शेतकरी कुटुंबांना मिळाली अन्नसुरक्षा
*88 हजार शिधापत्रिकाधारक
*चार लाख शेतकरी लाभार्थी
*23 लाख नागरीकांना धान्य
यवतमाळ, दि. 14 : सततच्या नापिकी आणि अडचणीत आलेल्या राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अन्नसुरक्षेचा लाभ देण्यात येत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 88 हजार शिधापत्रिकाधारक चार लाख शेतकऱ्यांना या अन्नसुरक्षेचा लाभ मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे. या अडचणीतील शेतकऱ्यांनी गंभीर पाऊल उचलू नये, यासाठी शेतकऱ्यांना दोन रूपये किलो दराने गहू आणि तीन रूपये किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी कुटुंब या शिधापत्रिकाधारकांना स्वस्तात धान्य योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत 90 टक्के नागरीकांना स्वस्तात धान्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील 26 लाख 96 हजार 512 नागरीकांपैकी विविध योजनेतून पात्र 23 लाख 62 हजार 409 नागरिकांना अन्न सुरक्षेची हमी मिळाली आहे. जिल्ह्यातील 5 लाख 69 हजार 956 शिधापत्रिकाधारक असून नागरीकांची संख्या 26 लाख 96 हजार 512 आहेत. यात अंत्योदय येाजनेचे 1 लाख 14 हजार 292 कार्ड असून यात समाविष्ठ नागरिकांची संख्या 5 लाख 14 हजार 314 इतकी आहे. अंत्योदय योजनेच्या नागरिकांना प्रति कार्ड 35 किलोप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत धान्य देण्यात येते.
प्राधान्य कुटुंबात 2 लाख 88 हजार 363 शिधापत्रिकाधारक असून यात 14 लाख 38 हजार 183 नागरीक सवलतीच्या धान्यासाठी पात्र ठरले आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्यात येते. राज्य शासनाने नव्याने दिलेल्या शेतकऱ्यांना आधारामुळे एपीएल शेतकरी कुटुंबातील 88 हजार 359 शिधापत्रिकेवरील 4 लाख 5 हजार 215 नागरीक पात्र ठरले आहे. अन्नपुर्णा योजनेंतर्गत चार हजार 697 शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्‍य पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात गरजू नागरीकांना तीन रुपये किलो दराने तांदूळ, दोन रुपये किलो दराने गहू, ज्वारी, बाजरी, मका या प्रकारचे भरडधान्य 1 रुपये किलो दराने दिले जात आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी