म अधिकारी श्री. गोसावी उपस्थित होते. समाज घटकांशी निगडीत अनेक महत्वाचे निर्णय शाहू महाराजांनी घेतले, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशा पालकांना त्यांनी दंडसुध्दा ठोठाविला. स्त्री शिक्षणाच्या प्रसार, अस्पृश्यता निर्मुलन, प्रत्यक्ष व्यवसाय शिक्षणाची सुरूवात, दुर्बल घटकांना आरक्षण, पुनर्विवाहाचा कायदा

सामाजिक समतेच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे - जि.प. अध्यक्षा माधुरी आडे

Image
v सामाजिक न्याय दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव यवतमाळ, दि. 26 : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. यात आरक्षण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, अस्पृश्यता निर्मुलन आदींचा समावेश आहे. त्यांनी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारांची आजही आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे, न.प.आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, अनिल आडे आदी उपस्थित होते. शाहू महाराज हे सामाजिक