31 व्या नेत्रदान जनजागृती पंधरवाडा
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम साजरा
        यवतमाळ, दि. 2 : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे 31वा जागतिक नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, नेत्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बा. ना. बांगडे यांनी नेत्रदानाबाबत जनजागृती केली. दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यानच्या 31व्या जागतिक नेत्रदान पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेण्यात आले.
डॉ. मनोज सक्तेपार यांनी नेत्रदानाची समाजाला गरज आहे. जिवंतपणी रक्तदान, तर मृत्यूनंतर नेत्रदान करणे गरजेचे आहे. एका नेत्रदात्याच्या नेत्रदानातून खऱ्या अर्थाने समाजकार्य घडून येते, हे समाजाने लक्षात घेवून दोन अंधकारमय जिवाला प्रकाशात आणण्याचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान मोतीबिंदू शस्त्रक्रीया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करू शकतात. ज्या व्यक्तीने नेत्रदान करायचे इच्छापत्र लिहून दिले असेल त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृत्यूनंतर 6 तासाच्या आत मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बँकेत जमा होतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
            नेत्रदानाबाबत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा, पंखा चालू असल्यास तो बंद करावा, शक्य असल्यास अधूनमधून सुक्ष्म जंतुनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे, त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, मृत पावलेल्या व्यक्तीचे डोके अंदाजे 6 इंच उचलून ठेवावे, असे केल्यास डोळे काढताना रक्तस्त्राव टाळता येतो, अशी माहिती डॉ. सक्तेपार यांनी दिली. तसेच डोळ्यांच्या निगेबाबत मार्गदर्शन केले.
नेत्रचिकित्सक संजय अवजाडे यांनी नेत्रदान ही एक काळाची गरज असल्याचे सांगून नेत्रदानाची आवश्यकता सांगितले. नेत्रचिकित्सक एस. एस. कान्नव यांनी नेत्रदान पंधरवाड्याविषयी माहिती देत मृत्यूनंतर नेत्रदान गरजेचे असल्याबाबत सांगून नेत्रदान करण्याचे आवाहन केले. मोहित पोहेकर, सागर परोपटे, बी. एम. गजबे यांनी नेत्रदान संमतीपत्र भरून घेत मोलाचे सहकार्य केले.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी