आर्णी तालुक्यातील रेतीघाटांच्या लिलाव
यवतमाळ, दि.७ :आर्णी तालुक्यातील भंडारी, चिकणी क. येथील रेतीघाटाचा ई-टेंडरींगद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी इच्छुक कंत्राटदारांनी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.
घाटांच्या लिलावाची सविस्तर माहिती yavatmal.nic.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.दि.1 सप्टेंबर पासून बिडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल.दिनांक 10 सप्टेंबर रोजी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल.दिनांक 9 सप्टेंबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू होईल.दि.16 सप्टेंबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल.दि.17 सप्टेंबर रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उघडण्यात येतील. त्याच दिवशी ई-लिलाव करण्यात येतील.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी