अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्कचे छापे
*सव्वापाच लाखांचा माल जप्त
*एका महिन्यात 91 गुन्ह्यांची नोंद
यवतमाळ, दि. 11  : जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून जुलै महिन्यात 91 गुन्हे नोंदविले असून 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यात सुमारे सव्वापाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कने प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवैध दारूविक्रीविरूद्ध मोहिम राबविली. यात भारी, करहोड, वाघापूर, गोदणी, लोहारा, डेहणी, माणिकवाडा, किन्ही, कृष्णनगर, काळी दौलत, हुडी, मधुकरनगर, मोहदा, राळेगाव, रावेरीरोड, सिंघला, झरीजामणी येथे कारवाई करण्यात आली. यात सुमारे साडेतीन लाख रूपयांचा मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यात आला. मुद्देमालामध्ये दोन दुचाकींचाही समावेश आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. बी. झाडे, दुय्यम निरीक्षक यू. एन. शिरभाते, एस. एन. भटकर, श्री. पवार, ए. ए. पठाण, एस. जी. घाटे, एन. डी. दहेलकर, एम. रामटेके, महेश खोब्रागडे, एस. दुधे, श्री. मसराम, श्री. मनवर, श्री. मेश्राम यांनी ही कारवाई केली.
पेसा कायद्यानुसार करंजीचा बार बंद
            पेसा कायद्यानुसार ग्रामसभेला त्यांच्या क्षेत्रातील दारूबंदीचे अधिकार दिले आहेत. या अधिकाराचा वापर करून करंजी रोड येथील अनुज्ञप्तीधारकाला ग्रामसभेने ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्याने हे दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानुसार हे दुकान बंद करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल