Posts

Showing posts from August, 2017

खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग - पालकमंत्री येरावार

Image
यवतमाळ , दि. 29 : देशाची ओळख ही स्वास्थावर ठरत असते. देश सुदृढ ठेवायचा असेल तर युवापिढीचे स्वास्थ चांगले असणे आवश्यक आहे. स्वास्थाचा संबंध हा खेळाशी येत असतो. खेळामुळे मन निरोगी राहते. निरोगी मन राज्याला आणि देशाला प्रगतीपथवार नेऊ शकते. त्यामुळे खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दाते बीपीएड कॉलेज येथे क्रीडा भारती, हॉकी असोसिएशन, वुमेन्स स्पोर्ट क्लब, बाबाजी दाते क्रीडा अकॅडमी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप वडनेरकर होते. मंचावर अरविंद तायडे, हॉकी खेळाडू बबलू यादव, क्रीडा भारतीचे अध्यक्ष सतीश पाठक, महाविद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर, अनिल नायडू, राजेश गडीकर आदी उपस्थित होते. संगणक, व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या युगात मैदानी खेळ कमी होत आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्पर्धेत आपला पाल्य टिकावा यासाठी पालकांकडून नेहमी अभ्यासाचा तगादा सुरु असतो. आमच्या काळात खेळासाठी क्रीडांगणावर जाणे अनिवार्य होते.

अवयदानात महाराष्ट्र क्रमांक दोनवर – पालकमंत्री येरावार

Image
Ø जनजागृती अभियान समारोपात साधला संवाद Ø अवयवदानासाठी पालकमंत्र्यांनी भरला नोंदणी अर्ज यवतमाळ , दि. 29 : विदेशात अवयवदानाबद्दल लोकांमध्ये असलेली जनजागृती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळून बघितली. भारतातील नागरिकांनाही अवयवदानाचे महत्व पटावे, यासाठी केंद्र शासनाने अवयवदान जनजागृती अभियान सुरु केले. आपल्या राज्याने यात चांगले योगदान दिले असून आज अवयवदानात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, अभ्यागत मंडळाचे डॉ. फरात खान, प्रवीण प्रजापती, रेखा कोठेकर, माया शेरे, नितीन गिरी, जयंत झाडे उपस्थित होते. शासनाच्या अवयवदान कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले आहे. याबद्दल सर्वांचे कौतुक करून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्पेनमध्ये एक लक्ष लोकांमागे 100 नागरिक अवयवदान

उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्याला प्रथम पारितोषिक

Image
Ø मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लक्ष रुपयांचे बक्षीस यवतमाळ , दि. 28 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आज मुंबई येथे   महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौ न्सिलची तिसरी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी झालेल्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लक्ष रुपयांचा धनादेश यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि गणेशवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक मयुरी महातळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. ग्राम सामाजिक अभियानांतर्गत राज्यात प्रथम टप्प्यात 100 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या होत्या. यापैकी 23 ग्रामपंचायती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. यात कळंब तालुक्यात 10 ग्रामपंचायती, उमरखेड 4, नेर आणि पुसद प्रत्येकी 3, यवतमाळ 2 आणि घाटंजी येथील 1 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या 23 पैकी 20 ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात आल्यावर दि. 10 ऑगस्ट रोजी विशेष

सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील -गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

Image
यवतमाळ , दि. 26 :   स्वातंत्र्यपूर्व काळात 9 ऑगस्ट 1942 ला चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली  होती. पाच वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. याच धर्तीवर “ संकल्प से सिध्दी ” हे अभियान केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. 9 ऑगस्ट 2017 पासून या अभियानाला सुरुवात झाली असून 15 ऑगस्ट 2022 पर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांच्या विकासाचा ध्यास घेतला असून शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डॉ. नंदूरकर विद्यालयातील सत्यसाई क्रीडा रंजन येथे कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यामाने आयोजित “ संकल्प ते सिध्दी ” या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मदन येरावार तर  मंचावर आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोतकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पं.दे.कृ.विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी विज्ञान के

“संकल्प ते सिध्दी” मुळे देशाची विकासाकडे वाटचाल -पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 26 :   शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील शेतक-याला स्वाभिमानाने उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने नवनवीन तंत्रज्ञानासोबत अनेक योजना आणल्या आहेत. गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, कुपोषण, सांप्रदायिकता आदींपासून देशाला मुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे. त्यासाठी लोकांचेसुध्दा सहकार्य अपेक्षित आहे. “ संकल्प ते सिध्दी ” हे अभियान याचाच एक भाग आहे. या अभियानामुळे देशाची वाटचाल विकासाच्या नवीन पर्वाकडे होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. डॉ. नंदूरकर विद्यालयातील सत्यसाई क्रीडा रंजन येथे कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यामाने आयोजित “ संकल्प ते सिध्दी ” या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोतकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पं.दे.कृ.विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.

अवयव दानातून गरजू लोकांना जीवनदान द्या -पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 23 :   “ मरावे परी, अवयवदान रूपी उरावे ” ही संकल्पना नागरिकांनी मनात राबविणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. मृत्युनंतर आपल्या शरीरातील अवयव इतरांच्या उपयोगी पडू शकते. परिणामी कोणाचेतरी प्राण वाचविण्यात आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे गरजू लोकांना जीवनदान देण्यासाठी नागरिकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अशोक उईके, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्षा कांचन चौधरी, प्राचार्य डॉ. अशोक उईके, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, अभ्यागत मंडळाचे सदस्य जयंत झाडे, प्रवीण प्रजापती, माया शेरे, अमोल ढोणे उपस्थित होते. पालकमंत्री येरावार पुढे म्हणाले, रक्तदान आणि नेत्रदान याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्याचे परिणाम आपल्याला निदर्शनास येत आहे. आज लोक स्वयंस्फुर्तीने रक्तदान आणि नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेत असतात. अशीच जनजागृती अवयव दानाबाबत हो

पालकमंत्र्यांच्या हस्ते “आपला जिल्हा यवतमाळ” पुस्तिकेचे प्रकाशन

Image
यवतमाळ , दि. 16 :   यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “ आपला जिल्हा यवतमाळ ” या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी आदी उपस्थित होते. या संदर्भ पुस्तिकेत जिल्ह्याची पार्श्वभुमी, वैशिष्ट्ये, तालुक्यांची संख्या व क्षेत्रफळ, एकूण गावांची तसेच ग्रामपंचायतींची संख्या, तालुकानिहाय लोकसंख्या, नद्या, डोंगररांगा, वनक्षेत्र, वन्यजीव, अभयारण्य, शाळा- महाविद्यालये, जिल्ह्यात साजरे होणारे महत्वाचे सण, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, कृषी क्षेत्र, उद्योग, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व सर्वधर्मीय तीर्थस्थळे आदींची माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिका बहुरंगी स्वरुपात आहे.  000000

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø प्रमाणपत्र वाटप व डिजीटलायझेशन मध्ये जिल्हा अव्वल Ø कृषी महाविद्यालय, सिंथेटिक ट्रॅक, वातानुकूलीत अभ्यासिका उपलब्ध होणार Ø संगणकीकृत सातबारा आपले सरकार पोर्टलद्वारे उपलब्ध यवतमाळ , दि. 16 :   भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते. पुढे पालकमंत्री येरावार म्हणाले, शासन

केवळ शिक्षित नाही तर सुशिक्षित पिढी निर्माण करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 14 :   भारत हा युवकांचा देश आहे. देशातील 70 टक्के लोकसंख्या 25 ते 35 या वयोगटातील आहे. याचाच अर्थ कार्यक्षम युवक हा आपला मुख्य आधारस्तंभ आहे. आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी आई-वडील अथक परिश्रम घेत असतात. त्याची जाणीव मुलांनीही ठेवणे गरजेचे आहे. उज्वल भविष्यासाठी शाळा- महाविद्यालयांनी केवळ शिक्षित नाही तर  सुशिक्षित पिढी निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. मोहा येथील महर्षी विद्या मंदिरात चिंतामणीबाई श्रीरामजी व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर शाळेचे प्राचार्य एस.एन.तिवारी, निवृत्त मेजर जाधव, राजेंद्र टोडीवाल, मनोज व्यास, नगरसेविका सुजाता कांबळे, नगरसेवक विजय खडसे उपस्थित होते. पुढे पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. निसर्गाने आपल्याला मोफत पाणी, हवा, प्राणवायु या जीवनावश्यक वस्तु दिल्या. मात्र आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळेच आज ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आपल्यासमो

जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांचे समाधान करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 12 :   ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना ह्या जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून पोहचत असतात. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द आहे. जनसुविधा केंद्र हे नागरिकांसाठी आहे. त्यामुळे या केंद्रात काम करणा-यांनी नागरिकांना तत्पर सेवा देऊन त्यांचे समाधान करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणा-या सेवांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे उपस्थित होते. जनसुविधा केंद्राला शासनाने संगणक, प्रिंटर, वेब कॅमेरा आदी बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, काही ठिकाणी जागेचा प्रश्न राहू शकतो, तो लवकरच निकाली काढण्यात येईल. ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नसेल तर जिल्हा परिषदेने या केंद्रासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून नागरिकांन

सण, उत्सवाच्या काळात पोलिसांनी प्रशासन व जनता यामधील समन्वय साधावा – जिल्हाधिकारी एस.पी.सिंह

Image
यवतमाळ , दि. 11 : पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात सण आणि उत्सवाला सुरुवात होणार आहे. हे सण शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातारणात पार पाडण्यात पोलिसांची मोठी जबाबदारी  असते. त्यामुळे या काळात पोलिसांनी  प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधून आपले कार्य पार पाडावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिल्या. सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर जास्त लक्ष ठेवून कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोणतेही समाजविघातक कृत्य लोकांकडून होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्ष असावे. मिरवणुकीच्या काळात विसर्जनाच्या वेळी पाण्यात वाहून जाणे, इलेक्ट्रिक शॉक लागणे किंवा सेल्फी काढतांना पाण्यात पडणे आदी घटनेतून व्यक्तिचा मृत्यु होण्याची शक्यता असते. त्यामुळे या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आधीच

लोकशाही दिनात आलेल्या तक्रारी त्वरीत निकाली काढा -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

Image
यवतमाळ , दि. 7 : सामान्य नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कधीकधी एकच तक्रार सलगच्या लोकशाही दिनात सादर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत संबंधित अधिका-यांनी संवेदनशीलता दाखवून त्या त्वरीत निकाली काढाव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, लोकशाही दिन हा सामान्य नागरिकांसाठी आहे. आपल्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनातमार्फत त्या सोडविल्या जातात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्या विभागाची  प्रकरणे वारंवार प्रलंबित राहत असेल त्यांनी याबाबत संवेदनशीलता दाखवावी. लोकशाही दिनात दाखल झालेली तक्रार पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी निकाली निघण्यासाठी संबंधित अधिकारी – कर्मचा-यांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. यावेळी लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 10 तक्रार अर

जिल्हाधिका-यांनी पाठविले विभाग प्रमुखांना “फिल्डवर”

Image
पीक विमाबाबत सनियंत्रण करण्याच्या सूचना यवतमाळ ,   दि.   5   :   पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यासंदर्भात शासननिर्णय प्राप्त होताच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. पीक विमा योजनेबाबत जिल्ह्यातील विविध केंद्रावर सनियंत्रण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिका-यांनी फिल्डवर पाठविले. पीक विमा योजनेचे ऑफलाईन अर्ज आज (दि.5) सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सेतू केंद्र, महा-ऑनलाईन केंद्र, महा ई- सेवा केंद्र, सीएससी, आपले सरकार तसेच आदी जनसुविधा केंद्रात ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील केंद्रांवर काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणे, काही अडचण असल्यास संबंधितांना सूचना देणे, केंद्रावर सनियंत्रण ठेवणे आदींकरीता जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना तातडीने पाठविण्यात आले आहे. प्रत्येक टीमकडे पाच-सहा गावातील केंद्रांना भेट देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आज सर्व केंद्रांवर केवळ अर्ज स्वीकारून त्यांना पोचपावती द्यावयाची आहे. शेतक-यांकडू

कुष्ठरोग निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

Image
यवतमाळ ,   दि.03   :   कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे. कुटुंबातील व्यक्तींनी हा रोग लपविण्याचा प्रयत्न केला तर इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता आहे. असा प्रकार आपल्या कुटुंबासाठी जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आरोग्य यंत्रणा व संबंधित यंत्रणेने या रोगाच्या निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. कुष्ठरोगाबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज (दि.3) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कुटुंबातील सदस्याकडून किती मुलांना या रोगाची लागण झाली, ते त्वरीत कळविण्याबाबत आदेश देऊन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह म्हणाले, खाजगी डॉक्टरांकडून कुष्ठरोग रुग्णांची नावे व संख्या गोपनीय ठेवण्याच्या अटीवर आरोग्य विभागाने प्राप्त करून घ्यावी. एप्रिल ते जुलै 2017 या कालावधीत नवीन शोधलेल्या रुग्णांमध्ये 45 स्त्रियांना तसेच 9 मुलांना कुष्ठरोग असल्याचे निदर्शनास आले. हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुष्ठरोग निर्मुलनासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच संबंधित सर्व यंत्रणां