सुशिक्षित बेरोजगारांनी सीएमईजीपी,पीएमईजीपी व मधकेद्र योजनाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि १२ जुलै (जिमाका) :-सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासोबतच त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे.ग्रामिण व शहरी क्षेत्रातील गरजु लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयमरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे तसेच तरुण वर्गाला व पारंपारीक कारागिरांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.खेडयापाडयातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपारीक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे.ग्रामिण भागातील रोजगार वाढीस मदत इत्यादी उद्देश ह्या योजनांचे आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी ५० लाख तर सेवा प्रकारच्या व्यवसायासाठी १० लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजुर केले जाते.योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असावे.शैक्षणिक पात्रता किमान ७ वी ते १० वी पास असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी ५० लाख तर सेवा प्रकारच्या व्यवसायासाठी २० लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजुर केले जाते.या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १८ ते ४५ वर्ष पूर्ण झालेले असावे.शैक्षणिक पात्रता किमान ८ वी पास असणे आवश्यक आहे. या दोन्ही योजनेतून सर्वसाधारण लाभार्थ्यांस प्रकल्प किंमतीच्या ५ ते १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. तसेच अर्जदाराने केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअतंर्गत अनुदान मर्यादा १५ ते ३५ टक्के पर्यंन्त तर पंतप्रधान रोजगा़र निर्मिती कार्यक्रम योजनेअतंर्गत अनुदान मर्यादा २५ ते ३५ टक्के आहे.आधार कार्ड,जातीचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,फोटो,प्रकल्प अहवाल,लोकसंख्याचा दाखला,स्कोअर कार्ड मधील व इतर लागणारे आवश्यक कागदपत्र या योजनेस आवश्यक आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांस www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणासाठी www.kviconline.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा कोणतीही अडचण येत असल्यास या दुरध्वनी क्रमांकावर ०७२३२-२४४७९१ संपर्क साधावा.असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यवतमाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी