Posts

Showing posts from July, 2022

झाडगाव मध्ये पशु चिकित्सा शिबिर

Image
यवतमाळ दि ३०:- पशुसंवर्धन विभाग राळेगाव तथा रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडगाव व रावेरी या पूर परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प दरम्यान दोन्ही गावातील जनावरांना लसीकरण, गर्भ धारणा तपासणी, औषधोपचार, वंध्यत्व तपासणी व निवारण, खच्चीकरण, जंत व गोचीड निर्मूलन, खनिज मिश्रण वाटप, जनावरांचे टॅगिंग, शल्यक्रिया इत्यादी बाबीवर कार्यक्रमादरम्यान भर देण्यात आला. यावेळी दोन्ही गावातील मिळुन 333 जनावरांवर उपचार करण्यात आले. यामध्ये गाई 86, बैल 78 ,महेश 9, शेळ्या 160, या दरम्यान प्रमुख उपस्थिती डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग यवतमाळ, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी -विस्तार डॉ. प्रशांत झाडे, डॉ. रणजीत नाळे, पशुधन विकास अधिकारी राळेगाव, श्री. सचिन मेश्राम पशुधन पर्यवेक्षक, डॉ. एन बी नवरे पशुधन पर्यवेक्षक, कु.वर्षा गोंडासे - पशुधन पर्यवेक्षक, के एस भोरे परिचर, मनीष खेडकर परिचर, नयन कोकाटे, समीर जमनाके, रुपेश मेश्राम, प्रकाश भेदुरकर, कानकेश्वर शेंडे, मयूर जीवतोडे, सौरभ भोरे, थॉमस पेंदाम, तसेच र

हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

यवतमाळ,दि. ३० जिमाका: भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातस्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३ १५ ऑगस्ट या कालावधीसाठी 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरीता या उपक्रमामध्ये सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे व ध्वजसं

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवुन द्यावा -जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ,दि 30, जिमाका :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी करण्यासाठी सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार संच योजनेचा लाभ द्यावा अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात काल त्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेतला यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी योजनांचा समावेश होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन संचासाठी अनुदान दिले जाते. अल्पभूधारक शेतकरी आणि बहुधारक शेतकऱ्यांसाठी योजनेचे अनुदान वेगवेगळे आहे. जिल्हयात सिंचनाचे प्रमाण बघता सिंचन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि शेती समृद्ध करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. डेहणी उपसा सिंचन योजनेत १०० टक्के सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी तातडिने कामे मार्गी लावावित. पाणी वापर संस्थांची स्थापन करण्यासोबतच पाण्याचा जपून वापर करण्यासाठी शेतकऱ्या

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे २० लाखाचा विमा प्रदान

Image
यवतमाळ, दिनांक 28 जुलै जिमाका :- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटणबोरी यांच्यावतीने नम्रता धुर्वे यांना रू २० लाखांचा धनादेश देण्यात आला स्व सुनील धुर्वे यांनी पाटणबोरी शाखेतून रू १००० चा अपघाती विमा काढला होता. श्री सुनील धुर्वे यांचा रोजी २५ फेब्रुवारी २०२२ ला कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला होता. सदर विमा योजने अंतर्गत एसबीआय जनरल इनशुरन्स कंपनीने रू २० लाखांचा विमा मंजुर केला. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते नम्रता धुर्वे यांना धनादेश देण्यात आला. या वेळेस बँकेतर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक मृत्युंजय पांडा, पाटण बोरी शाखेचे मुख्य प्रबंधक दिनेश शंभरकर आणि एस बी आय जनरल इन्शुरन्स तर्फे गिरीश ढोमणे उपस्थित होते.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवावे -जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले निर्देश यवतमाळ, दिनांक 28 जुलै जिमाका :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी केंद्र शासनाची 35 टक्के सबसिडी आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यात या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अन्नप्रक्रिया उद्योग उभे राहण्यासाठी या योजनेची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात यावेत. तसेच बँकेकडे आलेले प्रस्ताव नामंजूर करण्याची कारणे जिल्हा समितीकडे सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ते जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत बोलत होते. बचत भवन येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हा बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, आणि नाबार्डचे व्यवस्थापक उपस्थित होते. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही शासनाची अतिशय महत्त्वाची योजना असून यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव आहे. या योजनेसाठी जिल्ह्याला 300 प्रस्तावांचे लक्षांक असून या योजनेमध्ये 35% सबसिडी शासनामार्फत देण्यात येते. तसेच दहा ते चाळीस टक्के अर्जदाराचा समभा

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022

Image
69 जागांसाठी आरक्षण जाहीर 35 जागांवर महिलांची लागणार वर्णी हरकती व आक्षेप घेण्यास २ ऑगस्टपर्यंत मुदत यवतमाळ दिनांक 28 जुलै जिमाका: - जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या 69 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यातिल ३५ जागा महिलांना राखिव ठेव्ण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 15, नागरिकांचा मागास प्रवर्ग 11, आणि सर्वसाधारण 35 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तसेच प्रत्येक आरक्षणामध्ये 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखिव करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बचतभवन येथे सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित ठेवण्यात येतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 9 जुलै 2007 रोजी दिलेल्या एका निर्णयानुसार सदर आरक्षण चक्राणूक्रमे फिरविण्यात येते. आरक्षण चक्राणूक्रमे फिरविण्याच्या प्रयोजना

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 29 जूलै पर्यंत

यवतमाळ, दि २७ जिमाका:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 29 जूलै 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे आलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्हयातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून एकूण 340 रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.यवतमाळ जिल्हयातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्याचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यालयाच्या सहायक आयुक्त, श्रीमती विद्या शितोळे यांनी केले आहे. सदर मेळाव्याकरीता जिल्हयातील ईच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, आय टी आय, पदविकाधारक, पधवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले शैक्षणिक पात्रता व रिक्तपद निहाय रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्

भारतीय टपाल खात्यामार्फत 'अखिल भारतीय पत्र लेखन प्रतियोगिता'

यवतमाळ, दि२७ जिमाका:- भारतीय टपाल खात्यातर्फे सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता “ढाई आखर” ही पत्रलेखन प्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे. ही प्रतियोगिता 18 वर्षाच्या आतील आणि 18 वर्षाच्या वरील अशा दोन वयोगटामध्ये होणार असून प्रतियोगीतेचा विषय “व्हीजन फार इंडिया 2047” असा असणार आहे. ही प्रतियोगिता अंतर्देशिय पत्र किंवा लिफाफा श्रेणी यामध्ये होणार आहे. याकरिता अनुक्रमे 500 आणि 1000 शब्द मर्यादा असून पत्रलेखण इंग्रजी / हिन्दी तसेच स्थानिक भाषेमध्ये लिहिण्याची सुविधा दिलेली आहे. प्रतियोगीते करिता राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आकर्षक बक्षीस देण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये -, द्वितीय पुरस्कार 25 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये तसेच राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, व्दितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5000/- असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. दिनांक 1 जुलै 2022 पासून सुरु झालेल्या या प्रतियोगीतेकरिता पत्र पोहोचण्याची अंतिम तारीख 31 ओक्टोंबर 2022 ही असून डिसेंबर 2022 ला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आ

डाक विभागाकडून दीनदयाळ स्पर्श योजनेत फिलाटेली शिष्यवृत्ती

यवतमाळ:- विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकीटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करणे या हेतूने भारतीय टपाल खात्यामार्फत ईयत्ता 6 वी ते ईयत्ता 9 वीच्या विदयार्थ्यांकरिता “दीनदयाळ स्पर्श योजना” या नावाने फिलाटेली शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. निवड झालेल्या विदयार्थ्यांना वार्षिक 6000/- शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. टपाल तिकीट संग्रह करण्याच्या छंदातून, विदयार्थ्यांना त्या त्या वेळच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीचा अभ्यास करण्यास मदत होते. तसेच ज्या विषयावर टपाल तिकीट काढले गेले आहे त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची जिद्द निर्माण होते. ज्या विदयार्थ्यांनी तिकिटे जमविणे आणि संशोधन करण्याचा छंद जोपासला आहे, अशा विदयार्थ्यांची टपाल खात्याकडून फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प या आधारावर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई या कार्यालयातर्फे निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विदयार्थ्यांना वार्षिक 6000/- शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याकरिता विदयार्थ्यांकडे फिलाटेली अकाऊंट असणे किंवा विद्यार्थी फिलाटेली

लोकशाही दिनाचे 1 ऑगस्टला

यवतमाळ,दि.२७ जुलै जिमाका :- जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन १ ऑगस्ट २०२२ रोजी बळीराजा चेतना,बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे सकाळी ११ वजता करण्यात आले आहे. यात जनतेच्या तक्रारी किंवा गाऱ्हांनी ऐकून त्या स्विकारून कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा लोकशाही दिनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरीकांनी कोविड -१९ च्या त्रिसूत्रीचे पालन करुन प्रतीबंधक उपाययोजना कराव्यात. आपले हात वारंवार स्वछ करावे,साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत हँन्डवॉशचा वापर करावा. शाररीक अंतर सोशल डिस्टिन्ससिंग ठेवणे आवश्याक राहील. तोंडाला मास्क लावणे आवश्यक राहील. कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजना केल्यानंतरच नागरीकांना जिल्हा लोकशाही दिन सभेत प्रवेश देण्यात येईल.असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविलेआहे.

सतत पाऊसाच्या परिस्थितीत खरीप पिकांची घ्यावयाची काळजी

यवतमाळ दि.२७ जुलै जिमाका:- यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. सुर्यदर्शन सुध्दा झाले नाही. त्यामुळे खरीपातील पिके जसे की सोयाबीन, कापूस आणि तुर यांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचारा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन,कापूस आणि तुर पिकांमध्ये काही उपाय योजना करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र सांगवी यांनी दिला आहे. सोयाबीन पिकात करावयाचे व्यवस्थापन सध्या सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मुख्यत: चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सुर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे आणि जमिनीत पाणी सचल्यामुळे पिकांना मुळाव्दारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम शेतामधून पाण्याचा निचारा लवकरात लवकर करावा

महिलेच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा

श्रीमती शफीकुलनिशा पती शेख सत्तार वंसतनगर मुल्तानीनगर,पुसद जि.यवतमाळ ही महिला उपजिल्हा मॅजिस्ट्रेट तहसिल जुन्नैर जनपद मुरादाबाद उत्तर प्रदेश यांचे ओदशाने शासकिय जागृती महिला राज्यगृह अकोला.या संस्थेत दाखल झोलेली आहे. सदर महिला ही पुसद येथील पत्ता सांगत असल्याने सदर महिलेच्या नातेवाईकानी शासकिय जागृती महिला राज्यगृह अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय जागृती महिला राज्यगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे. 000000

सैनिकांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित -जिल्हाधिकारी अमोल येडगे कारगिल विजय दिवस साजरा

Image
यवतमाळ, दि 26 जुलै जिमाका :- सैनिकांच्या शौर्याचा दिवस म्हणून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. शहिद सैनिकांचे स्मरण करण्यासोबतच पुढील पिढीमध्ये देशभक्तीची, त्यागाची व शौर्याची भावना या माध्यमातून जागृत करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वतःच्या तारुण्याचा, कुटुंबाचा विचार न करता आपले जवान देशासाठी सीमेवर लढत असतात. त्यांच्यामुळे सामान्य माणसांना सुरक्षितपणे जीवन जगता येते. आपण प्रत्येक जण सीमेवर लढू शकत नाही, मात्र आपल्या सैनिकांसारखे काहीतरी चांगले काम निश्चितच करू शकतो, ते करण्यासाठी तरुणानी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कारगिल विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे तसेच सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेडगे उपस्थित होते. यावेळी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, अलकनंदा पुंजाजी सरोदे, सत्वशीला साहेबराव काळे, मंगला देवचंद सोन

कृषि विज्ञान केंद्र,यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

यवतमाळ दि,२६ जुलै जिमाका:- कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) व ॲफ्रो, यवतमाळ आणि प्रोसॉईल प्रकल्प,मॅनेज, हैद्राबाद यांचे विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे तसेच डॉ. पं.दे.कृ.वी.कापूस संशोधन केंद्र सहयोगी प्राध्यापक, डॉ. संजय काकडे, डॉ. भगवान सोनवणे, सहायकप्राध्यापक, मृदाशास्त्र विधाग डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. पी. यु. घाटोळे,प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ.पं.दे.कृ.वी.,अकोला, डॉ. आर. एस. वानखेडे, सहाय्यक प्रा. कृषी संशोधन केंद्र,अचलपूर (डॉ. पं.दे.कृ.वी.,अकोला), डॉ. मिलिंद साबळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, व्ही. एस. ठोकरे,अधिकारी, ॲफ्रो, गजेंद्र चवळे, अधिकारी, ॲफ्रो, यवतमाळ, अमित बोरकर, अधिकारी, प्रोसॉईलप्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र ,यवतमाळ चे डॉ. सुकेशनीवाणे, शास्त्रज्ञ, कृषीअभियांत्रिकी , डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ,विस्तारशिक्षण, श्

पिक विमा योजनेत जास्तित जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

1 लक्ष 64 हजार 274 शेतकऱ्यांना उतरविला पिक विमा यवतमाळ दि 26 जुलै जिमाका:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रधानमंत्री पिक विमा योजनेची बैठक पार पडली, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी विमा कंपनीने तालुका व जिल्हास्तरावर कार्यालय त्वरित सुरू करावे. मागील वर्षातील व या वर्षातील शेतकऱ्यांच्या पिक विमा बाबत तक्रारींचे कंपनीने निराकरण करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 64 हजार 274 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील यावर्षीची पूर परिस्थिती आणि पिकांची परिस्थिती बघता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

मुद्रांक शुल्काचे दंडाबाबत सवलत योजना 31 जुलैपर्यंत दंड भरल्यास 90% सूट

यवतमाळ दि. 26 जुलै जिमाका :- दिनांक 1 एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती यासंबंधी पक्षकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे नोंदणीमहानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे दि.31 मार्च 2022 पूर्वी नोंटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधीत पक्षकारांनी योजनेचा लाभ घ्यावा. संबंधित पक्षकारांनी दि.31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल. अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर 50 टक्के दंडभरावा लागेल. या योजनेचे संक्षिप्त स्वरूप असे आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31,32(अ), 33, 33(अ), 46, 53(अ) अन्वये मुद्रांक

मुरघास निर्मिती युनिटकरीता अर्थसहाय्य

यवतमाळ, दि 26 जुलै :- जिल्हयाकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्हयातील सहकारी दूधउत्पादक संघ/संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ संस्था यांना सदर योजनेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी प्रती युनिट 20 लाख रुपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रुपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरीत 50 टक्के 10 लक्ष रुपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा जनजाती क्षेत्र उपयोजनेतील असुन जनजाती क्षेत्र (अनुसूचितजमाती) प्रवर्गातील लाभार्थींसाठी असल्याने योजनेकरीता जिल्हयामध्ये एक युनिट स्थापनकरावयाचे आहे. तरी जनजाती क्षेत्र (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील संस्थांनीच 29 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज पंचायत संमिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. एम.यु. गोहोत्रे यांनी केले आहे.

• उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सवात वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीचा जागर • राज्यातील पहिला सौर प्रकल्पाचा पायलट प्रोजेक्ट यवतमाळात

Image
यवतमाळ, दि.२५ जुलै, जिमाका:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिक्षेपातील आत्मनिर्भर भारत निर्माणमध्ये ऊर्जेची भूमिका महत्वाची असल्याने देशाच्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज पोहचविण्यात देशाला यश आल्याचे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले. नियोजन भवन यवतमाळ येथे जिल्हा प्रशासन,महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्यावतिने घेण्यात आलेल्या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,तर प्रा.पंकज पंडित, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण ,उप महाव्यवस्थापक (PFC) गेवेश पाकमोडे, मयुर मेंढेकर,अधिक्षक अभियंता सुरेश मडावी ,दिपक देवहाते ,सुनिल शेरेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आत्मनिर्भर भारत निर्माणसाठी ऊर्जेचे महत्व बघता देशाने ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात अनेक उल्लेखनिय कामगीरी केली असल्याचे यावेळी ते म्हणाल. देशाच्या ऊर्जा निर्मिती क्षमतेत १६९ GW ने वाढ झाल्याने देशाची ऊर्जा पुरवणारा देश म्हणून ओळख झाली आहे. १.६ लाख कि

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढला कल

यवतमाळ, दि. २२ : यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तंत्रनिकेतन प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत 1521 अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1065 अर्ज निश्चित केले आहेत. यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. प्रथम वर्षासाठी दिनांक 21 जुलै व थेट द्वितीय वर्षासाठी दिनांक 22 जुलै पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन व मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60 अशा एकूण 300 जागांची प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत संस्थेच्या सुविधा केंद्रामध्ये 784 अर्ज निश्चित झाले आहेत. तसेच आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी 1521 अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1065 अर्ज निश्चित केले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे. शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे प्रथम व थेट

गेल्या 24 तासात 33 पॉझिटिव्ह ; 14 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 22 जुलै जिमाका :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 82 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 88 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 620 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 587 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79427 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77536 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 91 हजार 945 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 12 हजार 518 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5.32 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव तालुक्यातील एक, दारव्हा सात, घाटंजी एक, पुसद एक, राळेगाव पाच, उमरखेड एक, यवतमाळ 16 व इतर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात 13 महिला व 2

गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणारनोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल*

मुंबई, दि. 21 :- गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण - उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज

299 रुपयांच्या हप्त्यात पोस्टाचा दहा लाखांचा विमा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 21 जुलै जिमाका :- भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करुन प्रति वर्ष 299 किंवा 399 च्या हप्त्यात विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले आहे. टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही नवीन योजना आणली आहे. ही योजना 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती.साठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेणार आहेत. यात विमाधारकाचा अपघाती मृत्यु, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल, शिवाय रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजारांपर्यंत दावा देखील करता येईल. त्याच बरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपया पर्यन्त खर्च देखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार व विम्याअंतर्गत किमान दोन मूलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम मिळणार आहे. 299 व

‘स्वराज्य महोत्सव’: उत्साहात करा साजरा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

Ø 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन Ø ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी मदतीचे आवाहन Ø अंदाजे 4 लाख 62 हजार ध्वजाची आवश्यकता यवतमाळ, दि 21 जुलै जिमाका :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व ‘स्वराज्य महोत्सव’ उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी त्यांचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव निमित्त जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्

गेल्या 24 तासात 18 पॉझिटिव्ह ; 4 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 21 जुलै जिमाका :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 64 व बाहेर जिल्ह्यात 5 अशी एकूण 69 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 416 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 18 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 398 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79394 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77522 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 91 हजार 325 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 11 हजार 931 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.91 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.33 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये आर्णी तालुक्यातील एक, राळेगाव एक, उमरखेड एक, यवतमाळ 13 व इतर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात सहा महिला व 12 पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे

पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला मदतीचे प्रस्ताव सादर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही.सी. द्वारे घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

Image
यवतमाळ, दि 20 जुलै जिमाका :- पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदतीचे प्रस्ताव शासनाला सादर करावे व कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होऊ नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी यांना दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील यवतमाळसह गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या चार जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. जलसंपदा विभागाने नद्या तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळापै

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनानी ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आत्ता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजना कार्यालय ( रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा 1959) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. जून-2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई-आर-1 या प्रपत्राची माहिती वरिल संकेतस्थळावर सर्व शासकीय/ निमशासकीय /खाजगी उद्योजक / आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करुन ऑनलाइन सादर करावयाची आहे, व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई-आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी व ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै,2022 आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदा

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत – उज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने "उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य" महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महावितरणतर्फे दिनांक २५ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता 'नियोजन भवन' यवतमाळ येथे आणि 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता 'बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेज कॉन्फरन्स हॉल' पुसद या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत जिल्ह्यात मागील 8 वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन 2047 पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजन हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात केंद्रव राज्य शासनाच्या योजनेच्या लाभधारक आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या 7 चित्रफीती दाखविण्यात येणार आहे. यात युनिव्हर्सल हाऊसहोल्ड इलेक्ट्रीफीकेशन,

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनात दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहीक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना मदत करेल तसेच यासाठी पक्षकारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि जिल्हा विधी स

मतदार ओळखत्रासोबत आधार जोडणीसाठी नागरिकांना पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Ø मतदार ओळखत्रासोबत आधार जोडणीसाठी 1 ऑगपासून विशेष मोहीम यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने आता मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑगपासून ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छीक असून केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढले जावू शकत नाही. तरी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यानी केले आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज 6-ब तयार करण्यात असून तो निवडणूक आयोगाच्या eci.gov.in आणि https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज 6ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करून दे

कारगील विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- मंगळवार दि. 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली 23 वा कारगील विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी युद्धविधवा, वीरमाता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक/ कुटुंबियांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

गेल्या 24 तासात 18 पॉझिटिव्ह ; 20 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 20 जुलै जिमाका :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 50 व बाहेर जिल्ह्यात 5 अशी एकूण 55 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 617 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 18 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 599 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79376 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77518 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 90 हजार 909 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 11 हजार 533 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.91 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.92 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये नेर तालुक्यातील 10, पांढरकवडा एक, यवतमाळ चार व इतर जिल्ह्यातील तीन रूग्ण असून त्यात सहा महिला व 12 पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच क

वणी तालुक्यातील अकरा गावांना पुराचा वेढा नागरिकांनो घाबरण्याचे कारण नाही सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केले आश्वस्थ

Image
* पुराच्या वेढ्यातील सर्व नागरिक सुरक्षित * झोला व कोणा गावचे नागरिकांना वणी आयटीआय येथे स्थलांतरित. * जीवीत हानी वाचवण्यावर लक्ष द्यावे * शेती नुकसानीची भरपाई मिळणार * सिकलसेल रुग्णाला बोटीद्वारे वणी येथे स्थलांतर * स्थलांतरित नागरिकांशी केली चर्चा यवतमाळ दि. १९ जिमाका : यवतमाळच्या वणी तालुक्यातील ११ गावांना पुराचा वेढा पडला आहे. लगतच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी या गावांमध्ये घुसले आहे. सर्व नागरिक सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. झोला व कोणा गावचे सुमारे एक हजार नागरिकांना वणी आयटीआय येथे त्यांचे पशुधनासह स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. गरज पडल्यात आवश्यक ती सर्व व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाहीं , असे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे. जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन च्या ३ टिम तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची नागपूर इथून एक टीम ये

पारधी युवक युवतींना रोजगारासाठी आय.टी.आय. चे प्रशिक्षण आदिवासी प्रकल्प पांढरकवडा यांचेद्वारे 25 जुलै पर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि 19 जुलै (जिमाका) :- पारधी समाजातील युवक, युवतींना वायरमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डींग, सुतार, प्लंबर, इ. कामाचे आय.टी.आय. चे निवासी प्रशिक्षण योजना जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेकडून मंजूर करण्यात आलेली आहे. सदरहू योजना राबविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांचे स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम दि. 25 जुलै 2022 आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

कोविड मुळे पालक दगावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी बालन्याय निधीद्वारे आर्थिक मदत

यवतमाळ, दि 19 जुलै (जिमाका) :- कोविड आजारामुळे अनेकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 516 बालकांनी आई किंवा वडील कोविड मुळे गमावले आहेत, यातील 12 बालके असे आहेत कि ज्यांनी आई-वडील दोन्ही कोविड मुळे गमावले आहे. यातील 18 वर्षाआतील व सहा वर्षावरील बालकांना सहाय्य म्हणून शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय निधी जिल्ह्यास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या अंतर्गत शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करीता 181 बालकांना आर्थिक मदत केल्या गेली. या अंतर्गत 18 लाख एक हजार निधी बालकांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थीची यादी जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे तसेच घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीकडे तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांचे कडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा. जिल्हा कृती दल मार्फत अर्जाची तपासणी करुन उर्वरित गरजू बालकांना लाभ दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बाल न्याय निध

जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सुचना

Image
पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज घेवून नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करावे यवतमाळ, दि 18 जुलै (जिमाका) :- जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तसेच बेंबळा, अपर वर्धा, लोअर पूस व इतर प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास प्रकल्पामधील पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज घेवून नदीकाठच्या गावातील नागरिकांना रात्री उशीरापर्यंत सुरूक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्ह्यातील पूर परिस्थीतीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सिंचन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता मनिष राजभोज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, तहसिलदार व संबंधीत यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी विविध धरणातील पाण्याची पातळी व पावसामुळे जमा होणारे पाणी याबाबत सर्वच तालुक्यातील सद्य परिस्

प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पाण्यात जाणाऱ्या त्या दोघांवर फौजदारी कार्यवाही

Image
Ø बाभुळगाव येथे दोघांना बचाव पथकाने काढले सुखरूप बाहेर धोक्याची सुचना दिल्यावर निष्काळजीपणाने बाहेर पडू नये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन यवतमाळ, दि 18 जुलै (जिमाका) :- धोक्याची सुचना देवूनही पाण्याची ठीकाणी जाणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे कोणीही जीवावर बेतेल असे धाडस करू नये व निष्काळजीपणाने बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. बाभुळगाव तालुक्यातील पालोती गावातील दोघेजण आज दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 पर्यंत पुराच्या पाण्यात झाडावर अडकले होते, त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव पथकाने बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढले आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने पुराच्या पाण्यात जाऊ नये याबाबत वारंवार आवाहन करूनही पलोती येथील महादेव पवार (वय 55) व मारोती चव्हाण (वय 50) हे पाण्याच्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे या दोघांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी सुरू केली आहे.

अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

Image
राळेगाव व कळंब तालुक्यात केली पाहणी यवतमाळ, दि 18 जुलै (जिमाका) :- राळेगाव व कळंब तालुक्यात काल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनफिल्ड जाऊन अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी केली. या दोन्ही तालुक्यातील सावंगी पेरका, झाडगाव, कात्री, कामठवाडा, या गावातील तसेच कळंब येथील चक्रावर्ती नदीकाठच्या पूर बाधीत नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रामतीर्थ गावातील नदीच्या पाणी पातळीचे अवलोकन करून प्रशासनाला योग्य दक्षता घेण्याबाबत व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे हे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव येथे सर्व तालुका स्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पिक विमा साठी जास्तीत जास्त अर्ज घेण्याचे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचे व डायरीया, कॉलरा, मलेरिया, डेंगू होऊ पसरणार नाही याची दक्षता घेण्या

लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षण विभागात होणार ‘संवाद दिन’

Ø शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेणार Ø दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणार आयोजन यवतमाळ, दि 15 जुलै (जिमाका) :- शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यता प्राप्त खाजगी अनुदानीत, विना अनुदानीत, अंशत: अनुदानीत शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवेचे महत्व व त्यामुळे समाजाचे सकारात्मक परिवर्तन होण्यामध्ये त्यांची महत्वपुर्ण भूमिका विचारात घेता, सदर घटकांच्या तक्रारी / अडचणी न्याय भुमिकेतुन सोडविण्यासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत “संवाद दिन” आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवारी दुपारी 3 वाजता शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, यवतमाळ येथे संवाद दिन आयोजित करण्यात येणार आहे. तरी ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी / अडचणी असतील त्यांनी विहीत नमुन्यात संवाद दिन अर्ज 15 दिवसाचे आधी शिक्षण विभाग (माध्यामिक) जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सादर करावा असे शिक्षणाधिकारी (माध्यामिक) डॉ. जयश्री राऊत यांनी कळविले आहे.

महिलांनी शासनाच्या नि:शुल्क संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Image
· कौशल्य विकासद्वारे “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” प्रशिक्षण · अमरावती येथे देणार महिलांसाठी 18 महिन्यांचे नि:शुल्क निवासी प्रशिक्षण · आय.टी.आय. व आश्रम शाळेच्या प्राचार्यांनी पुर्वपरिक्षेसाठी मार्गदर्शन करावे यवतमाळ, दि 15 जुलै (जिमाका) :- रोजगार मिळविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाद्वारे ‘आकांक्षा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” या नि:शुल्क प्रशिक्षणात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. महिला व युवतींकरिता आयोजित निवासी प्रशिक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, तसेच सर्व आय.टी.आय., आश्रम शाळा, व माध्यमीक शाळांचे प्राचार्य उपस्थित होते. संगणक प्रशिक्षण योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्या महिल

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्काचे निर्देश मुंबई/यवतमाळ दि. १३ : - राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ' सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू

रोजगार केंद्रामध्ये नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार क्रमांक लिंक करावा

यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नोकरीइच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपले आधार कार्ड जोडले (लिंक) नसेल, अशा सर्व उमेदवारांनी 31 जुलै 2022 पर्यंत www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने आधार लिंक पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा / सुविधा आता या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. याव्दारे उमेदवारांस प्रामुख्याने राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे आणि त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे, आणि सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्

शहरातील सायकल ट्रॅक रद्द करुन रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करा नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आदेश

Image
यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- यवतमाळ शहरातील मुख्य वाहतूकीचा रस्ता बसस्थानक चौकापासून ते पांढरकवडा रोडवर नगर परिषदेने तयार केलेल्या सायकल ट्रॅक रद्द करून पुर्वी प्रमाणे रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले. सायकल ट्रॅकमुळे अडथळा व अपघात होण्याची शक्यतेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अहवाल मागविले होते. प्राप्त अभिप्रायानुसार सदर सायकल ट्रॅक हा रस्ता वाहतूकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचा आहे तसेच वाहतूक, गर्दी, अपघात इत्यादी बाबींचा विचार करता मुख्य मार्गावर तयार करणे योग्य आहे काय ह्याबाबत जिल्हा स्तरीय रस्ता सुरक्षा समिती ह्यांचे अभिप्राय घेऊन कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच सदर सायकल ट्रॅक हा सलग लांबीचा किंवा रस्ता वाहतूकीसाठी आवश्यक रुंदी सोडून केलेला नाही. सदर सायकल ट्रॅक हा सायकलस्वारांसाठी तसेच रस्त्यांवरील वाहनांसाठी असुरक्षित असल्याचे दिसते, सदरील ट्रॅक चा वापर हा सायकलस्वारांकडून

18 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- चालू महिन्यातील जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तीसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी. लोकशाही द

पावसामुळे होणारी हाणी टाळणेकरिता जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- जिल्ह्यात 11 जुलै पासून सतत पाऊस सुरू असून या सततच्या पावसामुळे होणारी जिवीत व वित्त हाणी टाळणेकरिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याअनुषंगाने दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार पुर येण्याची पुर्वसुचना मिळाल्यास रेडीओ, टि.व्ही. व स्थानिक प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे. अफवावर विश्वास ठेवु नये वा अफवा पसरवु नये. सततच्या पावसामुळे व पुरपरिस्थितीत मातीची घरे लवकर पडतात अशा घरात राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्या‍वी. पूर परिस्थिती दरम्या‍न लहान मुलांना पाण्याजवळ जावु देवु नये. नदी/ नाल्यास पुर आल्यांस पाण्याची पातळी कमी होई पर्यंत नदी/ नाला ओलाडंण्याचे धाडस करु नये व अशा रस्ता व पुलांवरून गाडी नेवू नये, अशामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यंता नाकारता येत नाही. पुरपरिस्थितीत पिण्याचे पाणी, बिस्कीट, गुळ, शेंगदाणे यासारखे सुके खाद्य पदार्थ यांचा योग्य साठा घरामध्ये असावा. विजेच्या उपकरणांचा वापर करु नये, विजेचा पुरवठा बंद करावा. नदी नाले, ओढे, डबके इत्यादी ठिकाणी मा

गेल्या 24 तासात 22 पॉझिटिव्ह ; 16 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 13 जुलै जिमाका :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 16 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 67 व बाहेर जिल्ह्यात 5 अशी एकूण 72 झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 410 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 388 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79301 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77426 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 87 हजार 758 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख आठ हजार 457 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.93 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5.37 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभूळगाव तालुक्यातील सहा, दारव्हा सहा, घाटंजी एक, नेर पाच, पुसद एक, राळेगाव एक, यवतमाळ एक व बाहेर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात आठ महिला व 14 पुरूषांचा समावेश आहे. नागरिकांनी

उमरखेड तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेज 13 जुलै रोजी बंद राहणार

संततधार पाऊसामुळे आपत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेश यवतमाळ, दि 12 जुलै जिमाका :- संततधार पाऊसामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उमरखेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, कॉलेज (शासकिय, निमशाकिय) 13 जुलै 2022 रोजी एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. मागील तीन-चार दिवासपासुन उमरखेड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी-नोले-ओढे दुथडी भरुन वाहत आहे तसेच सदरील नदी - नाले ओढ्यावर असलेल्या रहदारी पुलावरुन प्रवाह वाहत आहे. उमरखेड शहरात व आजूबाजूच्या परीसरात स्थित असलेल्या शाळा व विद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात. पाण्याची परिस्थिती पाहता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता उमरखेड तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय ४८ तास बंद ठेवण्याबाबत स्थानिकांकडून विनंती पत्र प्राप्त झाले होते. त्यास अनुसरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपरोक्त आदेश पारित केला आहे.