Posts

Showing posts from August, 2016
Image
आपत्ती व्यवस्थापनातर्फे जनजागृती प्रशिक्षण             यवतमाळ, दि. 31 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत एनडीआरएफ तळेगाव, पुणेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एनडीआरएफची 25 व्यक्तींने प्रशिक्षण आणि रंगीत तालीम दि. 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणादरम्यान दि. 29 ऑगस्ट रोजी लोहारा एमआयडीसी येथील राणा इंडस्ट्रीज येथे औद्योगिक अपघात, आपत्तीबाबत रंगीत तालीम केली. रंगीत तालीममध्ये कारखान्यामधील आग लागण्याची कारणे, उपलब्ध रसायनांमुळे होणारा अपघात, त्याला द्यावयाचा प्रतिसाद, अपघात होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत एनडीआरएफने रंगीत तालीममधून दाखविले.             यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख उपस्थित होते. रंगीत तालीममध्ये फायर ब्रिगेड, नगर परिषद, 108 ॲम्बुलंस, शल्य चिकित्सक, वाहतूक पोलिस विभागातील चमू, बीडीएस स्कॉडची चमू, जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथक आदींनी रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला. एमआयडीसी महाव्यवस्था
‘यवतमाळ का राजा’तर्फे सकस आहार वाटप यवतमाळ, दि. 31 :  येथील यवतमाळ का राजा नवयुवक गणेश उत्सव मंडळातर्फे 500 एचआयव्हीसह जगणाऱ्या 500 बालकांना सकस आहाराचे वाटप दि. 6 ते 13 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. एचआयव्ही संसर्गीत, प्रभावित अनाथ आणि असुरक्षित बालकांना प्राधान्याने पोषक आहार, आरोग्य, शिक्षण, सामाजिक संरक्षण आणि कल्याणकारी सेवा उपलब्ध करून देण्याकरीता कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्टच्या विशेष प्रकल्पांर्गत जिल्ह्यात DAPCU यवतमाळच्या समन्वयाने सुरु आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना नियमित सकस आहार, प्रथिनेयुक्त अन्नाची नितांत आवश्यकता असते. बालकांची ही गरज लक्षात घेता DAPCU Nutrition support Unit for CABA स्थापन करण्यात आले आहे. पथक विविध सामाजिक संस्था, क्लब, मंडळ इत्यादीच्या सहकार्याने कार्यक्रम घेते. DAPCU Nutrition support Unit for CABA आणि OVC social protection project Vihaan अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे अशी बालके पहिला वाढदिवसही साजरा करु शकत नाही. अशा बालकांना नियमितपणे सकस आहार मिळ
दोन दिवस मद्यविक्री बंद यवतमाळ, दि 31 : पोळा आणि तान्हा पोळा दि. 1 आणि 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दिनांक 1 आणि 2 सप्टेंबर रोजी मद्यविक्रीच्या सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या दिवशी मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 00000
चर्मकार समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण योजना यवतमाळ, दि. 31 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने  चर्मकार समाजातील मुला, मुलींसाठी व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने  प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करणारी संस्था व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसेच, व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून मान्यताप्राप्त अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. संस्था सलग पाच वर्षांपासून कार्यरत असावी. तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिले आहे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती प्रशिक्षणार्थींना स्वत:चा व्यवसाय सुरू केला किंवा नोकरी मिळाली आहे काय, एकुण प्रशिक्षणार्थीपैकी 30 टक्के महिला असणे आवश्यक आहे. संस्थेस ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची मान्यता आहे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल, जॉब प्लेसमेंटची काय
माजी सैनिक, पत्नी, पाल्‍यांसाठी विशेष गौरव पुरस्कार यवतमाळ, दि. 31 : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कारप्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कारप्राप्त, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाच पाल्यांना विभागीय पातळीवर 10 हजार रुपयाचा विशेष गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. पात्र इच्छुकांनी आपले अर्ज संबंधित कागदपत्रांसह दिनांक 15 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे पाठवा
ऑगष्ट महिन्याचे अन्नधान्याचे परिमाण व दर जाहीर यवतमाळ, दि. 31 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाचे ऑगष्ट महिन्याचे अन्नधान्याचे दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. निर्धारीत दर व परिमाणानुसार वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केल्या आहे.             कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेले गहू, तांदुळ, साखर, तुरडाळ, केरोसीनचा यात समावेश आहे. बीपीएल, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल शेतकरी तसेच कल्याणकारी संस्था व वसतीगृहांसाठीच्या दरांचा यात समावेश आहे. शिधापत्रिकाधारकांना देय असलेल्या प्रमाणात तातडीने या वस्तूंचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. ज्या व्यक्तींनी धान्याची उचल केली नसेल त्यांना पुढील महिन्यात धान्य वाटप करावयाचे आहे. धान्यवाटप चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 000000
रोहयोच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण प्राधिकरी नियुक्त यवतमाळ, दि. 31 : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी शासनाने तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी एन. एस. ठाकरे, तक्रार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, मोबाई क्रमांक 7776967958 येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी, मजूर आणि नागरीकांनी तक्रारी पाठवाव्यात, या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 00000
जंतनाशक मोहिमेच्या तारखेत बदल यवतमाळ, दि. 31 : राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि. 2 आणि 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार होती, मात्र या कालावधीत सण येत असल्यामुहे ही मोहिम 7 आणि 20 सप्टेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. दि. 2 आणि 7 सप्टेंबर दरम्यान पोळा, गौरी, गणपती आदी सणांच्या सुट्ट्या येत असल्यामुळे या मोहिमेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दि. 7 आणि 20 सप्टेंबर रोजी 1 ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी, शाळा आणि शाळाबाह्य मुलांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात येणार आहे. याची नोंद नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत यांनी केले आहे. 00000
मंगळवारी लोकशाही दिन यवतमाळ, दि. 31 : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे जिल्हास्तरावरील लोकशाही दिन मंगळवारी, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000
शनिवारी केबल ऑपरेटर निवडीसाठी   सोडत यवतमाळ, दि.   31   :   राज्यातील   प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर   आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड   शनिवारी,   दि. 3 सप्टेंबर रोजी अमरावती येथील   विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह क्रमांक   1   येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार   आहे. सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर   आणि   बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. 00000
सातारा येथील मेस्को ॲकॅडमी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ येथे सहा जानेवारी 2017 रोजी नागपूर विभागाची सैन्य भरती होणार आहे. या सैन्यभरतीसाठी सातारा येथील मेस्को करीअर ॲकॅडमीच्या वतीने भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सातारा, करंजे नाका येथील ही ॲकॅडमी राज्य शासनाचा एक उपक्रम आहे. या ठिकाणी अल्प दरात सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये मैदानी आणि लेखी परीक्षेच्या तयारी करून देण्यात येणार आहे. तसेच ॲकॅडमीमध्ये निवास आणि भोजनाची सुविधा आहे. त्यासाठी मासिक शुल्क सहा हजार 500 रूपये इतके आकारल्या जाणार आहे. हे शुल्क प्रवेश घेतेवेळी भरावे लागणार आहे. अधिक माहिती महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या (मास्को) www.mescoltd.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 7588624043 व 9168986864 या क्रमांकावर साधता येऊ शकेल. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी केले आहे. 000000
सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी यवतमाळ, दि. 30 :   जिल्ह्यात दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पो लि स अधिनियमातील तरतुदी नुसार प्रतिबंध आदेश लागू करण्यात आ ले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पो लि स कायदा 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे. 00000
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत यवतमाळ, दि. 30 : अनुसूचित जातीच्या नवबौद्धासह 100 विद्यार्थ्यांना सन 2016-17 या वर्षात देशातील नामांकीत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in , www.sjsa.maharashtra.gov.in ,   www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून दि. 31 ऑगस्टपर्यंत आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करावयाचा आहे. योजनेसंबंधी सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे. 00000
गरोदरपणात मातेने काळाजी घ्यावी -डॉ. टी. जी. धोटे यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदरमातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदरमातेने गरोदरपणात खालील प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी उपाययोजना सांगितल्या आहे. बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणाततच काळजी घ्यावी. गरोदरमातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदरमातेने गरोदरपणात दोन टीटीचे इजेक्शन, लसीकरण डोज घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18 आठवड्यात बाळामध्ये काही व्यंगत्व तपासण्यासाठी असते. व्यंग असल्यास कि
उत्पादनशुल्कच्या छाप्यात 1 लाखाचा मुद्देमाल जप्त *15 गुन्ह्यांची नोंद, आठ आरोपींना अटक यवतमाळ, दि. 30 : राज्य उत्पादन शुल्कच्या यवतमाळ विभागाने सोमवारी अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध राबविलेल्या छाप्यात एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 15 गुन्ह्यांची नोंद तर आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्‍क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी ही मोहिम राबविली. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात छापे टाकून एक लाख 4 हजार 709 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एका दुचाकीचा समावेश आहे. या मोहिमेत 2565 लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. अवैध विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्कला मिळालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत भारी शिवार, करडोह, वाघापूर, गोधणी, लोहारा, डेहणी, माणिकवाडा, किन्ही, कृष्णनगर, काळी दौलत, हुडी, मधुकरनगर, मोहदा, राळेगाव, रावेरीरोड, सिंघला, झरीजामणी, वणी, वरोरा रोड आदी गावांचा समावेश आहे. या कारवाईत निरीक्षक ए. बी. झाडे, यू. एन. शिरभाते, दुय्यम निरीक्षक एस. एन. भ
Image
अवयवदान करू, मृत्यूनंतरही जिवंत राहू * जनजागृती रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद * अभियानानिमित्त आज विविध स्पर्धा यवतमाळ, दि. 30 : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी तीन दिवसीय महाअवयवदान अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आज पोस्टल मैदानातून रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत अवयवदानाबाबत सामान्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.डी.भगत उपस्थित होते. पोस्टल मैदान येथे सुरु झालेली ही रॅली मैदानाला वळसा घालत एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रामभवन या मार्गाने फिरत रॅली वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतृगृहात विसर्जित झाली. शुभारंभाप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिंद्र प्
आजपासून अवयवदानाचा महायज्ञ             यवतमाळ, दि. 29 : देशभरात सुमारे पाच लाख मुत्रपिंड, 50 हजार यकृत आणि दोन हजाराहून अधिक रूग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहे. राज्यात सुमारे 12 हजार रूग्णांना विविध अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत पंतप्रधानांनी टाकलेल्या विचाराने प्रेरीत होऊन राज्यात महाअवयवदान अभियान मंगळवार, दि. 30 ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या प्रयत्नामुळे अवयवदानासाठी प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात येणार आहे. रक्त आणि नेत्रज्ञानासाठी अनेक जण समोर येत असल्याने आज समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अवदानाची ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवून समाजाचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर मृत्यूनंतर करावयाच्या अवयवदान भारतात अत्यल्प आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जनजागृतीतून अवयवदानाबाबत आमुलाग्र बदल घडवून आणावयाचा आहे. यासाठी 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान महा अवयवदान शिबिर राज्यभर घेण्यात येणार आहे. जिवंत किंव
परीक्षांबाबत बुधवारची संयुक्त सभा रद्द             यवतमाळ, दि. 29 : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांबाबत मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची बुधवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी नंदूरकर माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेली संयुक्त सहविचार सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. याची नोंद मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी घ्यावी, सभेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे. 00000
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन *नुतनीकरण करण्याची आवश्यकता यवतमाळ, दि. 29 : समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, फ्रीशीप, शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विद्यावेतन, परराज्य शिष्यवृत्ती आणि सैनिक शाळांचे अर्ज भरणे आणि महाविद्यालयांच्या नुतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरणे आणि महाविद्यालयांनी नुतनीकरण करण्यासाठी सन 2016-17 साठी  mahaeschool.maharashtra.gov.in  हे संकेतस्थळ सुरु झाले आहे. सर्व लाभधारकांनी ऑनलाईन अर्ज भरावे, तसेच महाविद्यालयांनी नुतनीकरण करावे, तसेच भरलेले अर्ज हार्ड कॉपी आणि स्टेटमेंट बी रिपोर्टसह समाज कल्याण विभागाकडे त्वरीत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. 00000
महाअवयवदान अभियानाची आजपासून सुरुवात * मंगळवारी वाकेथॉन, महाफेरीने शुभारंभ * जनजागृतीसाठी कार्यशाळा, विविध स्पर्धा * अवयवदान केलेल्यांचा होणार सन्मान यवतमाळ, दि. 29 : अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 30 ऑगस्ट ते दि. 1 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाअवयवदानाची सुरुवात मंगळवारी दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता वाकेथॉन, महाफेरीने हेाणार आहे. या अभियानात कार्यशाळा, चर्चासत्रे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. मंगळवारी दि. 30 ऑगस्ट रोजी वॉकेथान महाफेरीचा सकाळी 8 वाजता पोस्टल ग्राऊंड येथून पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आदींच्या उपस्थित शुभारंभ होईल. ही महाफेरी पोस्टल ग्राऊंड, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्कीट हाऊस, वैद्यकीय महाविद्यालय, श्रोतगृह या मार्गाने निघणार आहे. यामध्ये साधारणत: पाच हजार नागरीक सहभागी होतील. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये या महाफेरीचा सकाळी 9 वाजता समारोप होईल. याच ठिकाणी पावर प्रेझेंटेशनद्वारे अवयवदानासंबंधात माहिती दिली जाईल. बुधवारी, दि.31 ऑगस्ट रोजी का
Image
बालकांच्या लैंगिक शोषणाविरूद्ध उभी राहतेय नवीन यंत्रणा *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार *सर्व जिल्हास्तरीय विभागांचा सहभाग *लैंगिक अत्याचार रोखण्यावर देणार भर ….. अशा सूचविल्या उपाययोजना * समाजात जागरूकता घडविण्यासाठी विविध उपक्रमांतून जाणीव निर्माण करावी. * बालकांच्या नात्यात आपुलकी निर्माण करून अत्याचाराचे प्रकार समोर आणावेत. * शाळांमध्ये असणारे सध्या असणाऱ्या उपक्रमांना अधिक समक्षम करावे. उदा. मिना राजू मंच. * बालकांसाठी असलेले कायद्याच्या माहितीसाठी शिक्षण आणि संवाद प्रणाली उपयोगात आणवी. *या सर्व प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक नियंत्रण समिती स्थापन करण्यात यावी. ..... यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात बालकांवर होणारे लैंगिक अत्याचाराबाबत साततत्याने प्रकरणे घडत आहे. शाळा आणि शाळेबाहेरही अशा स्वरूपाची प्रकरणे समोर येत असल्याने बालकांचे लैंगिक शोषण होऊ नये, यास प्रतिबंध लागावा, अशा प्रकारांची माहिती तातडीने मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. यात प्रामुख्याने बालक, पालक आणि शिक्षकांना जाणीव जागृती करून देण्यासाठी जिल्
Image
प्रधानमंत्री आवास योजनेतून पात्र, गरजवंत लाभार्थी सुटू नये -           पालकमंत्री संजय राठोड दिग्रस येथे सरपंच व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा यवतमाळ, दि.27 : गरजवंतांना हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षीपासून सुधारीत स्वरूपात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतंर्गत पात्र, गरजवंत आणि खरे लाभार्थी सुटू नये, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. दिग्रस येथील चिरडे मंगल कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, पंचायत समिती सभापती संगिता राठोड, उपसभापती कल्पना जाधव, सदस्य अमोल मोरे, प्रमिला इंगोले, तहसिलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी राजनंदीनी भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित राठोड, विस्तार अधिकारी प्रभाकर पांडे आदी उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यास
शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे * समाज कल्याण विभागाचे आवाहन यवतमाळ, दि.24 : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या http://mahaeschol.maharashtra. gov.in  या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेनंतर विद्यार्थ्यांनी आपला मागास प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, रहिवास, उत्पन्न मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला या विषयाचे पुरावे महाविद्यालयास सादर करणे अनिवार्य आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परिक्षा फीसाठी पात्रता निश्चित होते. पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती (निर्वाह भत्ता) हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर आणि शिक्षण फीची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा
 कुराश, जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धाच्या तारखेत बदल यवतमाळ, दि.24 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कुराश व जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दिनांक 29 आणि 30 ऑगस्ट या दिवशी निश्चित करण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तर कुराश या क्रीडा स्पर्धा दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट या दिवशी बि.बि.आर्ट कॉलेज, दिग्रस येथे तसेच जिल्हास्तर जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट 2016 या दिवशी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे करण्यात येत आहे.  त्यानुसार सर्व स्पर्धक/खेळाडू तसेच विद्यालय व महाविद्यालय यांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे. 00000000
Image
पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडून मुधोळकर कुटुंबियांचे सांत्वन * कुटुंबियांना 40 हजारांची मदत यवतमाळ, दि. 26 : आर्णी तालुक्यातील शेलू शेंदूरसनी येथील मुधोळकर कुटुंबियांची आज पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन सांत्वन केले. शेलूशेंदुरसनी येथील काशिनाथ मुधोळकर आणि अनिल मुधोळकर या दोघा वडील आणि मुलाने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नापिकी आणि यावर्षीचे पिक चांगले येणार नसल्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस आणि सांत्वना करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेलू येथील त्यांच्या राहत्या घरी भेट दिली. पालकमंत्री श्री. राठोड यांनी मुधोळकर कुटुंबियांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती घेतली. मुधोळकर कुटुंबियांनी पालकमंत्र्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मालकीची असलेली 5 एकर जमिन वाहत असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पिक आले नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली असल्याचे सांगितले. तसेच यावर्
खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दिनांक 30, 31 ऑगस्ट रोजी समायोजन यवतमाळ, दि.24 : खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे 30 आणि 31 ऑगस्ट रोजी समायोजन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे. खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती edustaff.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर भरलेली आहे. त्यानुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले त्यांची यापुर्वी मुख्याध्यापक, संस्थाप्रतिनिधी संबंधीत शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार शाळास्तरावर/संस्थास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची निश्चिती करून देण्यात आली. दिनांक 24 ऑगस्ट त्या संबंधीत डाटा फायनालाईज करून शिक्षणाधिकरी (माध्य), जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यालयात अतिरिक्त ठरणाऱ्या व रिक्त पदांची यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार संबंधीत यादीत काही त्रुटी असल्यास आणखी आक्षेप असल्यास संबंधीतांनी आक्षेप दिनांक 27 ऑगस्ट पर्यंत शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यालयात सायं 5 वाजेपर्यंत सादर करावे. संबंधीतांची हरकतीवर दिनांक 28 ऑगस्ट ला पुनश्च सुनावणी घेवून अंतीम डाटा
Image
अवयवदान ही जनतेचे अभियान व्हावे - पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ, दि. 26 : राज्य शासनाने अवयवदानाचे महत्त्व ओळखून अवयवदानाची चळवळ राज्यात उभी केली आहे. प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरीकांना अवयवदानाची माहिती पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरीकांचा यात सहभाग वाढावा, अवयवदानाची ही चळवळ जनतेचे अभियान व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत आयोजित महाअवयवदान अभियानासंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, अधिष्ठाता अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगत, सुधा राठी आदी उपस्थित होते. श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात अवयवदानाचे चांगले नियोजन व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असंख्य नागरीक अवयवदानासाठी तयार असतात, परंतु त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पुरविली जात नाही. त्यामुळे हे अवयवदान अभियान राबविताना गावागावात जाऊन गावा