जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 30 सप्टेंबर (जिमाका):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कामगार सुविधा केंद्र (Workers Faciliator Centre) रेणुका नगरी, आय,डी,बी,आय, बँके जवळ, वाघापूर रोड, यवतमाळ येथे सुरू करण्यात आलेले असून मंडळाने दिनांक 23 जुलै 2020 रोजीपासून बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची संगणकीय प्रणाली तयार करण्यात आलेली आहे व त्याकरिता मंडळाकडून www.mahabocw.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व अनोंदीत बांधकाम कामगारांनी सदर मंडळात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करून त्वरित नोंदणी करून घ्यावी तसेच बांधकाम कामगारांनी सादर केलेले अर्ज दिनांकानुसारच या कार्यालयाकडे येत असून त्यानुसारच अर्जाची तपासणी करण्यात येते व अर्ज मंजूर झाल्यास बांधकाम कामगारांनी प्रथम रुपये 25/- नोंदणी शुल्क तसेच वार्षिक सभासद वर्गणी रुपये 12/- असे एकूण रुपये 37/- शुल्क आकारली जाते व बांधकाम कामगारांना दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक असून रुपये 12/- वार्षिक नुतनीकरण शुल्क आकारण्यात येते. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क मंडळाकडून आकारले जात नाही तसेच मंडळामध्ये नोंदणीकृत (जीवित) बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे वाटप निशुल्क असून मंडळाच्या कोणत्याही विविध कल्याणकारी योजनेच्या लाभाकरिता शुल्क आकारल्या जात नाही. तरी यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणत्याही त्रयस्त व्यक्ती / दलाला / एजंट यांच्या आमिषाला बळी पडू नये व आपली फसवणूक करून घेऊ नये. असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी