सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
*शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करावे लागणार
यवतमाळ, दि. 28 : अनुसूचित जमातीमधील पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येत आहे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2016-17 साठी शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या योजनेंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार रूपये, पाचवी ते सातवीकरीता 1 हजार 500 आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता 2 हजार रूपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या तालुक्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांची शाळा, नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक त्यांचे खात्याशी संलग्नित करावे, शाळांनी आधार क्रमांकाच्या खात्रीसाठी आधार कार्डाची प्रत सोबत जोडावी, तसेच खाते क्रमांक पटविण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार संलग्न केल्याच पुरावा म्हणून सिडींग पावती सोबत जोडावी. या शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन पांढरकवडा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी