अवयवदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम
यवतमाळ, दि. 25 : अवयवदान जनजागृतीसाठी दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. 30 ऑगस्ट रोजी वाकेथान, महाफेरीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच अवयवदान जागृतीसाठी महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी कार्यशाळा, चित्रकाला, निबंधस्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गुरूवारी, दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबिराचे उद्घाटन आणि अवयवदान नोंदणी केलेल्या दात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी