शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज आंमत्रित

यवतमाळ,दि.11 आक्टोबर(जिमाका) :-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 16.50 लक्ष आर्थिक उद्दिष्ट आणि 11 भौतिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत राज्यांतर्गत व देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख व परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपयांच्या मर्यादित कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेकडे भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभाकरिता उमेदवाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे,बारावीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. महाराष्ट्र राज्याचा रहवासी असल्याचा पुरावा. ओबीसी असलेल्या जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत किंवा क्रिमिलियरच्या मर्यादेत, आधारलिंक बचत खाते, पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक, अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाइन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी 07232-243052 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी