Posts

Showing posts from October, 2020

जिल्ह्यात 52 जण कोरोनामुक्त ; 47 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 30 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.30) रोजी एकूण 399 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 352 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 358 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 98 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10135 झाली आहे. आज 52 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9045 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 90725 नमुने पाठविले असून यापैकी 90310 प्राप्त तर 415 अप्राप्त आहेत. तसेच 80175 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ******

माळराणावर फुलविलेल्या फळबाग शेतीला जिल्हाधिका-यांची भेट

Image
  Ø नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत केले शेतक-यांचे कौतुक यवतमाळ, दि. 30 : पारंपरिक शेतीला फाटा देऊन 'विकेल ते पिकेल' या उपक्रमांतर्गत शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करणा-या फळबाग शेतीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी भेट दिली. विशेष म्हणजे माळरानावर फुलविलेल्या या शेतीबद्दल जिल्हाधिका-यांनी शेतक-यांचे विशेष कौतुक केले. नेर तालुक्यात एलगुंडा गावातील प्रयोगशील शेतकरी उत्तम चव्हाण व मैथिली औदार्य यांनी माळराणावर शेतीमध्ये आंबा, सिताफळ व पेरुची बाग लावली आहे. सेंद्रीय पध्दतीने शेती करणा-या शेतक-यांच्या शेताला भेटी देऊन त्यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण शेतीपयोगी उपक्रमाची पाहणी करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने प्रक्षेत्र भेटीचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले होते. या भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी श्री. चव्हाण यांच्या शेतातील आंबा, सिताफळ व पेरुची फळबाग, त्यासाठी केलेले सुयोग्य व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर, सोयाबीन पीक, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प आदींची पाहणी केली. तसेच महिला शेतकर

जिल्ह्यात 71 जण कोरोनामुक्त ; 55 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø दोघांचा मृत्यु यवतमाळ, दि. 29 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 55 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील माणिकवाडा धनज येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.29) रोजी एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 55 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 325 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 364 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 127 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10088 झाली आहे. गुरुवारी 71 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8993 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 90299 नमुने पाठविले असून यापैक

जिल्हाधिका-यांनी घेतली खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीची बैठक

Image
  यवतमाळ, दि. 29 : जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीकडे जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास, भौतिक पायाभूत सुविधा, उर्जा व पाणलोट क्षेत्र विकास इत्यादी विभागाचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले. या प्रस्तावांवर बाबनिहाय चर्चा करण्यात आली. सन 2020-21 व 2021-22 या वर्षासाठी प्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्र यामध्ये उच्च व अन्य प्राथम्य बाबीमध्ये एकूण 240 कोटी रुपये निधीचा आराखडा तयार करण्यात आला असून एकूण 130 कोटी 43 लक्ष किंमतीचे 737 प्रस्ताव प्राप्त झाले. प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात उच्च व अन्य प्राधम्य बाबीअंतर्गत एकूण 3582.71 लक्ष किंमतीचे 263 प्रस्ताव तर अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रात 9461 लक्ष किंमतीचे 474 प्रस्ताव प्राप्त झाले, अश

जिल्ह्यात अनुदानावर 4 हजार 44 क्विंटल हरभरा बियाणे

  Ø प्रमाणित बियाण्याचे अनुदानावर वितरण सुरु यवतमाळ, दि. 29 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 4 हजार 44 क्विंटल हरभरा बियाणे वाटप करण्यात येत आहेत. यात महाबीजचे एकूण 3444 तसेच एन. एस. सी. व कृभको यांचे मार्फत प्रत्येकी 300 क्विंटल प्रमाणे बियाणे वितरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत एका शेतकऱ्याला त्याच्या सातबारा क्षेत्रानुसार जास्तीत जास्त तीन बॅग (20 किलो प्रती बॅग) अनुदानावर देण्यात येत आहे. रब्बी हंगामाची तयारी सुरु झाली असून जिल्ह्यामध्ये झालेला पाऊस व त्याअनुषंगाने उपलब्ध जलसाठा या दोन्ही बाबीचा विचार केल्यास रब्बी हंगामातील पीक पेऱ्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याचा कल हरभरा व गहू या पिकाच्या पेरणीवर असतो. रब्बी हंगामासाठी महाबिजला यवतमाळ जिल्ह्यासाठी हरभरा या पिकाकरीता कृषी विभागाकडून 10 वर्षाच्या आतील वाणाचे एकूण 2559 क्विंटल व 10 वर्षाचे वरील वाणाचे 885 क्वि. बियाणे वितरण करण्याचे लक्षांक मिळाले आहे. हरभरा बियाण्याच्या 10 वर्षाचे आतील प्रामुख्याने फुले विक्रम हे 10 वर्षाचे आतील वाण महाबिजमार्

जिल्हाधिका-यांनी घेतला बँकर्सचा आढावा

Image
  यवतमाळ, दि. 28 : चालू हंगामात खरीप पीक कर्ज वाटप, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, बँकेसंदर्भातील विविध शासकीय योजना, मुद्रा कर्जवाटप योजना, नाबार्ड आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बँकर्सचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नागपूर येथील रिजर्व बँकेचे व्यवस्थापक उमेश भंसाली, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक दीपक पेंदाम, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थचे विजयकुमार भगत, जिल्हा अग्रणी बँकेचे सचिन नारायणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामकरीता आतापर्यंत 72 टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. यात जिल्ह्यातील 2 लक्ष 404 खातेदारांना 1578 कोटी 12 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ज्या खातेदारांना कर्ज वाटप होऊ शकले नाही, त्यांना रब्बी हंगामाकरीता कर्जवाटप करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील सर्व पात्र सभासदांच्या खात्यांचा आढावा घेणे गरजेचे आहे. जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध महामंड

जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 46 जणांना सुट्टी

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 46 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय महिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) रोजी एकूण 413 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 361 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 404 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10033 झाली आहे. आज 46 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8922 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 344 मृत्युची नोंद आहे. यात 25 मृत्यु हे 5 सप्टेंबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील खाजगी रुग्णालयात झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89900 नमुने पाठविले असून यापैकी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जनजागृती रथाला हिरवी झेंडी

Image
  यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, तीन वर्ष म्हणजेच सन 2020-21, 2021-22 व 2022-23 च्या खरीप व रब्बी हंगामातील अधिसूचीत पिकांकरीता लागू झाली आहे. या योजनेची रब्बी हंगाम 2020-21 ची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणे तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जनजागृती करणा-या वाहनांना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या उपस्थित हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेडचे जिल्हा व्यवस्थापक अर्जुन राठोड, तंत्र अधिकारी शिवा जावध आदी उपस्थित होते. फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील 16 तालुक्यात इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, पुणे यांचेद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 रब्बी हंगामाकरीता लागू करणेबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. सदर योजनेची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 गहू / हरभरा पिकाकरीता अस

जिल्ह्यात 57 जणांची कोरोनावर मात ; 49 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 27 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 49   जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका   कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 51 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.27) रोजी एकूण 416 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 367 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 405 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9981 झाली आहे. आज 57 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8876 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 318 मृत्युची नोंद आहे.   जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89475 नमुने पाठविले असून यापैकी 89121 प्राप्त तर 354 अप्राप्त आहेत. तसेच 79140 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

कोरोनासंदर्भात जिल्हाधिका-यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक

Image
  यवतमाळ, दि. 27 : कोरोना विषाणू संसर्ग तसेच विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. पी.एस.चव्हाण, डॉ. गिरीश जतकर, डॉ. विजय डोंबाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व केलेल्या उपाययोजनेमुळे मृत्युदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यात एकही मृत्यु होऊ न देणे, यालाच प्रशासनाचे प्राधान्य आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या कोव्हीड रुग्णालयातील रुग्ण सुपर स्पेशालिटीमध्ये स्थलांतरीत करण्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने नियोजन करावे.

दोन दिवसांत 53 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 58 जण कोरोनामुक्त

  Ø दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात गत 48 तासात एकूण 53   जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर दोन दिवसात दोन   कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 व 55 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 25 ऑक्टोबर रोजी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 31 जण बरे झाले.   गत 24 तासात 60 रिपोर्ट प्राप्त झाले असून यापैकी 11 नव्याने पॉझेटिव्ह आणि 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 454 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9932 झाली आहे. आज (दि. 26) 27 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8819 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 317 मृत्युची नोंद आहे.   जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89089 नमुने पाठविले असून यापैकी 88705 प्राप्त तर 384 अप्राप्त आहेत. तसेच 78773 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

उद्योगांच्या सवलत योजनेत जिनिंग व प्रेसिंगचा समावेश करा

Image
  Ø पालकमंत्र्यांचे उद्योगमंत्र्यांना पत्र यवतमाळ, दि. 26 : उद्योगांसाठी असलेल्या सवलत योजनेत राज्य शासनाने जिनिंग आणि प्रेसिंगचाही समावेश करून जिनिंग व्यावसायिकांना दिलासा द्यावा, या मागणीचे पत्र वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लिहिले आहे. पश्चिम विदर्भ हे कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कापसावर प्रक्रिया उद्योग म्हणून जिनिंग व प्रेसिंग ही इंडस्ट्रीज चालविली जाते. सुरवातीला टेक्सटाईल यंत्रणेमार्फत जिनिंगला कर्जाच्या व्याजामध्ये सुट होती. चार-पाच वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व उद्योग घटकांना राज्य शासनाच्या ‘पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटीव्हज’ अंतर्गत बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजात पाच टक्के सवलत देण्यात येत आहे. परंतु जिनिंग आणि प्रेसिंग या उद्योगाला सदर योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिनिंग व प्रेसिंग उद्योग घटकाला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत पाच टक्के व्याज दराने सवलत देण्याकरीता राज्य शासनाच्या ‘पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटिव्हज’ या योजनेत समाविष्ट करावे, अस

जिल्ह्यात 66 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 44 जण कोरोनामुक्त

  Ø एका कोरोनाबाधिताचा मृत्यु यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात 66 जण नव्याने पॉझेटिव्ह असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 501 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 66 नव्याने पॉझेटिव्ह तर 435 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 399 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9822 झाली आहे. आज (दि.23) 44 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8723 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 314 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 87812 नमुने पाठविले असून यापैकी 87180 प्राप्त तर 632 अप्राप्त आहेत. तसेच 77358 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य

जिल्ह्यात चार जणांचा मृत्यु ; 64 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 43 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 64 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 43जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 65 आणि 50 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 70 वर्षीय महिला आणि इतर ठिकाणच्या 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 606 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 64 नव्याने पॉझेटिव्ह तर 542 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 520 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या 152 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9756 झाली आहे. आज (दि.22) 43 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8679 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 313 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासू

जिल्ह्यात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह

  Ø दोघांचा मृत्यु ; 37 जण बरे यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यात गत 24 तासात 121 जण नव्याने पॉझेटिव्ह आले दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 आणि 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 653 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 121 नव्याने पॉझेटिव्ह तर 532 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 496 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9692 झाली आहे. बुधवारी 37 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8636 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 309 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 86619 नमुने पाठविले असून यापैकी 86074 प्राप्त तर 545 अप्राप्त आहेत. तसेच 76382 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे

पोलिस स्मृती दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात शहिदांना श्रध्दांजली

Image
  यवतमाळ, दि. 21 : कर्तव्य बजावतांना देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ जिल्हा पोलिस मुख्यालयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अपर्ण केले. तसेच यावेळी पोलिस विभागातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. स्मृतीदिनानिमित्त बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, 21 ऑक्टोबर 1959 रोजी जम्मू – काश्मिरच्या लडाख भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर अचानक चिनी सैनिकांनी हल्ला केला. यात प्रत्येक भारतीय जवानाने शौर्याने प्रतिकार करून देशासाठी बलिदान दिले. 1 सप्टेंबर 2019 ते 21 ऑक्टोबर 2020 या कालावधीत देशातील 266 पोलिसांना वीरगती प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहिदांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी मनोकामना परमेश्वराकडे करीत असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. भुजबळ म्हणाले, कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती द

मनुष्यहानी व पशुधन नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

Image
  यवतमाळ, दि. 21 : पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, मनुष्य जखमी, पशुधन हानी झालेल्या सहा जणांना एकूण 6 लक्ष 64 हजार 750 रुपयांचे धनोदश देण्यात आले. यात मनुष्यहानी झाल्यामुळे अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई सोनवा यांना पाच लक्ष रुपये, मनुष्य जखमीमुळे कारेगाव बंडल येथील लक्ष्मीबाई पेंदोर यांना 1 लक्ष 25 हजार रुपये, पशुधनहानी झाल्यामुळे अंधारवाडी येथील भीमराव दंडाचे यांना 15 हजार, विनोद मरसकोल्हे यांना 12 हजार, लिंगा मेश्राम यांना 6750 आणि रेखाबाई मेश्राम यांना सहा हजारांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, मानव – वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यावर आपला भर असून तशा सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच जंगल परिसरात कुरण विकास करणे, चराई क्षेत्र वाढविणे आदींसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वनखात्याला सहकार्य करणे ही नागरिकांचीसुध्दा जबाबदारी असून वनांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी स

घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

Image
  यवतमाळ, दि. 21 : शहरातील कच-याची योग्य विल्हेवाट लागावी तसेच शहर स्वच्छ व सुंदर राहावे, याकरीता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, यवतमाळ न.प.चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, यवतमाळ नगर परिषदेच्या कंत्राटानुसार शहरातील सर्व कचरा साफ होण्यासाठी पालिकेने योग्य नियोजन करावे. पालिकेच्या कर्मचा-यांनी कंत्राटदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचे रेकॉर्डींग करणे आवश्यक आहे. कंत्राटदारांचे प्रतिनिधी तसेच त्यांच्याकडील कार्यरत स्टाफच्या नियमित बैठका घ्याव्या. पालिकेने कंत्राटदाराच्या निविदा प्रक्रियेत स्पष्टता ठेवावी. तसेच सध्या कार्यरत कंत्राटदाराने नवीन प्रक्रिया होईपर्यंत काम थांबवू नये. पुढील महिन्यात ही मुदत संपुष्टात येत असली तरी पूर्ण मुदतीपर्यंत काम करणे करावे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या घंटागाड्या सुस्थितीत ठेवाव्या. तसेच शहराच्या कोणत्याही प्रभागातून कच-या

जिल्ह्यात 55 जणांची कोरोनावर मात

  Ø दोघांचा मृत्यु ; 48 जण नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 48   जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 55 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये पुसद येथील 67 वर्षीय आणि वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 566 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 48 नव्याने पॉझेटिव्ह तर 518 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 499 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9571 झाली आहे. मंगळवारी 55 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8599 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 307 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 86019 नमुने पाठविले असून यापैकी 85425 प्राप्त तर 594 अप्राप्त आहेत. तसेच 75854 नागर

पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे वाढणार सिंचन विहिरींची संख्या

Image
  Ø ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार मंजूर होणार विहिरी यवतमाळ, दि. 20 : शेतक-यांना दिलासा देण्यासाठी गावागावात पांदण रस्त्यांची मोहीम मिशन मोडवर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता जिल्ह्यात सिंचनाचा अनुषेश पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढकार घेतला आहे. शेतक-यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून आता गावागावात सिंचन विहिरींची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात विहिरींची संख्या मंजूर करण्यात येईल. जिल्ह्यात सिंचनाची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ मान्सूनच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. पाऊसही बेभरोश्याचा असल्यामुळे शेतक-यांच्या हाती पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न येत नाही. परिणामी वर्षभर त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतक-यांना दुबार पीक घेणे शक्य होईल. याच अनुषंगाने एका गावात केवळ पाच सिंचन विहिरींना मंजुरी ही पूर्वीची अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात सिंचन विहिरी मंजूर होणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ह

शेतपांदण रस्त्यांसाठी प्रशासनाचा ‘स्पेशल ड्राईव्ह’

Image
  Ø जिल्हाधिका-यांनी घेतली जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक यवतमाळ, दि. 20 : गावागावातील शेतक-यांना स्वत:च्या शेतापर्यंत जाण्याकरीता तसेच शेतात वाहतुकीची कामे अधिक सुलभरित्या होण्याकरीता पांदणरस्ते अत्यावश्यक आहे. शेतक-यांच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांदण रस्त्यांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने ‘स्पेशल ड्राईव्ह’ घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक घेतली. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर शेतीपयोगी कामे यंत्रामार्फत केली जाते. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्याकरीता गावागावांमध्ये पांदणरस्ते आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये पांदणरस्त्यांअभावी चिखल तुडवत जाणे व शेतीपयोगी यंत्रसामुग्रीची ने-आण शक्य नसल्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. राठोड यांनी गत आठवड्यात बैठक घेऊन जिल्ह्यात पांदणरस्त्याची मोहीम मिशन मोडवर घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी बैठक घेऊन स

जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु ; 59 जण नव्याने पॉझेटिव्ह

  Ø ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 39 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर 59   जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 381 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 नव्याने पॉझेटिव्ह तर 322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 530 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9523 झाली आहे. आज (दि.19) 39 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8544 आहे.   जिल्ह्यात आतापर्यंत 305 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 85476 नमुने पाठविले असून यापैकी 8

मध्यवर्ती सहकारी बँकेची आयएमपीएस सेवा लवकरच कार्यान्वीत

Image
                                                                                   Ø ठेवीच्या व्याजदरात कपात यवतमाळ दि. 19 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस प्रणाली अंतर्गत ग्राहकांकरीता आयएमपीएस सेवा लवकर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना अल्प दरात 2 लाखापर्यंत रक्कम पाठविण्याची सुविधा होईल, अशी माहिती बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक श्री. पेंदाम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे श्री. गुजर, महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रतिनिधी श्री. राठोड आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला मागील सभेच्या कार्यवाहीचा आढावा तसेच सप्टेंबर महिन्याच्या आर्थीक बाबीचा आढावा घेण्यात आला. बँकेच्या ॲसेट्स लियाबिलीटीचा आढावा घेण्यात येऊन 1 ते 3 वर्ष या कालावधीच्या ठेवीवर अर्धा टक्के व्याजदरात कपात करण्यात आली असून आता व्याजदर 6.75 टक्के राहणार आहे. बँकेच्या सुरक्षीततेच्या दृष्टीन

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

Image
  Ø 40 लक्ष रुपयांच्या कामांचे भुमिपूजन यवतमाळ, दि. 19 : केळापूर तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच प्रस्तावित कामांचे भुमिपूजन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पांढरकवड्याचे उपवनसंरक्षक किरण जगताप, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, जि.प.सदस्य गजानन बेझंकीवार, आसोलीच्या सरपंचा निर्मला धुर्वे, उपसरपंच हरीहर लिंगनवार आदी उपस्थित होते. विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपूजन करतांना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचा अनुषेश दूर करणे, विजेचे इन्फ्रास्टक्चर उभे करणे, गावात शुध्द पिण्याचे पाणी, नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा, शाळा आदी कामांना मंत्री म्हणून आपले प्राधान्य आहे. गावखेड्यातील गोरगरीब नागरिकांना कॅन्स