Posts

Showing posts from 2016
अरबी समुद्रात छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -पालकमंत्री संजय राठोड *पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई येथे भूमिपूजन *210 मीटर उंचीचा पुतळा उभा राहणार यवतमाळ,   दि. 20 :   मुंबईजवळच्या अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मिटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह भव्य स्मारकाचे भूमिपूजन व जलपुजनाचा भव्य सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. 24 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड केले. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील   बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे   70   हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईलगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय   2002   मध्ये घेतला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये
Image
वीर मातेलाही महसूल विभागाची मदत * बळीराजाचा चेतना अभियानाचा पुढाकार यवतमाळ ,  दि.2 8 ः   श्रीनगरमधील उरी येथे 18 सष्‍टेंबर रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात वीर मरण आलेल्‍या विकास कुडमेथे यांच्‍या वीर पत्‍नी यांना 51 हजार 400 रूपयांची मदत देण्‍यात आली होती. त्‍याचप्रमाणे वीरमाता विमल जर्नादन कुडमेथे यांना 55 हजार 800 रूपयांची मदत वितरीत करण्‍यात येणार आहे. हि मदत कुटुंबीयांसाठी वैयक्‍तीक स्‍तरावर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी 1 लाख 7 हजार 200 रूपयांची मदत गोळा करण्‍यात आली होती. हि मदत बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या पुढाकारोने  वितरीत करण्‍यात आली. यासाठी अपर जिल्‍हाधिकारी लक्ष्‍मण राऊत यांनी 5 हजार रूपयांची मदत केली असून महसूल विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील आणि उपविभागीय अधिका-यांनी प्रत्‍येकी दोन हजार रूपये मदतनिधी दिला. तर तहसीलदार नायबतहसीदार संघटनेकडून 15 हजार रूपये ,  पुसद तहसील कार्यालयाने  15 हजार ,  जिल्‍हा पुरवठा अधिकारी कार्यालय व तहसील पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून 15 हजार रूपये , तहसीलदार सचिन शेजाळ यांनी वैयक्‍तीक 10 हजार रूपये ,  नेर येथ
शेतक-यांच्‍या समस्‍या ,  संपर्क अधिका-यांचा पाठपुरावा *  शेतक-यांना मिळतोय दिलासा यवतमाळ ,  दि.28 ः बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रत्‍येक मंडळासाठी नेमण्‍यात आलेल्‍या संपर्क अधिका-यामुळे शेतकरी आपल्‍या समस्‍या ,  अडचणी थेट गावात आलेल्‍या संपर्क अधिका-यांकडे सांगू लागले आहे. त्‍यामुळे या समस्‍या सोडविण्‍यासाठी पाठपुरावा करीत असल्‍याने शेतक-यांच्‍या समस्‍यांची सोडवणूक  होताना दिसून येत आहे.             बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील १०१ मंडळाकरिता वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी संपर्क अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे हे अधिकारी गावात जावून शेतक-यांची संवाद साधत आहे. राज्‍य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक  श्री. वरटे  यांनी  कुंभा मंडळातील गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यामध्‍ये साखरा ,  नरसाळा ,  भुरांडा ,  इंदिराग्राम ,  श्रीरापूर या गावांना भेटी दिल्‍या. कुभां या गावचे सरपंच श्री. घोटेकर ,  उपसरपंच ,  ग्रामसेवक ,  तलाठी ,  मंडळ अधिकारी ,  कृषी सहायक ,  पोलिस पाटील ,  गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावाला जोडणारा रस्‍ता दुरूस्‍तीची मागणी ग्रा
Image
महिलांनी उभारला फळप्रक्रिया उद्योग *कोकम ज्युसचे उत्पादन *वणीच्या महिलांचा उपक्रम *85 लाखाचा प्रकल्प यवतमाळ,  दि.  28  : जिल्ह्यातील शेतकरी शेती क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवित आहे. अशा वेगळ्या उपक्रमात जिल्‍ह्यातील महिलाही मागे नसल्याचे वणी येथील छाया संजय कोडगिरवार या महिलेने दाखवून दिले आहे. 85 लाख रूपये लागत असलेल्या फळप्रक्रिया उद्योग उभारून या महिलेने कोकम ज्युसचे उत्पादन वणी येथे सुरू केले आहे. जिल्ह्यातील इतर होतकरू महिलांसाठी त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. वणी येथील छाया कोडगिरवार या सुशिक्षीत बेरोजगार महिला होत्या. घरकाम करीत असतानाच काही तरी वेगळे करायचे ही त्यांची इच्छा होती. या इच्छेतूनच कृषि आधारीत एखादा उद्योग सुरू करता येईल काय, याची माहिती घेतली. यातून फ्रुट ज्युस बनविण्याचा उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. उद्योगासाठी जागा व भांडवलाची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी वणी येथीलच स्वाती उदय गुजलवार या महिलेला आपल्या उद्योगात भागीदार करून घेतले. 85 लाख रूपये खर्चाचा प्रकल्प आराखडा तयार करून श्री साई अमृत फ्रुट प्रोसेस नावाने त्यांनी उद्
भोजन पुरवठा धारकाकडुन दरपत्रकाची मागणी यवतमाळ, दि. 28 : जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो  विभागाच्या दि. 1 ते 31 ऑक्टोबरपर्यंत महिन्याला वेळोवेळी होणाऱ्या सभा, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आदींकरिता चहा, नास्ता, भोजन आणि पाणी कॅन इत्यादीबाबत इच्छुक असलेल्या पुरवठाधारकाकडुन दि. 13 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 2 वाजेपर्यत दरपत्रक मागविण्यात आले आहे. तसेच जाहिरातीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो) यांचे नोटिस बोर्डावर उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे. 00000
सोमवारी लोकशाही दिन यवतमाळ, दि. 28 : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी, दि. 3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्जाचे निरसण झाले नसल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावे, तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज केल्याची पोच यावेळी सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000
इंग्रजी माध्यमातील प्रवेश पालकांनी पुढाकार घेऊन प्रवेश रद्द करावा यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा प्रकल्प कार्यालयातर्फे अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मात्र पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन प्रवेश रद्द करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. शासनाच्या नियमानुसार प्रवेश घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधीचा यादीतील क्रमांक नमूद करण्यात यावा, तसेच विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये असावी, अशी अट आहे. मात्र काही विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न जास्त असूनही या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागाला चुकीची माहिती देऊन इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत पाल्यांनी प्रवेश घेतला असल्यास तो पालकांनी पुढाकार घेऊन रद्द करून या योजनेचा लाभ सोडण्यात यावा. असे केलेले नसल्यास कार्यालयाच्या तपासणीमध्ये अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आढळून आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे, एका
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत *शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करावे लागणार यवतमाळ, दि. 28 : अनुसूचित जमातीमधील पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येत आहे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2016-17 साठी शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.             या योजनेंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार रूपये, पाचवी ते सातवीकरीता 1 हजार 500 आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता 2 हजार रूपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या तालुक्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांची शाळा, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक त्यांचे खात्याशी संलग्नित करावे, शाळांनी आधार क्रमांकाच्या खात
Image
एकाच वर्षात 119 हेक्टरवर फळझाड लागवड * 117 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ * 71 गावातील शेतकऱ्यांचा समावेश * रोहयो निगडीत फळबाग कार्यक्रम यवतमाळ, दि. 28 : रोजगार हमी योजनेंतर्गत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत फळबागांखाली अधिकाधिक क्षेत्र यावे यासाठी कृषि विभागाच्या वतीने अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या वर्षी सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील 119 हेक्टरवर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या या योजनेमुळे पारंपरीक पिकांवरील शेतकऱ्यांची अवलंबितता कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. शेतकऱ्यांना पारंपरीक पिकांसोबतच फळपिकांमधून उत्पन्न वाढीसाठी जोड देणे आवश्यक आहे. त्यासाठीच रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची ही योजना जिल्ह्यात जाणिवपुर्वक राबविली जात आहे. फळझाड लागवडीस पहिल्या वर्षीच मोठा खर्च करावा लागतो. त्यानंतर खर्चाचे प्रमाण दरवर्षी कमी कमी-कमी होत जाते. शेतकऱ्यांना या पिकाकडे वळविण्यासाठी लागवडीकरीता रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले ज
Image
किन्हीच्या शेतकऱ्याने साधली पपईतून आर्थिक समृद्धी * सरासरी पाच लाखांचे उत्पादन * किन्ही येथील शेतकऱ्याचा प्रयोग *1 हेक्टरमध्ये पपईची लागवड यवतमाळ,  दि. 15 : पारंपरीक पिकांना बाजूला सा र त जिल्ह्यातील अनेक शेतकरी फळ पिकाकडे वळत आहेत. आर्णी तालुक्यातील किन्ही या गावातील राजेश वंडे या शेतकऱ्याने एक हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करून आर्थिक समृद्धी साधली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते दरवर्षी सरासरी पाच लाख रूपये निव्वळ नफा कमावित आहेत. श्री. वंडे या शेतकऱ्याकडे 11 एकर शेती आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पारंपरीक पद्धतीने शेती करीत होते. काही वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतातील काही क्षेत्रावर फळझाडांच्या लागवडीचा प्रयोग सुरू केला. परंतु यातून पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नव्हते. कृषि विभागाच्या कृषि विस्तार यंत्रणेंतर्गत कार्यरत असलेल्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाच्या सल्ल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच एक हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली. कृषि विभागाच्या सल्ल्याप्रमाणे पपईचे संगोपन केले आणि ही पपई त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी घेऊन आली. ओलिताची सो
मुख्याध्यापक, प्राचार्यांची आज संयुक्त सभा             यवतमाळ, दि. 27 : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी, मार्च 2017 च्या परीक्षेबाबत सर्व मान्यताप्राप्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची संयुक्त सहविचार सभा बुधवारी, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नंदूरकर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.             या सभेस विभागीय मंडळाच्या परीक्षा कामकाजाच्या संदर्भात ऑनलाईन आवेदन पत्राबाबत सुचना, मार्गदर्शन करणे, गैरमार्गाशी लढा, खासगी विद्यार्थी योजना, पुन:र्रचित अभ्यासक्रम नववी ते बारावी मुल्यामापन योजना, केंद्रसंचालक, परीक्षक आणि नियामक तसेच शिक्षण विभागाचे इतर विषयाबाबतचे मार्गदर्शन विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, विभागीय सहाय्यक सचिव यांच्याकडून करण्यात येणार आहे. या सभेसाठी सर्व मान्यताप्राप्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे. 00000
जिल्ह्यात पिककर्ज वाटपाचा नवा उच्चांक *चालू वर्षात 1089 कोटी पिककर्ज वाटप *1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना पिककर्ज *खरीप हंगामातच विक्रमी कर्ज वाटप यवतमाळ,  दि. 27 : ग्रामीण भागात खरीप हंगामासाठी पिककर्ज शेतकऱ्यांना फार मोठा आधार देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यास पिककर्ज मिळाले पाहिजे, या धोरणात्मक भुमिकेतून गेल्या दोन वर्षांपासून पिककर्ज वाटपाचे नियोजन करून ते राबविण्यात येते. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच 1 हजार 89 कोटी इतक्या पिककर्जाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख 48 हजार शेतकऱ्यांनी या कर्जाचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागात अद्यापही पेरणीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाशिवाय चांगला पर्याय नाही. शासनाने अल्पदरात तसेच मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याजामध्ये सवलतीची योजना सुरू केल्याने पिककर्जच शेतकऱ्यांसाठी मोलाचा आधार ठरत आहे.  शासनाच्या पिककर्जाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा कल राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याकडे वाढत आहे.  गेल्या चार वर्षातील पिककर्ज वाटपाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणामुळे यावर्षी पहिल्या
जिल्हा ग्राहक परिषदेच्या सदस्यत्वासाठी अर्ज करावेत यवतमाळ, दि. 23 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातील रिक्त असलेल्या उर्वरीत 9 सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. यासाठी पात्र व्यक्तिंनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे असे आवहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून 9 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. यात जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यांपैकी प्रत्येकी एक, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, पेट्रोल गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधींनीचे दोन, शेतकऱ्याचे प्रतिनीधी एक, असे ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य नियुक्त करण्यात येणार आहे. या प्रवर्गातील संबंधित सदस्य, प्रतिनिधींना अर्जाचा विहित नमुना आणि पात्रतेबाबतचे निकष जिल्हा पुरवठा कार्यालयात उपलब्ध होतील. इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे. 00000
लघु उद्योग स्थापन करण्यासाठी नोंदणी  यवतमाळ, दि. 23 : जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषिपुरक लघु उघोगासाठी आवश्यक असणारे प्रकल्प अहवाल (Project Report) महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी आणि शेतकरी गटांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प अहवाल नि:शुल्क तयार करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकरी व शेतकरी गटांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आपली नोंदणी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, गार्डन रोड, येथे करावी, तसेच जगदिशकुमार कांबळे, कृषि पणन तज्‍ज्ञ, एमएसीपी यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे 00000
सार्वजनिक ग्रंथालयाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा यवतमाळ, दि. 23 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे सार्वजनिक ग्रंथालयाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा गुरूवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्ययोजनेतुन ग्रंथालयासाठी राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्यांच्या विविध योजना आणि ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सार्वजनिक ग्रंथालयांना माहिती यात देण्यात येणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. ग्रंथालय संचालक किरण धांडोरे अध्यक्षस्थानी राहतील प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भोंडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान पश्चिम विभाग क्षे
शिवाजी महाविद्यालयात ‘अर्श’ कार्यशाळा यवतमाळ, दि. 23 : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातर्फे राबविण्यात येणारा ‘अर्श’ (किशोरवयीनाचे प्रजनन आणि लैंगिक आरोग्य) कार्यक्रमाची कार्यशाळा शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दि. 16 सप्टेंबर रोजी पार पडली. कार्यशाळेच्या सुरवातीला अर्श कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. अर्श कार्यक्रमाच्या समन्वयक किरण ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अर्श म्हणजे किशोरवयीन मुला-मुलींचे प्रजनन आणि लैंगिक कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. किशोरवयीन म्हणजे काय, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, स्वच्‍छता, मासिकपाळीचे चक्र, प्रजनन आणि लैंगिक आजारांची लक्षणे आणि उपाय एचआयव्ही एड्स, किशोर वयातील पोषक आहार, किशोरवयात होणारे शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल, ॲनिमियाची लक्षणे, घ्यावयाची काळजी आणि उपचाराविषयाची माहिती देण्यात आली. तसेच अभ्यासपद्धतीचा अर्थ स्पष्ट केला. सकारात्मक विचारांनी जीवनात निर्माण होणारी यशस्विता यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना त्यांच्या वैयक्त‍िक अडचणी विचारण्यात आल्या. त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान
वाहनाच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन         यवतमाळ, दि. 23 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे दि. 29 सप्टेंबर पासून मोटार सायकल, स्कुटर, मोपेड आदी दुचाकी वाहनां साठी नवीन नोंदणी मालिका MH- 29 /AY- 0001 ते MH- 29 /AY- 9999 सुरू करण्यात येत आहे. यात पुढील मालिकेसाठी 1 क्रमांक उपलब्ध होत आहे. त्यासाठी इच्छुक अर्जदारांनी आकर्षक क्रमांकासाठी दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. 00000
24 रेतीघाटांच्या लिलावासाठी ई-निविदा यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यातील 24 रेतीघाटाचा ई-टेंडरींगद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी इच्छुक कंत्राटदारांनी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन   करण्यात आले आहे.             घाटांच्या लिलावाकरीता सविस्तर माहिती   eauctioncollyat.abcprocure.com   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिनांक 23 सप्टेंबर पासून बिडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल. दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू होईल. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उघडण्यात येतील. त्याच दिवशी ई-लिलाव करण्यात येतील. 00000
साडेतीन हजार शेततळे, फुलविणार मळे * जिल्ह्यात 3443 शेतकऱ्यांना देणार शेततळे * शेततळ्यांसाठी 3210 अर्ज प्राप्त *जिल्ह्यात 165 शेततळ्यांची कामे पूर्ण यवतमाळ, दि. 23 : शेतकऱ्यांची पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करून त्याच्या शेतामध्येच पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्यांची योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत असून त्याचा फायदा घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी समोर येत आहे. यावर्षी सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध होणार असून येत्या रब्बी हंगामात शेततळ्यां तील पाण्यावर शेतकऱ्यांचे मळे फुलणार आहे. शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून सुरु केला आहे. शाश्वत आणि हक्काची सिंचन सुविधा देणा-या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 3443 शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मंजूर शेततळ्यांपैकी 2249 शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून आतापर्यंत 165 शेततळे पूर्ण झाले आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहाव
Image
संवादपर्व कार्यक्रमात शेततळे व जलयुक्त शिवारची जनजागृती मनपूर येथे संवादपर्व कार्यक्रम             यवतमाळ , दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयावतीने गणेश उत्सवात संवादपर्व कार्यक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमाअंतर्गत मनपूर येथे शेततळे, जलयुक्त शिवार तसेच कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती गावक-यांना देण्यात आली.                कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे,  कृषी पर्यवेक्षक ए.बी.दिवे, उपसरपंच संतोष पांडे, गावातील पाणलोट समितीचे सचिव दशरथ खडके यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.                मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. मागेल त्या प्रत्येक शेतक-यास शेततळे मंजूर केले जाते. यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. गावातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.भवरे यांनी केले. शेततळयांमुळे शेतातच हक्काच्या सिंचनाची सुविधा निर्माण होवू शकते. पावसाने खंड दिल्यास किंवा दुबार पिक घेतल्यास एक किंवा दोन
कबड्डी स्पर्धांच्या तारखेत बदल *22 ते 24 सप्टेंबर दरम्यान आयोजन यवतमाळ, दि. 14 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दि. 26 ते सप्टेंबर यादरम्यान निश्चित करण्यात आले होते. परंतु विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा दि. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 22 सप्टेंबर रोजी 14 वर्षे मुले, मुली, 23 सप्टेंबर रोजी 17 वर्षे मुले, मुली आणि 24 सप्टेंबर रोजी 19 वर्षे मुले, मुलींच्या स्पर्धा यवतमाळ येथील जयहिंद क्रीडा मंडळ येथे घेण्यात येणार आहे. याची सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे. 00000
जिल्ह्यात घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची तपासणी * 19 सप्टेंबरपासून सुरूवात * 14 दिवस चालणार मोहिम *साडेपाच लाख घरांना भेटी यवतमाळ, दि. 15 : गेल्या एप्रिलपासून जिल्ह्यात कुष्ठरोगाचे केवळ 25 रूग्ण नव्याने आढळून आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. कुष्ठरोग हा उपचाराने बरा होत असल्यामुळे कुष्ठरोगाची लागण झालेले व्यक्ती आणि त्यांच्याशी संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान कुष्ठरोगाची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यात साडेपाच लाख घरांना भेटी देण्यात येणार असून यात साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यात 231 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 39 रूग्ण औषधोपचारामुळे पुर्णपणे बरे झाले आहेत. यातील 165 रूग्णांवर विविध उपचार सुरू आहे. जिल्ह्यात 21 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान राबविलेल्या कुष्ठरोग मोहिमेतील सर्व्हेक्षणादरम्यान 13 तालुक्यातील 16 लाख 66 हजार नागरीकांची आशा आणि स्वयंसेवकांनी घरी जाऊन तपासणी केली. यात एक हजार 415 संशयीत रूग्ण आढळून आले. यातील एक हजार 222 नागरीकांची तपासणी करण्यात आली. यात 13 नागरीक मल्टी बॅसिलरी तर 12 न
ई-डिस्ट्रीक्टमध्ये यवतमाळ ‘नंबर वन’ * 11 लाख डिजीटल प्रमाणपत्रांचे वितरण * नागरीकांना मिळते पूर्णत: ऑनलाईन सेवा *215 महा-ई-सेवा केंद्र चालू स्थितीत यवतमाळ, दि. 15 : नागरीकांना आवश्यक असणारे दाखले आणि प्रमाणपत्रे घरबसल्या मिळावे, यासाठी अशा विविध प्रकारच्या सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याने हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आघाडी घेतली असून तब्बल 11 लाख प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहे. पूर्णत: ऑनलाईन सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय सेतू महाऑनलाईन या पोर्टलवर ऑनलाईन जोडण्यात आली आहेत. जिल्ह्यात ई-डिस्ट्रीक्ट योजनेंतर्गत डिजीटल प्रमाणपत्राचे वितरण नोव्हेंबर 2013 पासून सुरू करण्यात आले. सर्वसामान्य नागरीकांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करुन देण्यात यवतमाळ जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक अद्यापही कायम ठेवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाखाच्या वर प्रमाणपत्र वितरण करण्याचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे प्रमाणपत्र वितरणात दुसऱ्या क्रमांकावर असलेला अहमदनगर जिल्हा वितरणाच्या बाबतीत जिल्ह्याच्या संख्येपेक्षा निम्यावर आहे.