अभियानतर्फे प्रगतीशील शेतक-यांची कार्यशाळा
प्रगतशील शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. ८ः बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत जिल्हातील प्रगतशील शेतक-यांची कार्यशाळा जिल्हाआधिकारी कार्यालयातील बचत भवनात मंगळवार (दि. 20) सष्टेंकबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्याात आली आहे. या कार्यशाळेला प्रत्येटक तालुक्यादतील पाच प्रगतशील शेतक-यांनी तसेच संबंधीत गावातील कृषी सहायक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हात प्रशासनाने केले आहे.
            आर्थिक डबघाईस आलेल्याा शेतक-यांना प्रगतशील शेतक-यांनी आपल्याह शेतात राबविलेले नाविन्यलपूर्ण प्रयोग, आधुनिक तंञज्ञानाचा वापर, कमी खर्चाची शेती करून उत्पिन्नालत कशी भर पाडली. या प्रगतशील शेतक-यांनी शेतीत बहूपिक पध्दीती, पाण्यातचे नियोजन, लागवड पध्‍दती, बि-बियाणे, खतांचा वापर, किटक नाशके यांची योग्यत वापर कशा पध्द‍तीने केला. अशा विविध बाबी अंगीकारक शेतीतून भरघोस उत्पशन्ना कसे घेतले. या सर्व बाबींची माहिती जिल्हाशतील इतर शेतक-यांना मिळावी,  त्यांनना या प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शन मिळावे.  यातून शेतक-यांना कमी खर्चात,  कमी जागेतजास्तश उत्परन्ने कसे घ्याेवे याची माहिती शेतक-यांना मिळणार आहेत.  तसेच शेती सोबतच शेतीला पूरक व्यनवसायाची कशी जोड दिली, याची माहिती इतर शेतक-यांपर्यंत पोहचविणार आहे. निर्सगाच्या लहरीपणामुळे आज पिक पध्द तीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी प्रगतशील शेतक-यांचे अनुभव त्यांजची पिक पदधती अंगीकारली पाहिजे. आर्थिक उत्पहन्न् वाढविणारे पिकांची लागवड करायला पाहिजे. यासाठी प्रगतशील शेतक-यांनी इतर शेतक-यांना कशा पध्दतीने मार्गदर्शन करावे हे या कार्यशाळेत सांगितल्या जाणार आहे.
            त्यारमुळे जिल्हांतील प्रगतीशील शेतक-यांची कार्यशाळा बळीराजा चेतना अभियानांर्गत घेण्यानत येणार आहे. या कार्यशाळेला जिल्हाातील प्रगतशील शेतकरी तसेच संबधीत गावातील कृषी सहायक यांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी