Posts

Showing posts from July, 2023

रास्तभाव दुकान परवाना मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 26 (जिमाका) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सद्यस्थितीत लोकसंख्येच्या आधारे एकांक संख्येनुसार यवतमाळ तालुक्यातील भोसा, वडगाव, तिवसा या 3 ठिकाणी नव्याने रास्तभाव दुकानांचे प्राधीकारपत्र मंजूर करण्याकरिता नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याकरिता नोंदणीकृत बचत गट किंवा सहकारी संस्थांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. रास्तभाव दुकान परवाना प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्याचे नमुद केल्यानुसार संस्था /गट यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यात पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० किंवा संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांना अर्ज करता येणार आहे. या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाना मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. व

कारगील विजय दिवस उत्साहात साजरा वीरमाता,वीरनारींचा झाला सत्कार

Image
यवतमाळ,दि.26 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने बुधवार दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात “24 वा कारगील विजय दिवस समारोह” उत्साहात साजरा करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे अध्यक्षतेखाली प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत बळीराजा चेतना भवन येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वीरमाता/वीरनारींना शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्ह्यातील वीरनारी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. प्रथमत: दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे तसेच व्यासपिठावर उपस्थितीत मान्यवरांचे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी “महाराष्‍ट्राचे महारथी” भाग 1-2

*सारथी अंतर्गत मराठा, कुणबी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण*

यवतमाळ, दि.२६ (जिमाका) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी अंतर्गत मराठा, कुणबी मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सारथीच्या लक्षित गटातील मराठा, कुणबी मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील एकूण २० हजार उमेदवारांना मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील स्कील इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टर मधील अभ्यासक्रमाकरिता ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार प्रशिक्षण संस्थांना सोसायटी मार्फत प्रशिक्षण लक्ष वाटप करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा या गटातील उमेदवारांनी लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर जाऊन https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi किंवा दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर रोजगार स्वयंरोजगार संधीचा लाभ सुद्धा याद

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि २५ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध विभागाच्या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी 26 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अचलपूरचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वै.से. पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर, कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे शासनाद्वारे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरिक्षेकरिता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थीना दरमहा एक हजार रुपये दराने विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. या प्रशिक्षण कालावधीत अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज बुधवारी 26 जुलैपर्यंत कार्यालयाच्य

जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी व आढावा

यवतमाळ, दि.25 (जिमाका) : जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज जिल्ह्यातील पुरपरिस्थिती व मदत वाटपाचा आढावा घेतला. बैठकीनंतर नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले. घरात पुराचे पाणी शिरल्याने पडझड झालेली घरे, खरडून निघालेल्या शेत जमिनी, शाळा, अंगणवाड्यांसारख्या शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यात पुर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची स्थिती संवेदनशिल आहे. प्रशासनाने शेती नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यानी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. तालुक्यातील कापरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्हाधिकारी पोहोचले. तेथील नुकसानग्रस्त शेती, पुल आदींची पाहणी करुन तातडीने पंचनामे करण

पालकमंत्री संजय राठोड पूरग्रस्तांच्या दारी

यवतमाळ, दि 24 (जिमाका): जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामीण भागाच्या पाहणीचा सपाटा लावला आहे. नुकसानग्रस्तांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीबाबत आश्वस्त केले. ठिकठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जाऊन ग्रामस्थांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना गावातील शाळा, चावडीच्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मदतीसाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री राठोड यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. अनेकजण आपल्या बोली भाषेत पालकमंत्र्यांसमोर गाऱ्हाणी मांडत होते आणि त्यांचे आभारही मानत होते. पालकमंत्री राठोड यांच्या नुकसानग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यात 'पालकमंत्री आपल्या दारी' आल्याची भावना व्यक्त होत होती. या भेटीत पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. शासन नुकस

Ø 7745 बाधितांना मिळणार प्रत्येकी 5 हजाराचे अनुदान Ø जिल्ह्यात 3 कोटी 87 रुपयांचे अनुदान वाटप करणार Ø अडचण असलेल्या भागात टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवा Ø प्राथमिक माहितीनुसार 2 लाख 37 हजार हेक्टरचे नुकसान

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावात लाखो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान, अन्न धान्याचे वाटप आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे ‘युद्धस्तरावर’ चोवीस तासात करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्ह्यात पुरस्थितीने बाधीत 7 हजार 745 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 3 कोटी 87 लाख रुपयांचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याचा पालकमंत्री श्री.राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवन बनसोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयंक घोष, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातील पालकमंत्री श्री. राठोड यांनी संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागात शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत. पंचनामे करतांना दुरुस्त होऊ शकणाऱ्या आणि न होऊ शकणाऱ्या शेतजमिनी, पिकांचे नुकसान झालेल्या जमिनीच्या आणि घरा

मदरसा आधुनिकीकरण अनुदानाकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि.21 (जिमाका): मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अनुदानाकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक मदरसांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. इच्छुक मदरसांनी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 30 जून 2023 अशी कळविण्यात आली होती. परंतु काही मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याची तारीख वाढवून देण्याबाबत केलेल्या मागणीनुसार या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास शासनाने मुदतवाढ देवून प्रस्ताव सादर करावयाची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 कळविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने अनुदान योजनेंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य तसेच स्विकारले जाणार नाहीत,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले आहे. राज्यातील नोंदणीकृत मदर

जिल्हाधिकारी डॉ..पंकज आशिया रुजू

यवतमाळ, दि.24 (जिमाका) : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. मावळते जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे 2016 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी भिवंडी महानगरपालिका आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातूनच झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष ते परिविक्षाधिन कालावधीत आर्णी येथे नगर परिषद मुख्याधिकारी, तहसिलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले - अमोल येडगे Ø जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप Ø नवीन जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांचे स्वागत

यवतमाळ, दि.24 (जिमाका) : यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा कोविडची आपत्कालीन परिस्थिती होती. आता येथून जातांना देखील पुरपरिस्थिती आहे. कोविड आणि पुरपरिस्थीतीसारख्या प्रसंगी केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. श्री.येडगे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप व नवीन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोल येडगे, डॅा.पंकज आशिया यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत तथा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गेल्या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासोबतच त्यांची कामे कमी त्रासात, कमी वेळेत कशी होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले. प्रशासनात काम करतांना सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी आपण काम करत असतो. यापुढे देखील सर्वांनी या उद्देशाने काम क

कृषि स्वावलंबन : विहिरीसाठी २.५० लाखाचे अनुदान * विहीर दुरुस्ती व इनवेल बोअरसाठीही सहाय्य * सुक्ष्म सिंचन संच, ठिबक, तुषारसाठीही अनुदान

Image
यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॅा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविली जाते. या योजनेतून नवीन विहीर बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जातात. जुन्या विहीरींची दुरुस्ती, शेततळ्यांचे अस्तरीकरण, ठिबक, तुषार व सुक्ष्म सिंचनाचा देखील लाभ योजनेतून दिला जात असल्याने शेतकऱ्यांना आपले शेत उत्पन्न वाढीसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यामार्फत राबविली जात आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर बांधकामासाठी शंभर टक्के म्हणजे २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्याकडे विहीर असेल आणि ती नादुरुस्त असल्यास केवळ दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयाचे अनुदान योजनेतून दिले जाते. योजनेतून शेतकऱ्यांना इनवेल बोअरिंग करावयाचे असल्यास २० हजार अनुदान दिले जातात. पंपसंचसाठी २० हजार, वीज जोडणी आकारसाठी १० हजार,

आनंदनगरला मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून साधला ग्रामस्थांशी संवाद

Image
यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : पैनगंगा नदीच्या पुरामुळे महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे काल आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले होते. या गावाला आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांचे दु:ख जाणून घेतले. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्याकरिता जिल्हा दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी आनंदनगर तांडासह नुकसानग्रस्त भागाची देखील पाहणी केली. या भेटीवेळी आनंदनगर येथे आमदार इंद्रनिल नाईक, आमदार नामदेव ससाने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील आणि पालकमंत्री राठोड यांनी नागरिकांनी मांडलेल्या गावाचे पुनर्वसन, शेती पिकांची नुकसानभरपाई, घरे, संरक्षण भिंत आदी मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यांचा प्रस्ताव शासनस्तरावर प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही केली जाईल. नु

मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

Image
नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान व धान्याचे तातडीने वाटप करा - मंत्री अनिल पाटील यवतमाळ, दि.23 (जिमाका) : गेल्या दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेतपिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.पाटील यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात परवा प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही य

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा -पालकमंत्री संजय राठोड नागरिकांनी आपत्ती परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मध्यरात्रीपासून सततधार, मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागात तात्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच नागरिकांनी आपत्ती परिस्थितीत प्रशासनाला संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्ण दिवसरात्र पाऊस सुरू राहणार असून पुढील ७ दिवस असाच पाऊस सुरू राहणार आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात. परिस्थितीनुसार शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत कार्यवाही करावी. जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मुसळधार पावसामुळे शेती बाधित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचीही परिस्थिती ओढावू शकते, त्यामुळे नुकसानग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ पंचनामे सुरु करावे. तसेच जिल्हा आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षांनी सतर्क राहावे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देवून अतिवृष्टी, पूर

यवतमाळ जिल्ह्यात आठवड्याभरात जोरदार पावसाचा इशारा नागरिकांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सूचना

यवतमाळ,दि.१९ (जिमाका): नागपूर येथील हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २२ जुलै २०२३ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याअनुषांगाने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार बुधवार दि.१९ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. नागरिकांना सूचना हवामान खात्याने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संरक्षणात्मक कपडे घालावे आ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्याच्या कामांना गती मिळणार ; जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा निश्चित करण्याचे निर्देश महावितरणच्या कामांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला आढावा

Image
यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्ह्यातील महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. याबैठकीत महावितरणचा कार्यकारी अभियंता संजय खंगार, अधिक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्यासह उपविभागाचे उपअभियंता उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा तालुकानिहाय आढावा घेतांना प्रकल्प उभारण्यासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पुरेशाप्रमाणात शासकीय जागा उपलब्ध झाल्या आहेत. ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी खासगी जागा निश्चित करून प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषीपंप वीजजोडणी आणि पेडपेंडसीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला त्यावेळी जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि महागाव उपविभागातील प्रलंबित कामांना गती देवून महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. वीजग्राहकांमध्ये वीजबिल भरण्याबाबत जनजागृती करून प

दिग्रस येथील आदिवासी मुलांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

यवतमाळ, दि . 19 (जिमाका) : यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दिग्रस तालुक्यातील आदिवासी मुलांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. वसतिगृह क्षमता ७५ असून विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. वसतिगृहात विद्यार्थ्यांना मोफत उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व इतर सुविधा पुरविण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबिटीद्वारे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते, अशी माहिती वसतिगृहाच्या गृहपालांनी दिली. ००० --

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत

यवतमाळ,दि.19जुलै.(जिमाका):- समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृतीचा लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत ३१ जुलै,२०२३ पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करण्याअगोदर महाडिबीटीच्या http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२२-२३ वर्षसाठीचे अर्ज भरावेत. परिपूर्ण भरलेले अर्ज मूळ टिसीसह दि.३१ जुलै,२०२३ पूर्वी सादर करावे. तसेच सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील नूतनीकरण शिष्यवृतीचे अर्ज दि.३१ जुलै,२०२३ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावे. विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी करुन अर्ज महाविद्यालयास सादर करावे,असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण यांनी केले आहे. 000

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.19 जुलै.(जिमाका):- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, बोर, होलार, मोची इत्यादीच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. या कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य व केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योग १ लाख रुपये, १.५० लाख रुपये व २ लाख रुपये, चर्मोद्योग २ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी ५० हजार रुपये या योजनांसाठी मागील प्रलंबित नरस्तीकरिता २२.२१ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महामंडळाच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत लघु उद्योग ५लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प

महर्षी पब्लिक स्कुलमधील विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरु विद्यार्थी व पालकांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.19 (जिमाका): अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कुल या नामांकित शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाठपुरावा केला जात असून पालकांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महर्षी पब्लिक स्कुल, अमरावती या नामांकित शाळेमध्ये प्रवेशित अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व त्यांचे पालक दिनांक 13 जुलैपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत. ही शाळा प्रवेशित विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा व दर्जेदार शिक्षण देत नसल्यामुळे या शाळेची नामांकित योजनेंतर्गतची मान्यता शासन निर्णय दिनांक 16 सप्टेंबर 2022 नुसार रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेमधून काढून त्यांना दुसऱ्या नामांकित शाळेमध्ये प्रवेशित करण्याची उपोषणकर्त्या पालकांची मागणी आहे. मात्र शासन निर्णयाविरोधात संस्थाचालकाने न्यायालयात रिट याचिका दाखल करुन शासन निर्णयाच्या अंमलबजावणीवर अंतरीम दिलासा मिळविला असल्यामुळे आदिवासी विकास विभागाला या शाळेतून विद्यार्थी काढून दुसऱ्या शाळेत दाखल करता येत नाही. ही वस्तुस्थिती उपोष

पांढरकवडा येथील पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखले ऑनलाईन वितरित

यवतमाळ,दि 18 जुलै (जिमाका) :- पांढरकवडा येथील अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून ऑनलाईन वितरित करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी स्वतः चे प्रमाणपत्र https://itdp-pandharkawada.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन सहाय‍क जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा ता. केळापूर जि. यवतमाळ या कार्यालयाकड़े अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला वितरित करण्याकरिता पर्यंत 1414 अर्ज प्राप्त झालेले आहे. अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला वितरित करण्याची कार्यवाही ही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत असून आतापर्यंत एकूण 1 हजार 111 रहिवासी दाखले मंजूर झालेले आहेत. हे दाखले संबंधित उमेदवारांनी स्वतः चे प्रमाणपत्र स्वतः मोबईलवरुन प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. प्रमाणपत्र डाऊनलोड करतांना काही अडचण निर्माण झाल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमा

सफाई कामगारांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची कर्ज योजना ; अनुसूचित जातीतील इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि. 18 जुलै (जिमाका) :- सफाई कामगार व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनस राबविली जात आहे. या योजनेंतर्गत कर्जासाठी अनुसूचित जातीमधील इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक माधुरी ए. अवघाते यांनी केलेले आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्लीमार्फत अस्वच्छ सफाई कामगार व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कर्ज योजना राबविल्या जाते. यवतमाळ जिल्ह्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 83 कर्ज प्रकरणांचे भौतिक उद्द‍िष्ट प्राप्त झालेले असून 370.80 लाख रुपयांचे आर्थिक उद्द‍िष्ट प्राप्त झालेले आहे. तरी इच्छुक पात्र अर्जदारांनी कार्यालयाशी संपर्क साधून कर्ज मागणीचा अर्ज mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक माधुरी ए. अवघाते यांनी केलेले आहे. 000

माझी कन्या भाग्यश्री : मुलींच्या नावे मुदतठेव गुंतवणूक Ø पालकांना 18 वर्षापर्यंत मुलीच्या खर्चाची चिंता नाही Ø एका मुलीवर 50 तर दुसऱ्या मुलीला 25 हजाराची ठेव

Image
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : प्रत्येकालाच वंशाचा वारसदार म्हणून आपल्या घरी मुलगा जन्माला यावा, असे वाटत असते. काहींना दोन्ही मुले, काहींना एक मुलगा एक मुलगी तर काहींना दोनही मुलीच जन्माला येतात. मुलगी जन्माला आल्यानंतर साहजिकच तिच्या भविष्याचा विचार तिच्या पालकांसमोर उभा राहतो. त्यामुळे केवळ मुली जन्माला येऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणाऱ्या पालकांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेने दिलासा दिला आहे. ठराविक कालावधीनंतर विशिष्ठ रक्कम मुलीला मिळणार असल्याने पालकांची चिंता मिटली आहे. मुलीच्या जन्मापासून तर तिचे शिक्षण व लग्नापर्यंत विविध प्रकारचा खर्च तिच्या आई वडिलांना करावा लागतो. आर्थिक कमकुवत असलेल्या पालकांना या खर्चाची तरतूद करतांना अनेक कष्ट करावे लागतात. त्यामुळे मुलगी जन्माला आल्या आल्या या योजनेच्या लाभासाठी तिची नोंदणी केली जाते. या योजनेंतर्गत एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांच्या मुलींना ठराविक कालावधीनंतर मुदतठेवीवरील व्याज व मुद्दल उपलब्ध करून दिले जाते. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यास 50 हजार रुपये मुलीच्या नाव

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डोंगरगाव चुनखडी खानीबाबत जनसुनावणी

Image
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : प्रस्तावित डोंगरगाव चुनखडी खानीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली खानीच्या प्रस्तावित जागी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. नागरिकांना आपले म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची उत्तरे देण्यात आली. आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे प्रस्तावित डोंगरगाव चुनखडी खान डोंगरगाव, दहिगाव तालुका वणी आणि वेगाव तालुका मारेगाव येथील 552.36 हेक्टर क्षेत्रात एकूण 1.52 दशलक्ष टन त्यात चुनखडी 0.9 दशलक्ष टन, माती 0.06 दशलक्ष टन आणि ओली 0.56 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेच्या खाणीच्या प्रस्तावाची पर्यावरण विषयक जनसुनावणी आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनसुनावणीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, समन्वयक तथा उपप्रादेशिक अधिकारी भादुले, वणीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक, वणी तहसीलदार निखिल धुळधर, मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड, आरस

अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर शोध व बचाव पथकाची यशस्वी कारवाई मध्यरात्री पाच तास चालली बचाव मोहिम

Image
यवतमाळ, दि.१६ (जिमाका) : अडान नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी तालुक्यातील कोपरीजवळ एक व्यक्ती अडकून पडली होता. प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर काल मध्यरात्री तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून सदर व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. कोपरी येथील भाऊराव सातघरे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी कोपरीजवळ अडान नदीपात्रात गेले होते. अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे ते तेथे अडकून पडले. दरम्यान ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. याची माहिती पोलिस पाटील श्रीमती निलावर यांनी रात्री १२ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली. या प्रकरणाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती घेवून आपत्ती व्यवस्थापन विभागास सर्व सहित्यानिशी पथक रात्रीच रवाना करण्याचे निर्देश दिले व अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याची सूचना केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथकाने अवघ्या ५० मिनीटात घटनास्थळ गाठून मोहीम सुरू केली. नदीची वाढणारी पाणी पातळी आणि त्यात रात्रीची वेळ यामु

आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. १३ (जिमाका) : आदिवासी मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या विविध वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ईच्छूक विद्याथ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलींचे शासकीय वसतीगृह, दारव्हा तसेच मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा व मुलांचे आर्णी येथील वसतिगृहात सत्र 2023-24 करिता प्रवेश देण्यात येणार आहे. वर्ग 7 वी, 10 वी, 12 वी. पास अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपले अर्ज https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावे. वसतीगृह क्षमता दारव्हा 125, सावळी सदोबा 75 व आर्णि 75 इतकी असून विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांना निशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व इतर सुख सुविधा पुरविण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबीटीद्वारे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन शासकीय आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतीगृह दारव्हा, सदोबा सावळी तसेच आर्णी येथील गृहपाल यांनी केले आहे.

नोंदणीकृत सेवा सोसायटींनी काम वाटपासाठी प्रस्ताव सादर करावे

यवतमाळ, दि 13 (जिमाका) : बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीच्यावतीने पात्र नोंदणीकृत सेवा सोसायटीला कामाचे वाटप केले जाते. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगाव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करणेसंदर्भात प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव या संस्थेने ठरवून दिलेल्या दोन पुर्णवेळ सफाई कामगार करीता, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद येथे प्रत्येकी एक-एक या प्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव दि. २१ जुलै पर्यंत सादर करावे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य

कारगील विजय दिवसानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि १३ (जिमाका) : बुधवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २४ वा कारगील विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी युध्द विधवा, वीरमाता यांचा सत्कार कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, तसेच कुटुंबियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश राऊत, यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी तातडीने सर्व्हेक्षण करून मदत वाटपाचे निर्देश बी-बियाणांसाठी तातडीने पाच हजाराची मदत

Image
यवतमाळ,दि.13 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेर तालुक्यातील शेतपिकांची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाकडून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, सरपंच सिध्देश्वर काळे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी नेर तालुक्यातील सिरसगाव मंडळमधील मोझर, सावरगाव काळे येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी व इतर बाबींसाठी तातडीने पाच हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. शेत पिक

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-१ सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.12 जुलै (जिमाका):-कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पूरविण्यात येणा-या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले असून उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय,(रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम ५ (१) व कलम ५ (२) अन्वये त्रैमासिक ई-आर १ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने माहे एप्रिल-२०२३ ते माहे जुन २०२३ अखेर संपणा-या त्रैमासिक करीता ई-आर १ या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकिय,निमशासकिय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग-ईन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे, व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई-आर १ सादर करतांना काही समस्या येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर ०७२३२-२४४३९५ संपर्क साधावा.तसेच ई-आर १ सादर करण्याची

सुशिक्षित बेरोजगारांनी सीएमईजीपी,पीएमईजीपी व मधकेद्र योजनाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि १२ जुलै (जिमाका) :-सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासोबतच त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे.ग्रामिण व शहरी क्षेत्रातील गरजु लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयमरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे तसेच तरुण वर्गाला व पारंपारीक कारागिरांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.खेडयापाडयातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपारीक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे.ग्रामिण भागातील रोजगार वाढीस मदत इत्यादी उद्देश ह्या योजनांचे आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी ५० लाख तर सेवा प्रकारच्या व्यवसायासाठी १० लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजुर केले जाते.योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असावे.शैक्षणिक पात्रता किमान ७ वी ते १० वी पास असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी ५० ल

नियमीत पात्र शेतकरी यांना कर्ज नसल्याचे दाखले देण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.१२ जुलै (जिमाका):-नियमीत पात्र शेतकरी पीक कर्जवाटपासून वंचित राहणार नाही अशा सुचना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आल्या असून त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.यवतमाळ बँकेचे जे शेतकरी त्यांचेकडील वसुलपात्र कर्जाची परतफेड करून खरीप हंगाम सन-२०२३ कर्जवाटपासठी पात्र झाले आहेत.तथापि यवतमाळ जिल्हा मध्यावर्ती सहकारी बँकेकडे पीक कर्जावाटपासाठी उपलब्ध असलला निधी विचारत घेता कर्जप्रकरणे कर्जमंजुरीसाठी प्रलंबित आहेत.अशा शेतकऱ्यांचे पीक कर्जवाटपाबाबत उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांन जिल्हा बँकेस संलग्न संस्थानी सचिव व शाखा निरीक्षकांचे शिक्यासहीत कर्ज नसल्याचे दाखले देण्यात यावेत,जणेकरून नियमित पात्र शेतकरी पीक कर्जवाटपासून वंचित राहणार नाही,अशा सुचना देण्यात आल्या आहेत.असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांनी कळविले आहे.

तहसिल कार्यालय यवतमाळ येथे कोतवाल पदासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै (जिमाका):-तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे रिक्त असलेल्या पदाच्या ८० टक्के पदे ही सरळसेवा भरती ने भरण्यात येणार आहे.यामध्ये एकूण ९ पदापैकी ३ पदे महिलांकरिता तर ६ पदे ही अनुसुचित जाती,भटक्या जमाती भज-क भज-ड व, इतर मागास वर्ग व खुला तसेच आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) करीता राखीव आहेत. यामध्ये पारवा,कापरा,यवतमाळ,बोरीगोसावी,लोहारा,वडगाव रोड,येळाबारा,आकपुरी,हिवरी या गावाकरीता भरण्यात येणार आहे.त्याकरीता अर्ज दि.१२ जुलै ते २१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजुन १५ मिनिटापर्यंत तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे सादर करता येईल.प्राप्त अर्जाचे अनुषंगाने लेखी परीक्षा रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.अर्जचा नमुना तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे उपरोक्त कालावधीत मिळेल.अर्ज फी रू.१० व अर्ज दाखल करते वेळी परीक्षा शुल्क खुला प्रवर्गाकरीता ५०० रुपये व इतर राखीव सर्व प्रवर्गाकरीता २५० रूपये परीक्षा शुल्क भरणा रोखीने करणे आवश्यक राहील.अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह स्वत:हा कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे पोस्टाने अर्ज स्विकारण्यात येणार नाही. अधिक माहिती करीता तहसिल का

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे- जिल्हाधिकारी

यवतमाळ,दि.११ जुलै(जिमाका):- खरीप हंगाम सुरू झाला असुन शेतक-यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे. जेणेकरून शेतक-यांना पेरणी व इतर शेती कामासाठी सदर निधी उपयोगी पडेल.सर्व पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची स्थिती सुधारावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बँकर्स समीक्षा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मार्च २०२३ अखेर संपलेल्या बँकिंग तीमाही आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. सदर बैठकीला जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक अमर गजभिये, भारतीय रिझर्व बॅंकेचे राजकुमार जयस्वाल,जिल्हा विकास अधिकारी,नाबार्ड दीपक पेंदाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती वैशाली रसाळ, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे,उप क्षेत्रीय प

शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै(जिमाका):-सामाजिक व न्याय विभाग समाज कल्याण यवतमाळ यांच्या वतीने सन २०२३-२४ या शैक्षिणिक वर्षाकरिता मुला/मुलींच्या शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून ही प्रवेश प्रक्रिया पुर्वी प्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण १८ शासकीय वस्तीगृह असून यामध्ये ९ मुलांचे ९ मुलींचे आहेत.यापैकी यवतमाळ येथे १ मुलांचे व २ मुलींचे असून मुलांचे नेर १,राळेगाव१,घाटंजी १,पांढरकवडा १,वणी १,उमरखेड१,पुसद १,ईसापूर-दिग्रस १ तर मुलींचे घाटंजी १,वणी १,आर्णी १,पुसद १,उमरखेड १,दिग्रस १,दारव्हा १,असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहाममध्येच पुढील कालावधीत अर्ज करावयाची आहेत.शालेय विद्यार्थांसाठी १२ जुलै २०२३ पर्यंत तर इयत्ता १० वी,व ११ नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) ३१ जुलै २०२३ पर्यंत तर बी.ए./बी.कॉम/बि.एस.सी.अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी.असे पदवी नंतरचे अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागामार्फत कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन

यवतमाळ,दि. ११ जुलै (जिमाका):-जिल्ह्यातील युवक युवतींना उद्योगांच्या मागणीनुसार आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२३ दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षणमोहिम आणि उद्योगांची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगानेखालील दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. कौशल्याची मागणी सर्वेक्षण (Skill Needs Assessment Survey)-जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,तंत्रनिकेतन,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी,शालेय,महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले,शिक्षण सोडलेले,नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि,समाजातील वंचित घटकातील उमेदवारयांना त्यांना आवश्यक असलेल्या,ज्या क्षेत्रात आवड असलेल्या कौशल्याची निवडकरणे करिता खालील गुगल फॉर्म दि. ३१ जुलै,२०२३ पर्यंत जिल्ह्यातील उक्त सर्व विद्यार्थ्यांना भरणे करीता याव्दारे विनंती करण्यात येत आहे.Student Skill Need Assessment GoogleF

विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे

यवतमाळ,दि.११,जुलै(जिमाका):-राजर्षी शाहू महाराज जयंती तसेच सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सन-2023-24 या शैक्षणिक वर्षात 11,वी.व12,वी.विज्ञान मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीकरींता समितीव्दारे यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिबीरे आयोजीत केलेली असुन शिबीरस्थळी 11 वी,व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थीनी आपल्या ऑनलाईन भरलेला अर्ज त्या ठिकाणी सादर करावा.सदर शिबीराची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार असून शिबिरात विदयार्थीना मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. सदर शिबीरे हे तालुका निहाय पुढील प्रमाणे दि.१७ जुलै,कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सेवादास नगर, आर्णी.दि.१३ जुलै रोजी राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,झरी-झामणी दि.१८जुलै,रोजी श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविदयालय,पुसद दि.१९ जुलै,शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविदयालय,केळापुर,(पांढरकवडा)दि.२० जुलै,गोपिकाबाई सितारामजी गावंडे कॉलेज,महाविदयालय,उमरखेड,दि.२५ जुलै लोकमान्य टिळक महाविदयालय,वणी,दि.२६ जुलै शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविदयालय दारव्हा,दि.२७ जुलै मातोश्री

महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील सर्व घटकांनी काम करण्याची गरज -ॲड. संगिता चव्हाण

Image
यवतमाळ, दि ५ जुलै जिमाका :- महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होणे खपवून घेतले जाऊ नये. महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच महिलांना कामाच्या ठिकाणी, घरी आणि रस्त्यावर सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी शासन, प्रशासनासोबतच समाजातील सर्वच घटकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज जिल्ह्यातील महिलांविषयक प्रकरणांचा आढावा घेताना ॲड श्रीमती चव्हाण बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवनकुमार बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे तसेच सदस्य वर्षा शिरतुळे आणि संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.