Posts

Showing posts from October, 2022

केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर व संत्रासाठी 30 नोव्हेंबर अंतीम दिनांक · बँकेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर देखील विमा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध

यवतमाळ, दि 19 ऑक्टोबर (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2022-23 अंबिया बहारामध्ये केळी व संत्रा या पिकांकरीता सहभाग नोंदविण्याचा अंतिम दिनाक अनुक्रमांक 30 ऑक्टोबर व 30 नोव्हेंबर असा असून शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 80 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 12 हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. व केळी पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 1 लाख 40 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 7 हजार प्रति हेक्टर भरावयाचा आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरीता केळी पिकाची अंतीम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 तर संत्रा पिकाची अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई- 400063. ग्राहक सेवा क्र.:18001024088 दुरध्वनी क्र. 02268623005, ई–मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. यवतमाळ जि

समाधान शिबीरातून पालकमंत्री सोडविणार नागरिकांच्या समस्या

· नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या यवतमाळ दि. 19 ऑक्टोबर (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे आयोजनातून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. याकरिता नागरिकांनी आपल्या तक्रारी 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आहे. नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी, केळापूर या तालुक्यांसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी व मारेगाव, वणी, झरीजामणी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ या तालुक्यांसाठी दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी यवतमाळ येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय “समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. समाधान शिबीराकरिता प्रत्येक तहसिल कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून तेथे तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी सदर कक्षात आपल्या तक्रारी सादर करून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. दिलेल्या तक्रारीवर संबंधीत विभागातर्फे कार्

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिवस” संपन्न

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतरत्न तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकरिता पुस्तक पुनरावलोकन लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यकारी अधिकारी डॉ. जयश्री उघाडे ह्या उपस्थिती होत्या. याप्रसंगी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथाचे योगदान विषद करून वाचनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री उघाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. “वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे. वाचन संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे. वाचन ही जीवनभर पुरणारी ज्ञान संपदा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. भुषण जगताप यांनी केले. तसेच डॉ. प्रदिप थोरात, डॉ. निखील सोळंके श्री. आनंद भुसारी, डॉ. ज

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात 'जागतिक अन्न दिन' साजरा

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १३ ते १७ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान जागतिक अन्न सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थांची होणारी नासाडी थांबविणे व प्रक्रिया युक्त पदार्थामध्ये त्याचे रुपांतर करून समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहचविणे हा आहे. विध्यार्थांद्वारे समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे ह्याकरिता महाविद्यालयाच्या वतीने जागतिक अन्न सुरक्षा सप्ताह 2022 चे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांचे हस्ते विविध स्पर्धातील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार व अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णराव जयपूरकर तर प्रमुख वक्ते म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे तसेच डॉ. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, डॉ. आशुतोष लाटकर, घनश्याम दां

दिग्रस येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 179 उमेदवारांची निवड

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि बापूरावजी बुटले कला, नारायण भट वाणिज्य आणि बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस यांचे संयुक्त विद्यमानाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे उपस्थित होते. तसेच डी. व्ही. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग, बुटले कॉलेजचे प्राचार्य कॅ. व्ही. एल. खळतकर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे सदर रोजगार मेळाव्यास उपस्थित होत्या. सदर रोजगार मेळाव्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे यांनी मार्गदर्शन केले आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी या रोजगार मेळाव्यात एकूण 13 नामांकित कंपन्या त्यांच्याकडील एकूण 1239 रिक्त पदाकरिता मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार असल्याचे सांगितले आणि त्याचा फायदा उमेदवारांनी आवर्जून घेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपले करिअर घडवण्याकरिता प्राप्त संध

इतर मागासवर्ग वित्त महामंडळाच्या कर्ज योजना

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- इतर मागासवर्गातील व्यक्ती, कुटूंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रुपये 10 लक्ष पर्यंतची कर्ज योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना या महत्वाच्या योजना राबविल्या जातात. यातील एक लक्ष व 10 लक्ष पर्यंतच्या कर्ज योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. रु. 1.00 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना : यात अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.1.00 लक्ष. लाभार्थींचा सहभाग निरंक राहील. दरमाह दोन हजार 85 रुपये याप्रमाणे 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. वैयक्तिक कर्ज व्य

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-वन सादर करणे साठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- यवतमाळ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. सप्टेंबर-2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करीता ई-आर-1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकिय / निमशासकिय/ खाजगी उद्योजक/ आस्थापना यांनी त्यांचे युझर आय.डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करुन ऑनलाईन सादर करावयाची आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई आर – 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दुरध्वनी क्रमांक 07232-244395

कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील पदविधरांची मतदार यादित नोंद करावी - जिल्हाधिकारी पदवीधर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम: सहायक मतदार नोंदणी अधिकारी घोषीत *मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत यवतमाळ दि. 18 ऑक्टोबर (जिमाका) : संभाव्य अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक - 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सूरू झाला असून 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय निम शासकिय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातिल सर्व पदविधारक कर्मचाऱ्यांची मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित ते बोलत होते. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करण्यात येतात. यासाठी पात्र पदवी, पदविकाधारक व्यक्तींनी नमुना १८ या विहित नमुन्यात नविन अर्ज सादर करावेत. भारताची नागरिक असलेली, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेली आणि 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकाच्या किमान 3 वर्षे आधी विद्यापीठाची पदवीधर असलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणुन नोंदणी करु शकते. मतदार नोंदणीकरीता मतदारांना नमुना १८ तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे असे जिल्हाधाकारी यांनी सांगितले. यवतमाळ शहराकरिता मतदारांना नाव नोंदविणे सोईचे व्हावे म्हणून नमुना-१८ स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रभागनिहाय नियुक्ती केली आहे. तर शासकिय कर्मचा-यांसाठी जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी शेखर पुनसे यांची नियुक्ती केली आहे. कार्यालय प्रमुखांनी मतदार नोंदणीसाठी शासकिय कर्मचा-यांकडुन नमुना १८ परिपुर्ण भरुन त्यातील माहितिची खातरजामा करुन प्रत्येक कर्मचा-याच्या अर्जासोबत जोडपत्र ३ भरुन प्राधिकृत करावे. तसेच सर्व कर्मचा-यांचे एकत्रित अर्ज शेखर पुनसे यांचेकडे जमा करावेत. पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांसाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी यांची यवतमाळ शहराकरिता प्रभागनिहाय नियुक्ती केलेली आहे ती अशी आहे. ललित व-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4, संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)- प्रभाग 5 ते 8, सवीता चौधर- पालवे, उपजिल्हाधिकारी विभूसंअ (लाभक्षेत्र)- प्रभाग 9 ते 12, ब्रिजलाल एच. बिबे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) -प्रभाग 13 ते 16, सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लसिका-2)- प्रभाग 17 ते 20, सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी- प्रभाग 21 ते 23, भाग्यश्री देशमुख, तहसिलदार (महसुल)- प्रभाग 24 ते 26, रुपाली बेहरे, तहसिलदार (सा.प्र.) -प्रभाग 27 ते 29, शेखर पुनसे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी याचेकडे यवतमाळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी व के.एस. झाल्टे, तहसिलदार यांचेकडे यवतमाळ (ग्रामिण), तसेच उर्वरीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची त्यांचे उपविभाग व तालुक्यात पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता नियुक्ती केलेली आहे. पदवीधारकांनी मतदार यादित नाव नोंदवतांना पदवीची गुणपत्रिका स्व प्रमाणित करून राजपत्रित अधिका-यांकडुन प्रमाणित केलेली छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी यावेळी सांगितले.

Image
*मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत यवतमाळ दि. 18 ऑक्टोबर (जिमाका) : संभाव्य अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक - 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सूरू झाला असून 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय निम शासकिय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातिल सर्व पदविधारक कर्मचाऱ्यांची मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित ते बोलत होते. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करण्यात येतात. यासाठी पात्र पदवी, पदविकाधारक व्यक्तींनी नमुना १८ या विहित नमुन्यात नविन अर्ज सादर करावेत. भारताची नागरिक असलेली, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेली आणि 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकाच्या किमान 3 वर्षे आधी विद्यापीठाची पदवीधर असलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणुन नोंदणी करु शकते. मतदार नोंदणीकरीता मतदारांना नमुना १८ तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्

दिग्रस एमआयडीसीमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण करा. पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला दिग्रस तालुक्यातील प्रलंबित कमांचा आढावा प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

Image
यवतमाळ दि.१५ (जिमाका) :- यवतमाळ, वणी व पुसद येथील एमआयडीसी व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर भागातील एमआयडीसीमध्ये उद्योगाबाबत उदासीन धोरण पाहायला मिळते. दिग्रस एमआयडीसीमध्ये उद्योगाबाबत असलेली उदासीनता दूर करण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात जागा घेतलेल्या सर्व व्यक्ती आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना उद्योग उभारण्यात येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात आणि उद्योगाबबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. दिग्रस शहर व तालुक्यातील २५ विकास कामांबबत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस नगरपरिषद येथिल सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध प्रलंबित विषय जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधीक्षक के. ए. धरणे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, पुसद उपविभागीय अधिकारी व्यंकट रठोड , तहसीलदार सुधाकर राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दिग्रस येथिल पोलीस वसाहत इमारत अतिशय जुनी असुन क्षतिग्रस

आपले विचार प्रगल्भ करण्यासाठी वाचन आवश्यक - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
यवतमाळ, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका) :- वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी व आपले विचार अधिक प्रगल्भ करण्यासाठी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. वाचनापासून कधीही दूर जाऊ नका व आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रांना वाचनाच्या प्रवाहात सामिल करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यात “रिडींग मॅरॉथॉन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त जिल्हाधिकारी यांनी आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय तसेच मंगलाताई सतर्क सार्वजनिक वाचनालय येथे भेट देवून वाचकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, जिल्हा ग्रंथलय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, प्रा.राम पंचभाई, अजय यादव, रंजना तरवरे प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या मोबाईल युगात सोशल मिडीयावर अनावश्यकपणे आपला वेळ वाया जात आहे, तसेच वाचनाची सवय मागे पडत आहे. मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांची सवय लागावी तसेच नोकरदार वर्ग, शाळा कॉलेजचे विद्यार्

रस्त्यावरील अपघातप्रवण ब्लॅक पॉइंट सुरक्षीत करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

रस्ता सुरक्षा समितीचा आढावा Ø शहरातील चौकात ट्राफीक सिग्नल लागणार Ø निवडक ठिकाणी कॅमेराद्वारे इ-चलान Ø रस्त्यावर खाजगी बस उभी केल्यास कारवाई Ø संविधान चौकातील प्रवासी थांबा नेताजी चौकात Ø खराब रस्त्यांमुळे अपघातास यंत्रणा दोषी यवतमाळ, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका) :- एकाच ठिकाणी नेहमी ॲक्सीडेंट घडणारे ब्लॅक स्पॉट शोधून ते सुरक्षीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत दिले. नगरपालीका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक पोलीस या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. अपघात घडू नये यासाठी रस्त्यावर आवश्यक तेथे दिशादर्शक व नामफलक लावणे, सुरक्षा मार्कींग चिन्ह, झेब्रा क्रॉसिंग मार्कींग, स्पीड ब्रेकर, रेडियम चे पट्टे, याबाबत संबंधीत रस्त्या ज्या यंत्रणेच्या अख्त्यारित येतो त्यांनी कार्यवाही करावी. खराब रस्त्यांमुळे अपघात झाल्यास संबंधीत यंत्रणेला दोषी ठरविण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधि

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाईचा निधी दिवाळीपुर्वी मिळणार 205 कोटीची देयके कोषागारत सादर

यवतमाळ दि. 13 ऑक्टोबर (जिमाका) :- माहे जुन, जुलै, ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाच्या नुकसान भरपाई म्हणून यवतमाळ जिल्हयाकरीता 643 कोटी 81 हजार अनुदान प्राप्त झाले असुन सदर निधी अर्थ संकल्पीय पध्दतीव्दारे वितरीत करण्यात आलेला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर रोजीच्या तहसिलदार यांचे कडील प्राप्त अहवालानुसार 205 कोटी 22 लाख 87 हजार रूपये ची देयके काढून तहसिलदार यांनी कोषागारात सादर केलेली आहे. सदर रकम तसेच उर्वरित रकम देखील लवकरच दिवाळीपुर्वी सबंधित शेतक-यांचे खात्यात जमा करण्यासाठी शासनस्तरावरून पुर्ण प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे. तसेच जुन ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता शासनाच्या वाढीव दराने 51 कोटी 13 लाख 31 हाजर रूपये इतका निधी पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला असुन सदर निधी सुध्दा बाधीत शेतक-यांना दिवाळीपूर्वी वितरीत करण्यात येईल.

जिल्ह्यात एकतरी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नवउद्योजक व व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आवाहन

Image
यवतमाळ दि. 13 ऑक्टोबर (जिमाका) :- नागरिकांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर स्टार्टअप यात्रा सुरू केली आहे. या स्टार्टअप यात्रेत नवउद्योजक तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न तथा समस्या सोप्या पद्धतीने सोडविणाऱ्या कल्पना मांडून जिल्ह्यात एकतरी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली. जिल्हास्तरीय स्टार्टअप प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत आज शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, माविमचे रंजन वानखडे व इतर विविध विभागाचे अधिकारी तसेच नोंदणीकृत नवउद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की, छोटोमोठे काम सहज करण्यासाठी नवनवीन कल्पना अनेकांना सूचतात. सामान्यजनांचे कष्ट कमी करून त्यां

पदवीधर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम: सहायक मतदार नोंदणी अधिकारी घोषीत मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत

यवतमाळ दि. १२ ऑक्टोबर (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम येत्या 1 ऑक्टोबर पासुन सूरू झाला असून ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले असून मतदारांना नाव नोंदविणे सोईचे व्हावे म्हणून नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रभागनिहाय नियुक्ती केली आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी यांची प्रभागनिहाय पुढीलप्रमाणे नियुक्ती केलेली आहे. ललित व-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4, संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)- प्रभाग 5 ते 8, सवीता चौधर- पालवे, उपजिल्हाधिकारी विभूसंअ (लाभक्षेत्र)- प्रभाग 9 ते 12, ब्रिजलाल एच. बिबे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) -प्रभाग

आर्णी व मेटीखेडा येथील पोलीस स्टेशनचा प्रश्न निकाली काढा पालकमंत्री संजय राठोड यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

यवतमाळ दि. १२ : जिल्ह्यातील आर्णी व मेटीखेडा येथील पोलीस स्टेशनच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. ना. संजय राठोड यांच्या निवेदनानुसार आर्णी येथील पोलीस स्टेशन करीता जागेच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत आर्णी, नगर परिषद हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे एकूण ५७ गुंठे जागा उपलब्ध झालेली आहे. सदर जागेवर मच्छी मार्केटसाठी असलेले आरक्षण रद्द करून आर्णी पोलीस स्टेशन या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदर प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच मेटीखेडा येथे नविन पोलीस स्टेशन निर्माण करणे आवश्यक असून त्यामुळे जवळपास ६२ गावातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. मेटीखेडा या ठिकाणी महसूल व वन विभागाची देखील कार्यालये कार्यरत आहेत व नविन पोलीस स्टेशनसाठी शासकीय जागा देखी

लोकशाही दिनात 155 तक्रारी प्राप्त

यवतमाळ, दि 11 आक्टोबर (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण 155 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील लोकशाही दिनापुर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेसह, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज आंमत्रित

यवतमाळ,दि.11 आक्टोबर(जिमाका) :-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 16.50 लक्ष आर्थिक उद्दिष्ट आणि 11 भौतिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत राज्यांतर्गत व देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख व परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपयांच्या मर्यादित कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेकडे भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभाकरिता उमेदवाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे,बारावीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. महाराष्ट्र राज्याचा रहवासी असल्याचा पुरावा. ओबीसी असलेल्या जातीचा दाखला व वैधता प्रम

रब्बी व बारमाही पिकांसाठी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.11 आक्टेाबर(जिमाका):-उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची (ईसापुर धरणाच्या) ऑक्टोंबरअखेर धरणाची पाणीपातळी 441 मीटर म्हणजे 100 टक्के ठेवण्याचे निर्धारित आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील लाभक्षेत्रांतर्गत रब्बी हंगाम, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी-नाले उपसा सिंचनासाठी लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 31 ऑक्टोबर 2022 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. धरणात दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी 100 टक्के पाणीसाठा होणार असून उपलब्ध पाणीसाठाच्या अनुषंगाने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास कालवा सल्लागार समितीच्या होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्या अनुषंगाने हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संबंधित लाभधारकांनी अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेण

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी वाटपासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर मदतनिधी वाटपात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्त यवतमाळ, दि. 7 ऑक्टोबर (जिमाका) :- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त झालेला मदत निधी वेळेच्या आत वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. नैसर्गिक आपत्ती सारख्या अतिसंवेदनशील विषयाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व निधी वाटप करण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात माहे जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरीता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार यांना वितरीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात निधी वाटपाची कार्यवाही तात्काळ पूर्ण व्हावी व नुकसान ग्रस्त बाधीत शेतक-यांना तातडीने शासनाची मदत मिळावी या करीता तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना जिल्ह्यातील बाधीत गावांचे समप्रमाणात वाटप करून याद्या तयार करून निधी वाटप करण्याचे कळविले आहे. परंतु राज्य ग्रामसेवक युनियन संघटना व महाराष्ट्र राज्य कृषि सहाय

हत्तीरोग औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

Image
यवतमाळ ०६ :- आरोग्य विभागामार्फत हत्तीरोग नियंत्रणाकार्यक्रमा अंतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ अंजुमन ऊर्दु हायस्कुल,यवतमाळ येथून सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग डॉ.कमलेश भंडारी यांचेहस्ते विद्यार्थ्यांना डि.ई.सी.गोळ्या देवुन करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तनवीर शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नावंदीकर, अंजुमन संस्थेचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी, सचिव शोयेब शिवाणी, मुख्याध्यापक अब्दुल रफीक, शगुप्ता मॅडम हे उपस्थितीत होते. ही मोहिम ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यातील ८ तालुक्यात यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, झरी, वणी, मारेगाव, राळेगांव व कळंब या भागात राबविण्यात येणार असून सदर मोहिमेत दोन वर्षावरील जोखमिचे व्यक्ती वगळता जवळपास १४.१९ लक्ष जनतेला डि.ई.सी. व अल्बेंडॅझोलची गोळी देण्यात येणार. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात डॉ.तनवीर शेख यांनी हि गोळी घेतल्यामुळे मानवी रक्तामध्ये वाढ होत असलेले मायक्रो फायलेरीया जंतू नष्ट होतात व समुदातील हत्तीरोगाचा जंतूभार कमी होतो व त्याची जननाची

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना : नोंदणीकरिता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर ( पोस्ट मॅट्रिक ) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) यावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी पोर्टलवर अर्ज नोंदणी करण्याकरिता 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर पात्र दिव्यांग विद्यार्थ्यानी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण यांनी केले आहे. 0000

जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखीत वस्तुंसाठी दरपत्रके आमंत्रित

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जिल्हा मुख्यालयाच्या दुरुस्ती / नविनीकरणामध्ये निघालेले लोखंडी भंगार वस्तु, ॲल्युमिनीयम खिडकी, जुने टिनपत्रे, प्लायवुड दरवाजे, सागवान खिडक्या व दरवाज्याच्या सागवान चौकट, लोंखडी भंगार वस्तु तसेच मुख्यालयामध्ये निर्लेखन केलेल्या पाणी कुलर, संगणक संच, प्रिटर्स, रद्दी व इतर विद्युतचे नादुरुस्त उपकरणांचा विक्री करणे करीता इच्छुक कंत्राटदाराकडुन भाग-1 ते भाग-9 पर्यंत वेगवेगळे जागेवर/ विभागात ठेवलेल्या भंगार/ निर्लेखित वस्तूंचे दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रकाचे सुचनापत्र http:www.yavatmal.nic.in या जिल्हा संकेतस्थळावर,तहसिल कार्यालय यवतमाळ व जिल्हा नाझर, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे विभागाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्य ‘रिडींग मॅरॉथॉन स्पर्धा’

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सर्व नागरिकांसाठी “रीडिंग मॅरेथॉन स्पर्धा” (वाचन मॅरेथॉन स्पर्धा) चे आयोजन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या ग्रंथालयात दिनांक 15 ऑक्टोबर 2022 च्या पूर्वी आपले नावाची नोंदणी करावयाची आहे. तसेच आपण कोणते पुस्तक वाचन करणार आहोत, ह्या बाबतची माहिती ग्रंथालय व्यवस्थापक यांचे कडे द्यावी. नाव नोंदणी केलेल्या ग्रंथालयात आपले स्वतःचे पुस्तक असेल तर ते पुस्तक किंवा ग्रंथालयातील एक पुस्तक प्राप्त करून घेऊन सकाळी 8 वाजतापासून पुस्तक वाचनाची सुरुवात करावी. सहभागी स्पर्धक जे पुस्तक वाचन करतील त्यातील ठळक बाबींची नोंद एका कागदावर लिहून काढावयाची आहे ते संपूर्ण पुस्तक वाचून त्यांनी काढण्यात आलेल्या नोंदीचे कागद ते ग्रंथालयात देतील “रीडिंग मॅरॅथॉन” मध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल व ज्या स्पर्धंकाचे पुस्तक वाचून नोंद (नोंट्स) काढण्यात आले त्यातील चांगल्या नोंदी (नोंट्स) काढलेल्या स्पर

निमिजागतिक आपत्ती निवारण दिवसत्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजन यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- संयुक्त राष्ट्रसंघ तर्फे 13 ऑक्टोंबर हा “जागतिक आपत्ती निवारण दिवस” साजरा केला जातो. त्याच धर्तीवर देशपातळीवर व राज्यस्तरावर सुद्धा सदर दिवस जागतिक आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाकरिता “आपत्ती व्यवस्थापना समोरील आव्हाने” या विषयाची विषयाची निवड करण्यात आली असून यामध्ये वर्ग 8 ते पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक वक्त्याला 5 मिनिटाचा वेळ देण्यात आला आहे. सदर स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नोंदणी (निशुल्क) आपत्ती व्यवस्थापन विभागात दिनांक 13 ऑक्टोबर 2022 सकाळी 12 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय, विजेत्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

नवउद्योजकांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Image
यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- तळागाळातील नवउद्योजकांचा आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवून राज्यातील उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आयोजित केली आहे. आयोजनाचा दुसरा टप्पा 13 ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथून सुरू करण्यात येत असून या उपक्रमात सहभाग नोंदवून जिल्ह्यातील नवउद्योजकांनी स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. स्टार्टअप यात्रा आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 4 ऑक्टोबर रोजी महसूल सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्टार्टअप यात्रा : तालुकास्तरीय प्रचार व प्रबोधन - तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजाग

“नैसर्गिक शेती” विषयावर 6 ऑक्टोबरला पुणे येथे कार्यशाळा

यवतमाळ, दि. 3 ऑक्टोबर (जिमाका):- कृषी विभागामार्फत दिनांक 6 ऑक्टोबर, 2022 रोजी बालेवाडी, क्रिडा संकुल, पुणे येथे “नैसर्गिक शेती” विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाचे युट्युब चॅनल https:// www.youtube.com/c/AgricuitureDepartmentGoM यावर करण्यात येणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी देखील करण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेच्या संधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

ज्वारी मका बाजरी खरेदीची ऑनलाईन नोंदणीकरिता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत

यवतमाळ, दि. 3 ऑक्टोबर (जिमाका):- हंगाम 2022-23 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी / मका / बाजरी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत 5 खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु) पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, यवतमाळ जिल्हयातील ज्वारी / मका / बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू असून अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2022 आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रे (आधारकर्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बॅकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत ) संबंधित खरेदी केंद्रावर देवून ज्वारी / मका / बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

घोणस अळी ओळख व व्यवस्थापन

यवतमाळ, दि. 29 सप्टेंबर (जिमाका):-काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमामार्फत ऊसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती दिसुन येते तसेच त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. अळीची ओळख :- या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरी

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग नियंत्रण व उपाययोजना

यवतमाळ, दि. 30 सप्टेंबर (जिमाका):- पेरणी नंतर 60 ते 70 दिवसामध्ये कपाशी पीक बहुतेक ठिकाणी पात्या आणि फुले येणाऱ्या अवस्थेमध्ये आहे. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडत असला तरी त्याचे वितरण अनियमित आहे सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच शेतामध्ये पावसाचे पाणी साचुन असल्याचे आढळून येत आहे सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन या कारणांमुळे पाणी जमिनीत बराच काळ साचून आहे. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलुल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. आकस्मिक मर रोगांच्या (पॅरविल्ट) प्रार्दुर्भावामुळे कापूस उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक अनेक रोगकारक घटकांमुळे दिसून येणाऱ्या मर रोगाच्या तुलनेत आकस्मिक मर रोग हा तुरळक प्रमाणात दिसतो रोगाचे परिणाम व त्यावर होणारा नेमका परिणाम मोजणे अवघड ठरते शास्त्रीय दृष्ट्या सखोल अभ्यासाअंती या विकृती साठी कुठलीही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू, सूत्रकृमी कारणीभूत नसल्याचे दिसून आले आहे. या आकस्मिक मर रोगासाठी बीटी कपाशीसह अनेक संकरित वाण हे देशी कपाशी वा

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 30 सप्टेंबर (जिमाका):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कामगार सुविधा केंद्र (Workers Faciliator Centre) रेणुका नगरी, आय,डी,बी,आय, बँके जवळ, वाघापूर रोड, यवतमाळ येथे सुरू करण्यात आलेले असून मंडळाने दिनांक 23 जुलै 2020 रोजीपासून बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची संगणकीय प्रणाली तयार करण्यात आलेली आहे व त्याकरिता मंडळाकडून www.mahabocw.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व अनोंदीत बांधकाम कामगारांनी सदर मंडळात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करून त्वरित नोंदणी करून घ्यावी तसेच बांधकाम कामगारांनी सादर केलेले अर्ज दिनांकानुसारच या कार्यालयाकडे येत असून त्यानुसारच अर्जाची तपासणी करण्यात येते व अर्ज मंजूर झाल्यास बांधकाम कामगारांनी प्रथम रुपये 25/- नोंदणी शुल्क तसेच वार्षिक सभासद वर्गणी रुपये 12/- असे एकूण रुपये 37/- शुल्क आकारली जाते व बांधकाम कामगारांना दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक असून रुपये 12/- वार्षिक नुतनीकरण शुल्क आकारण्यात येते. या व्यत

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 143 उमेदवारांची निवड

Image
यवतमाळ दि. 03 ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नेहरू महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू विद्यालयात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून परमानंदजी अग्रवाल तर उद्घाटक म्हणून रवि अग्रवाल तसेच कौशल्य विकासच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त वैशाली एस.पवार, मजहर खान पठाण, राजेंद्रजी चिरडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. डी. वडते उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना उद्‌घाटक रवि अग्रवाल यांनी, स्वयंरोजगारातून समाज घडतो आणि राष्ट्राची निर्मीती होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे लक्ष पुरवून उद्योजक बनले पाहिजे असे सांगितले. यावेळी रोजगार मेळ्याव्यात - उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ, नवकिसान बायो प्लॅनटेक प्रा.लि. नांदेड, नवभारत फर्टिलायझर प्रा. लि. अमरावती, तिरुमला इंडस्ट्रीयल आणि अलाइड सर्व्हिसेस ग्रुप, डिस्टील एज्युकेशन प्रा.लि. नागपुर, टि. एम.ऑटोमोटीव्ह पुणे, कालिबर बिसनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लिमीटेड नागपुर, हायटेक इजीं. लि.शिरवड जि. सातारा, नेट अँबीट नागपुर, स्वतंत्र

शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत 93 खेळाचे आयोजन संयोजकांची सभा दिनांक 7 ऑक्टोबरला

यवतमाळ, दि. 3 ऑक्टोबर (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022 - 23 या वर्षात एकूण 93 खेळांच्या तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असून येत्या 7 ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका संयोजक यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या स्पधेत आर्चरी, मैदानी खेळ, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलींग (रोडरेस ट्रक - थेट निवडचाचणी ), डॉटबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किकबॉक्सिंग, लॉनटेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी, नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग / रोलर हॉकी, शूटिंगबॉल, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण व डायव्हिंग / वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती फ्री स्टाईल व ग्रीको रोमन, वुशु, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटॅथेलॉन, सेपक टकरा, सॉफ्टटेनिस, टेनिक्वाईट, आट्यापाट्या, आष्टे डू आखा

प्राधाण्य क्षेत्रातील कर्ज प्रकरणे बँकांनी विहित कालावधीत निकाली काढावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
Ø कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवणे गंभीर बाब Ø एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये Ø बँक शाखाधिकारी व डी.आर.पी. यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा Ø दहा रुपयाच्या नाण्यास केली मनाई तर होईल कारवाई यवतमाळ दि. 03 ऑक्टोबर (जिमाका) :- यवतमाळ जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असल्याने शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या कर्ज प्रकरणात बँकामार्फत विहित कालावधीत निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र प्राधाण्य क्षेत्रातील अनेक प्रकरणात पाच-सहा महिने कर्जाची प्रकरणे प्रलंबित ठेवून नंतर नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो, तसेच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होतो. ही बाब गंभीर असून भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार विहित कालावधीत प्रकरणे निकाली न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्सना दिला आहे. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक शुक्रवारी बचत भवन येथे घेण्यात आली याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला भारतीय रिझर्व बँकेचे अग्रणी बँक व्यवस्थापक शशांक हरदेनीया, जिल्हा बँक व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे व्यवस

वाघाडी नदीला नवे रुप देउन जलस्त्रोत पुनर्जिवीत करण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या सहकार्याची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
यवतमाळ (दि.२ ): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत यवतमाळ न.प. प्रशासनाच्या वतीने आयोजित वाघाडी नदीपात्र स्वच्छता आणि पुनर्जीवन अभियानास शहरातील निसर्ग प्रेमी आणि पर्यावरणवादी संस्था व संघटनांनी भरघोस प्रतिसाद देत भल्या पहाटे उपस्थित राहुन मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे व नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघाडी नदीच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करुन येत्या काळात वाघाडी नदीला नवे रुप देण्याचा संकल्प जाहीर करत दर रविवारी श्रमदान करण्याचा संकल्प सोडला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पुजन करुन मा. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले. या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी जगा आणि जगू द्या हे ब्रिद स्विकारुन अहिंसा, शांती आणि स्वच्छता हा मंत्र आपल्याला दिला. त्याचा अंगिकार करुन सर्वांनी मानवी जीवन समृध्द करण्यासाठी संकल्पबध्द व्हावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. प्रश

उत्कृष्ठ सेवेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा - पालकमंत्री संजय राठोड

सेवा पंधरवाडा अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप यवतमाळ दि. 02 ऑक्टोबर (जिमाका) : शासन व प्रशासनाने दिलेल्या उत्कृष्ठ सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागल्यास त्यांना दिलासा मिळून शासनाबद्दल चांगले मत तयार होते व जनसामान्यात शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते. यवतमाळ जिल्ह्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात सेवा पंधरवाडा अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल मी त्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करतो, असे गौरवोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी आज काढले. सेवा पंधरवाड्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नुतन महसूल भवनात विविध 24 विभागाच्या लाभार्थ्यांना देय लाभ व प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन तयार करण्यात आलेल्या बळीराजा समृद्धी महसुल सभागृहचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार प्रा. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ