दिग्रस येथे संवादपर्व अंतर्गत विकास विषयक छायाचित्रांचे प्रदर्शन
*छायाचित्रकार रामदास पद्मावार यांची छायाचित्रे
*गणेशोत्सवात शासन योजनांबाबत जनजागृती
यवतमाळ, दि. 12 : शासनाच्या वतीने विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येते. या योजनांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, म्हणून माहिती कार्यालयाच्या वतीने संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिग्रस येथील छायाचित्रकार रामदास पद्मावार यांच्या विकास विषयक व विविध प्रकारच्या सामाजिक जाणीव जागृती घडविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास दिग्रसकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार भावना गवळी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसिलदार किशोर बागडे तथा अन्य अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणावर नागरीकांची रेलचेल असते. याठिकाणी लोकोपयोगी योजनांची माहिती करून देण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छायाचित्रकार रामदास पद्मावार व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने श्री. पद्मावार यांच्या विकास विषयक छायाचित्रांचे प्रदर्शन या उपक्रमांतर्गत भरविण्यात आले आहे. दिग्रस येथे श्री पाळेश्वर मंडळाच्या ठिकाणी सदर प्रदर्शन पाहण्यासाठी नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
            या प्रदर्शनीत संवाद पर्व तसेच लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत जलसंवर्धन, स्त्री-भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी बेटी बचाओ-देश बचाओ संदेश, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणारे छायाचित्रे यासह विविधि विकास विषयक छायाचित्र ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सकारात्मक शेतीचे प्रकाशमय दर्शन घडवून प्रोत्साहन देण्याचे काम छायाचित्रातून होत आहे. श्री पाळेश्वर मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवित असतात. मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यावर्षी सदर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहरवासियांचा मोठा प्रतिसाद या प्रदर्शनास मिळत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी