जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 46 जणांना सुट्टी

 


Ø एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 46 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय महिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) रोजी एकूण 413 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 361 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 404 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10033 झाली आहे. आज 46 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8922 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 344 मृत्युची नोंद आहे. यात 25 मृत्यु हे 5 सप्टेंबर 2020 ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील खाजगी रुग्णालयात झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89900 नमुने पाठविले असून यापैकी 89538 प्राप्त तर 362 अप्राप्त आहेत. तसेच 79505 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी