ऑक्टोबर महिन्यात भरती मेळावा
यवतमाळ, दि. १ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुलभूत प्रशिक्षण आणि अनुषंगिक सुचना केंद्रातर्फे ऑक्टोबर महिन्यात शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अप्रशिक्षित उमेदवारांसाठी तालुकास्तरावर 1 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व आयटीआय मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 2 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील मुलभूत प्रशिक्षण आणि अनुषंगिक सुचना केंद्रात मेळावा घेण्यात येणार आहे. 3 सप्टेंबर रोजी अमरावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विभागीयस्तरावर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबी तलाव जवळ मुंबई आणि 30 सप्टेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, सेंट्रल हॉस्पीटलजवळ फर्निचर बाजार, उल्हाननगर (पश्चिम) येथे राज्यस्तरावरील मेळावा होणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेंटर ऑफ एक्सलंसमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर 5 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी जिल्हा स्तरावर मुलभूत प्रशिक्षण आणि अनुषांगिक सुचना केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी अमरावती येथील आयटीआयमध्ये विभागीयस्तरावर मेळावा होणार आहे. राज्यस्तरावर 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील वागळे इस्टेटमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर 15 ऑक्टोबर रोजी ठाणे अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरावरील मेळावा होणार आहे. याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण आणि अनुषंगिक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी