कापरा येथे जलयुक्तचे जलपूजन
यवतमाळ, दि. 15 : राज्य शासनाच्या वतीने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. या योजनेचे दृश्य परिणाम यावर्षीपासून दिसू लागले आहे. नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी आज कापरा येथे जलयुक्त शिवार योजनेतून निर्माण झालेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन जलपुजन केले.
यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, यावर्षीच्या पावसाळ्यात कोपरा येथील शिवारात चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. शासनाने घेतलेल्या पुढाकाराने प्रत्येक हेक्टरमागे एक टीसीएम पाणीसाठा निर्माण होणार आहे. परिणामी जिल्ह्यातील रब्बीवरील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून रब्बीचे क्षेत्र वाढवावे. गेल्या वर्षी 413 आणि यावर्षी 225 गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हे अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात जणवणारी पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यासोबतच या बंधाऱ्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी फळबागा तयार केल्यास निर्माण झालेल्या जलसाठ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी