Posts

Showing posts from December, 2018

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Image
यवतमाळ, दि. 29 :   सन 2018-19 च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी व प्रारुप वार्षिक योजना सन 2019-20 च्या विकास क्षेत्रातील योजनांसाठी प्रस्तावित नियतव्यय संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री वजाहत मिर्झा, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री आदी उपस्थित होते. पांदण रस्ते हा प्रत्येक गावासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात पालकमंत्री पांदण रस्ते योजना सर्व लोकप्रतिनिधींनी राबविली तर जिल्ह्यात मोठे काम होऊ शकते. तसेच यवतमाळ हे राज्यासाठी एक मॉडेल ठरेल. मात्र यासाठी वेगवेगळ्या विभागाचा निधी एकत्र करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 900 पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आल

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जिल्ह्याला 373 कोटी - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø 309 गावांचा होणार कायापालट Ø लाभार्थी शेतक-यांना ट्रॅक्टरचे वाटप यवतमाळ, दि. 28 :   ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी स्व. नानाजी देशमुख यांनी शेतीपयोगी मॉडेल तयार केले होते. याच मॉडेलचा आधार घेऊन राज्य शासन आणि जागतिक बँकेने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्याला 373 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून जिल्ह्यातील 309 गावांचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अनेक शेतीपयोगी योजनांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्य शासन व जागतिक बँकेच्या सं

ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांसाठी जनजागृती प्रशिक्षण

Image
Ø मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकाला सुरवात Ø जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम यवतमाळ, दि. 27 :   आगामी लोकसभेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगा च्या निर्देशानुसार ई व्ही एम व व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरवात जिल्ह्यात 26 डिसेंबरपासून करण्यात आली आहे.   यवतमाळ जिल्ह्या त वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद व उमरखेड असे सात विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 21 लक्ष 30 हजार 89 असून एकूण मतदान केंद्रांची संख्या 2491 आहे. जिल्ह्याला 2993 व्हीव्हीपॅट मशीन, 2993 कंट्रोल युनीट आणि 5048 बॅलेट युनीट प्राप्त झाले आहे. यापैकी प्रत्येकी 30 व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर

दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ, दि. 26 :   दिव्यांग व्यक्तिंमध्ये अनेक सुप्त गुण असतात. समाजाने त्यांच्याबद्दल केवळ सहानुभूतीपूर्वक विचार न करता त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून त्यांचा चालना द्यावी. शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. संदीप मंगलम येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, पालिकेचे बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, नियोजन सभापती भानुदास राजने, शिक्षण सभापती निता केळापुरे, महिला व बालकल्याण सभापती नंदा जिरापूरे आदी   उपस्थित होते. सुधारीत दिव्यांग विकास धोरणानुसार पुर्वीच्या 3 टक्के निधीत वाढ करून शासनाने दिव्यांग विकास निधी 5 टक्के केला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, दिव्यांगाना दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय घे

जिल्ह्यातील पांदण रस्ते मे महिन्यापर्यंत पूर्ण करा

Image
v पालकमंत्र्यांनी दिल्या सुचना यवतमाळ, दि. 24 :   गावागावातील पांदण रस्ते हा ग्रामपंचायतीसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या खात्यात निधीसुध्दा उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग करून जिल्ह्यातील संपूर्ण पांदण रस्त्याची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पांदण रस्त्याच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, यवतमाळचे तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री, नरेगा उपायुक्त डॉ. मनोहर नाल्हे, मनोहर शहारे आदी उपस्थित होते. पांदण रस्त्याच्या कामासाठी क्लस्टर बेस नियोजन करणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात सर्व पांदण रस्त्याची कामे त्वरीत सुरू करा. पेसा अंतर्गत येणा-या गावातील पांदण रस्ते पेसासाठी असलेल्या निधीमूधन करता येणे शक्य आहे. तसेच जलयुक्तचा निधी आणि खनीज अंतर्गत विकास निधीसुध्दा या कामासाठी खर्च करत

पालकमंत्र्यांच्या हस्ते जांब व ईचोरी येथील रस्त्याचे भुमिपूजन

Image
यवतमाळ, दि. 24 :   तालुक्यातील जांब व ईचोरी येथील रस्त्याचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.सदस्या रेणू शिंदे, जांबचे उपसरपंच पुरुषोत्तम टिचुकले, नाकापार्डीचे सरपंच पंकज तिवारी, देवानंद काटे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. जांब येथे बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, चार वर्षांत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या असून दळणवळणाच्या सोयीमुळे गावाचा विकास करता येतो. यापूर्वी वडगाव ते जांब या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. येथे तयार होणारा रस्ता हा चांगल्या दर्जाचा राहणार असून मे 2019 पर्यंत तो पूर्ण करण्यात येईल. यापूर्वी जांब ते खरद रस्त्याकरीता 49 लक्ष रुपये, जांब – चौधरा रस्त्याकरीता 10 लक्ष रुपये देण्यात आले आहे. जिल्ह्यात पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आणि मशीन विकत घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. जांब ते नाकापार्डी या 12.45 किमी रस्त्यासाठी एकूण 6 कोटी 6 ल

जिल्ह्यातील 300 गावे पाणी समृध्द करण्याचे उद्दिष्ट - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v   सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेबाबत कार्यशाळा   यवतमाळ, दि. 21 :   बदलत्या निर्सगाचे खुप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यावर्षी जिल्ह्यात जवळपास 24 टक्के पाऊस कमी झाला आहे. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे त्याचा शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होतो. निसर्गाच्या या बदलत्या आव्हानावर जलसंधारण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा – ४ मध्ये जिल्ह्यातील जवळपास 300 गावे पाणी समृध्द करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. बचत भवन येथे वॉटर कप स्पर्धेबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविणा-या सर्व गावक-यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, आपल्या समोरील आव्हान अजून संपले नाही. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 76 टक्के पाऊस झाला आहे. काही तालुक्यात तर

ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती अभियान प्रशिक्षण

Image
v   26 डिसेंबरपासून संपूर्ण तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक   यवतमाळ, दि. 18 :   आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवन येथे ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचा-यांमार्फत 26 डिसेंबरपासून जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक करून नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यात येतील यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मार्गदर्शक वैभव येंडे आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत अधिकारी आणि कर्मचा-यांनी येथे घेतलेले प्रशिक्षण प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जावून द्यायचे आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांचे लक्ष राहण

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’

v   प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद यवतमाळ, दि. 18 :   शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमं त्री देवेंद्र   फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) , उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ,   प्रधानमंत्री पीक विमा योजना ,   मागेल त्याला शेततळे ,   गाळमुक्त धरण ,   गाळयुक्त शिवार ,   स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ,   सुक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दि

ग्रंथामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø नगर भवन येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ ,   दि.   17 : समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. नागरिक ग्रंथोत्सवाची वाट बघत असतात. आयुष्याला दिशा देण्याचे काम ग्रंथांमुळे होत असून त्यामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर पडते, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, ग्रंथालय सहायक संचालक जगदीश पाटील, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आर.आर. राऊत, सहकार्यवाहक विनोद देशपांडे आदी उपस्थित होते. ग्रंथ हे गुरुस्थानी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वाचनाने मानवी जीवन

साहित्य संमेलन थाटात संपन्न होणार - पालकमंत्री मदन येरावार

Image
* 45   वर्षांनी साहित्य संमेलनाचा बहूमान यवतमाळ ,   दि.   15   :   अखिल भारतीय साहित्य संमेलनाला ४५ वर्षांचा काळ लोटल्यानंतर यवतमाळला आयोजनाचा बहूमान मिळाला आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व व्यवस्था उत्कृष्ट दर्जाच्या कराव्यात, तसेच साहित्य संमेलन थाटात संपन्न होईल याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या पुर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,   पोलीस अधिक्षक एम. राजकुमार ,   निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले ,   आमदार राजू तोडसाम , जेष्ठ साहित्य‍िक रमाकांत कोलते ,   पद्माकर मलकापुरे आदी उपस्थित होते. श्री. येरावार म्हणाले ,   साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यासोबतच इतर जिल्हा ,   राज्य आणि विविध प्रांतातील साहित्य‍िक येतील. काम पूर्ण करण्याची ही संधी असल्याने येथे येणाऱ्यांच्या सोयीसाठी बांधकाम विभागाने मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करावीत. तसेच साहित्य संमेलनानिमित्त येणारे पाहूण्यांचे आदरतिथ्य योग्यरित्या हो

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा - सीईओ जलज शर्मा

Image
                                                      Ø ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा यवतमाळ ,   दि.   07 : कर्तव्य बजावत असतांना सिमेवर वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलित केला जातो. याची सुरवात 7 डिसेंबर या दिवसापासून होत असते. शहिदांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या या योजनांकरीता ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने बचत भवन येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, पोलिस उपअधिक्षक (गृह) अनिलसिंग गौतम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ उपस्थित होते. ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ झाला, असे जाहीर करून मुख्य कार्यकारी