केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर व संत्रासाठी 30 नोव्हेंबर अंतीम दिनांक · बँकेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर देखील विमा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध

यवतमाळ, दि 19 ऑक्टोबर (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2022-23 अंबिया बहारामध्ये केळी व संत्रा या पिकांकरीता सहभाग नोंदविण्याचा अंतिम दिनाक अनुक्रमांक 30 ऑक्टोबर व 30 नोव्हेंबर असा असून शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 80 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 12 हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. व केळी पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 1 लाख 40 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 7 हजार प्रति हेक्टर भरावयाचा आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरीता केळी पिकाची अंतीम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 तर संत्रा पिकाची अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई- 400063. ग्राहक सेवा क्र.:18001024088 दुरध्वनी क्र. 02268623005, ई–मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुढील महसुल मंडळ मध्ये पिक विमा योजना राबविण्यांस मान्यता देण्यांत आलेली आहे. संत्रा पिकासाठी राळेगांव तालुक्यात धानोरा, राळेगाव, झाडगाव. आर्णी तालुक्यात आर्णी व जवळा , उमरखेड तालुक्यात उमरखेड मुळावा, ढाणकी, विडूळ, चातारी, कळंब तालुक्यात कळंब, कोठा, सावरगांव, जोडमोहा, पिंपळगांव, मेटीखेडा. दारव्हा तालुक्यात दारव्हा, महागांव, लोही, दिग्रस तालुक्यात दिग्रस, कलगांव, तिवरी, तुपटाकळी, नेर तालुक्यात माणिकवाडा, वटफळी, शिरजगांव, मालखेड. पुसद तालुक्यात पुसद, जांबबाजार, वरुड, गौळ खु. बाभुळगाव तालुक्यात घारफळ, महागाव तालुक्यात मोरथ, गुंज, काळी. तसेच केळी पिकासाठी उमरखेड तालुक्यात उमरखेड, महागाव तालुक्यात महागाव, मोरथ, हीवरा, गुंज, फुलसावंगी, पुसद तालुक्यात जांब बाजार हे महसुल मंडळ अधिसुचित करण्यात आले आहे. फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्डची छायांकित प्रत व स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड वानचालक परवाना यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करावे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुविधा व्हावी म्हणून या हंगामापासून बँकेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर म्हणजेच महा ई-सेवा केंद्रावर देखील विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी