वाघाडी नदीला नवे रुप देउन जलस्त्रोत पुनर्जिवीत करण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या सहकार्याची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ (दि.२ ): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत यवतमाळ न.प. प्रशासनाच्या वतीने आयोजित वाघाडी नदीपात्र स्वच्छता आणि पुनर्जीवन अभियानास शहरातील निसर्ग प्रेमी आणि पर्यावरणवादी संस्था व संघटनांनी भरघोस प्रतिसाद देत भल्या पहाटे उपस्थित राहुन मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे व नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघाडी नदीच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करुन येत्या काळात वाघाडी नदीला नवे रुप देण्याचा संकल्प जाहीर करत दर रविवारी श्रमदान करण्याचा संकल्प सोडला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पुजन करुन मा. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले. या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी जगा आणि जगू द्या हे ब्रिद स्विकारुन अहिंसा, शांती आणि स्वच्छता हा मंत्र आपल्याला दिला. त्याचा अंगिकार करुन सर्वांनी मानवी जीवन समृध्द करण्यासाठी संकल्पबध्द व्हावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. प्रशासन आपले कर्तव्य पार पाडतेच पण या शहरात असणाऱ्या समाजसेवी संस्था व संघटना देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करताहेत सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर या परिसराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.त्याकरीता सर्वांच्याच सहभागाची गरज असुन प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर म्हणाले की, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा मोहिमेंतर्गत या नदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला झालेली सुरुवात इथल्या एनजीओंच्या मदतीने आपण करु आणि या वाघाडी नदीचे गतवैभव साकार करु त्यासाठी न.प.प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असा विश्वास मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी यवतमाळ अर्बन बँक अध्यक्ष अजय मुंधडा, जनसेवा फाउंडेशन, उद्योजक राजुभाऊ निवल, आणि लायन्स क्लब, रोटरी क्लब,लायन्स फाॅर्मा, नेहरु युवा केंद्र, योगनृत्य परिवार, जेष्ठ नागरिक मंडळ, प्रयास, पर्यावरण संरक्षण गतिविधी, म.फुले समाजकार्य महा. सावली स्वयंसेवी संस्था, पारधी फासेपारधी संघटना, संकल्प फाउंडेशन, न.प. म. फुले माध्य. शाळा एनसीसी कॅडेट, ओमशिवकृपा संस्था, वादाफळे कृषी महाविद्यालय, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, सेव मेन सेव नेशन, निमा, निमा फार्मा. या सर्व संस्था - संघटनांचे पदाधिकारी, न.प.कर्मचारी शिक्षक, शिक्षिका, महसुल कर्मचारी शालेय विद्यार्थी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल वासनिक यांनी तर आभार डॉ.विजय अग्रवाल यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी