बास्केटबॉल, हॉकी क्रीडा स्पर्धांच्या तारखेत बदल
यवतमाळ, दि.24 : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा सन 2016-2017 चे आयोजन राज्यस्तर  बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर असल्याने दि. 26 आणि 27 ऑगस्ट तसेच  नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 30ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.
अभ्यंकर हायस्कूल, यवतमाळ आणि जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जयहिंद क्रीडा मंडळ, यवतमाळ, त्याचप्रमाणे जिल्हास्तर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. जिल्हास्तर रायफलशुटींग क्रीडा स्पर्धाचे आयोजन 10 आणि 11 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे.यांची नोंद सर्व स्पर्धक,खेळाडू तसेच विद्यालय व महाविद्यालयांनी घ्यावी, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी