इंग्रजी माध्यमातील प्रवेश
पालकांनी पुढाकार घेऊन प्रवेश रद्द करावा
यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा प्रकल्प कार्यालयातर्फे अनूसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मात्र पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन प्रवेश रद्द करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
शासनाच्या नियमानुसार प्रवेश घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधीचा यादीतील क्रमांक नमूद करण्यात यावा, तसेच विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये असावी, अशी अट आहे. मात्र काही विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न जास्त असूनही या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागाला चुकीची माहिती देऊन इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत पाल्यांनी प्रवेश घेतला असल्यास तो पालकांनी पुढाकार घेऊन रद्द करून या योजनेचा लाभ सोडण्यात यावा. असे केलेले नसल्यास कार्यालयाच्या तपासणीमध्ये अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आढळून आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी